This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

डोंबिवलीकर स्वाती मोहितेंची निरलस जनसेवा

घरकाम करणार्‍या महिलांचे सक्षमीकरण
 कल्याण । शंकर जाधव
आपला संसार सांभाळून घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या डोंबिवलीतील स्वाती मोहिते यांच्यासाठी हे मानाचे पान. या महिलांसाठी सक्षम नारी जनरल कामगार संघटना स्थापन करून त्यांच्यापर्यत शासकीय योजना पोहोचवून मोहिते यांनी त्यांना सबला बनवले आहे. इतकेच नव्हे तर आपले शहर स्वच्छ असावे म्हणून स्वच्छता दूत म्हणून काम करणार्‍या मोहिते यांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही गौरव केला आहे.

संसार सांभाळताना आर्थिक परिस्थिती बिकट असली की स्वाभिमानी गृहिणींना अर्थार्जनासाठी काहीतरी काम शोधावेच लागते. अशीच काहीशी वेळ जुनी डोंबिवलीतील अर्चना खडतर यांच्यावर आली होती. धुणी-भांडी करूनही घरच्या खर्चाची हातमिळवणी होत नसल्याने सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या स्वातीताईंना त्यानी आपली व्यथा सांगितली. मोहिते यांनी खडतर यांना धीर देत आपल्या पायावर कसे उभे राहता येईल याची माहिती दिली. आज खडतर घरच्या घरी कापडी पिशव्या बनवून दर महिना तीन ते साडेतीन हजार रुपये मिळवतात. तीच गोष्ट किशोरी आचरेकर यांची. घरची परीस्थिती चांगली पण त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरविले आणि या संघटनेच्या माध्यमातून त्या आज साड्या विक्री करून इतर महिलांनाही स्वातीताईंकडे आणून सक्षमीकरणाची वाट दाखवत..
अर्चना, किशोरी अशा अनेक गरीब आणि गरजू महिलांना स्वातीताईंनी आधार दिला आहे आणि स्वयंनिर्भरतेची वाट दाखवली आहे.    
मूळच्या घाटकोपर येथील स्वाती मोहिते यांचे लग्न झाल्यावर त्या डोंबिवलीत आल्या. संसार सुरू असतानाच  गरीब गरजू महिलांच्या वेदना, व्यथा त्यांना अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने 2011 साली स्वाती मोहिते यांनी महिला बचत गट स्थापन केला. संजय गांधी विधवा योजना, श्रावण बाळ योजना अशा बर्‍याच सरकारी योजनांची माहिती मिळवून त्या गरीब महिलांपर्यत पोहोचविल्या. धुणी-भांडी करणार्‍या महिलांच्या मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यानंतर सक्षम नारी जनरल कामगार संघटनेची स्थापना झाली आणि खर्‍या अर्थाने त्यांच्या समाजकार्याला वेग आला.
घरकाम करणार्‍या महिलांसाठी स्थापन केलेल्या या संघटनेत प्रारंभीच 1300 महिलांनी सदस्य म्हणून नोंद केली होती. आता सदस्यसंख्या वाढतेच आहे. महिलांचे सक्षमीकरण हा उद्देश समोर ठेऊन या संघटनेने आजवर अनेक महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत केली आहे. सरकारने प्लास्टिक बंदीचा आदेश काढल्यावर या गरीब महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दिवाळी आणि इतर सणासुदीला संस्थेच्या बचत गटातील महिला फराळाचे आणि अन्य वस्तूंचे स्टॉल लावतात, विक्री करतात, कष्टाचे पैसे मिळवत असतात.
महिला सक्षमीकरण व सबलीकरण करणे बचत गट स्थापन करणे, व्यवस्थापन करणे, बचतगटातील महिलांना विविध कोर्सेस शिकवून त्यांना व्यवसाय करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे, विधवा महिलांना पेन्शन योजना लागू देण्यास मदत करणे, महाराष्ट्र घरेलू कामगार (लादी, भांडी यांची कामे करणार्‍या महिला) यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ मिळवून देणे या कार्यात त्या व्यग्र असतात. स्वातीताई आणि त्यांच्या भोवती अनेक समस्या, प्रश्न घेऊन आलेल्या महिलांचा गराडा हे चित्र आता संस्थेच्या कार्यालयात नेहमीच दिसत असते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support