Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

अजय पाटील यांना विशेष रंगकर्मी पुरस्कार प्रदान



कल्याण ।  प्रतिनिधी
गेली पंचवीस वर्ष सातत्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना घेऊन बालनाट्याची चळवळ चालवणार्‍या पिसवली शाळेतील शिक्षक अजय पाटील यांना नुकताच ज्येष्ठ रंगकर्मी कै. अनंत वेलणकर यांच्या नावाने दिला जाणारा विशेष रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री कला संस्कार आयोजित बालनाट्य स्पर्धेच्या वेळी आशा वेलणकर व दिपाली काळे यांच्याहस्ते आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण या पारितोषकाचे वितरण झाले.
‘मी शिक्षक झालो माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण मला लेखक, नाटककार व्हायचे होते. म्हणून मी शिक्षकाची नोकरी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात आलो. गेली 25-26  वर्षे मी सातत्याने नाटक व बालनाट्य करत आहे. आता काही लोक मला लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळखत आहेत. म्हणजेच जे स्वप्न घेऊन मी ठाणे जिल्ह्यात नोकरीला आलो होतो ते स्वप्न काही अंशी पूर्ण झाले आहे. यापुढेही मी सातत्याने बालनाट्य क्षेत्रात काम करत राहीन. आणि नाट्य चळवळीमध्ये काम केल्याबद्दल मला कै. अनंत वेलणकर यांच्या नावाने दिला जाणारा विशेष रंगकर्मी पुरस्कार मिळाला आहे. माझ्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे’, असे अजय पाटील म्हणाले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support