Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

बॉलिवुडच्या‘संस्कारी बाबू’वरही आरोप


विनता नंदा यांनी उडवून दिली खळबळ
 मुंबई । प्र्रतिनिधी
अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘मी टू मोहीम’ जोरात सुरू झाली असून आता या यादीत बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे. हिंदी सिनेसृष्टीत बाबूजींच्या भूमिकेत समरसून काम करणारे अलोकनाथ यांच्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हे आरोप केले आहेत.
1990 मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये, 20 वर्षांपूर्वी  बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी’ अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विनता नंदा यांनी त्या अभिनेत्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र, आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी संस्कारी अभिनेता असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडे असल्याचे उघड होत आहे.
आलोक नाथ यांनी आरोप फेटाळले
ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनी त्यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसर्‍या व्यक्तीने तो केला असावा. मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

महिला आयोगाची नाना पाटेकरांसह चौघांना नोटीस असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने मंगळवारी दखल घेतली. दरम्यान, या प्रकरणी आयोगाने नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाने नोटीस बजावून नाना पाटेकर यांच्यासह चौघांनाही 10 दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांनी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support