This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

ठाण्यात विकासकामांचा दिवाळी धमाका

37 चौकांचे सुशोभीकरण, 13 रस्त्यांचा विकास

 ठाणे । प्रतिनिधी
पावसाळ्यात खड्डेमय झालेले रस्ते, काही नॉन डीपी व डीपी रस्ते, नूतणीकरणाचे रस्ते, मिसिंग लिंक, काँक्रिटचे रस्ते आणि युटीडब्लुटीचे अशी सुमारे 698.27 कोटींची कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 37 चौकांचे सुशोभीकरण, मिसिंग लिंकचे 13 रस्तेही विकसित केले जाणार आहेत. याशिवाय स्मशानभूमी, दवाखाने, अभ्यासिका, जलवाहिनी बदलणे, नवीन टाकणे, सिव्हरेज आदींसह इतर कामांसाठी सुमारे 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात प्रस्तावही 20 ऑक्टोबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांसाठी हा विकासकामांचा दिवाळी धमाकाच आहे.
महापालिकेने ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील उर्वरित डांबरी रस्त्यांचे युटीडब्ल्युटी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचे विविध प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 272 रस्त्यांच्या प्रस्तावांचा एकूण खर्च हा 27239.08 कोटी अपेक्षित आहे. या यादीत घेतलेले रस्ते प्रामुख्याने पावसाळ्यात वारंवार नादुरुस्त होणारे आहेत. या रस्त्यांपैकी काही रस्ते नॉन डीपी रस्ते असले तरी नागरिकांच्या दैंनदिन वहिवाटीचे असल्याचे या रस्त्यांचे युटीडब्ल्युटीने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तर काही रस्ते महापालिका हद्दीत सुरू होणार्‍या क्लस्टर योजनेतील आहेत. 2018-19 मध्ये 1481 कोटी रकमेच्या खर्चाचे नियोजन असून उर्वरित खर्च हा 2019-20 आणि 2020-21 मध्ये करण्याचे पालिकेने नियोजन आहे. 
युटीडब्ल्युटी पद्धतीने केल्या जाणार्‍या चौकांच्या सुशोभीकरणात स्वामी विवेकानंद चौक, टेंभी नाका, चिंतामणी, कोर्ट नाका, जेल तलाव, नरवीर तानाजी, गडकरी, आंबेडकर नाला चौक, कोरस नाका, ब्रम्हांड आझादनगर, मानपाडा जंक्शन, पातलीपाडा, सरस्वती शाळा, यशोधननगर, क्रांतीवीर चौक, मुंब्रा पोलीस ठाणे, संजय नगर, शंकर मंदिर, किस्मत कॉलनी, कौसा कब्रस्तान, ऐकार्ड कॉम्प्लॅक्स, हिलान बेकरी, पाकिजा बेकरी आणि सनशाईन नगर चौक यांचा समावेश आहे. तर मास्टिक पद्घतीने केल्या जाणार्‍या चौकांत कॅडबरी सिग्नल, तीनहात नाका, रघुनाथ नगर साईड (तीनहात नाका), नितिन कंपनी, माजिवडा, माजिवडा (आर्ट गॅलरी), माजिवडा (लोढा), साकेत, गोयंका चौक, गोखले रोड व आर मॉल आदींचा समावेश आहे.
पाणीपुरवठा, मलनि:सारणाची कामेही केली जाणार आहेत त्यांचेही वेगवेगळे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. यासाठी 230.32 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात स्मशानभुमी, दवाखाने, अभ्यासिका, पाईपलाईन, सिव्हरेज लाईन टाकणे आदींसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
कसा असेल रस्त्यांवरील 
कामांचा खर्च?
डीपी रस्त्यांसाठी 262.05 कोटी, नूतनीकरणासाठी 65.84 कोटी, मिसिंग लिंकसाठी 49.99 कोटी, काँक्रिटीकरणसाठी 30.03 कोटी, युटीडब्ल्युटीसाठी 272.39 कोटी व युटीडब्ल्युटी चौकांसाठी 14.58 कोटी तसेच मास्टिक पद्धतीने करण्यात येणार्‍या चौकांसाठी 3.39 कोटी असा एकूण 698.27 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात मिसिंग लिंकचे 13 रस्ते असून ते 6.24 किमीचे आहेत. डीपीमधील 30 रस्ते-26 किमी, रोड वाईंडिंग (नूतनीकरण) 28 रस्ते-18.21 किमीचे असणार आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support