Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

नाना संस्कारी लोकांचे समाज नावाचे श्वापद

हॉलिवुडमध्ये मी टू.. म्हणजेच माझंही लैंगिक शोषण झालं होतं, करायचा प्रयत्न झाला होता, बळजबरी झाली होती याबद्दल अभिनेत्रींनी खंबीर भूमिका घेऊन एका निर्मात्याच्या घृणास्पद वर्तनाची लक्तरे चव्हाट्यावर मांडली त्याला आता काही महिने उलटून गेले आहेत. त्यानंतरच आपल्याकडील चित्रपटसृष्टीत पडद्याआडच्या काळोखात असेच जे काही प्रकार चालतात, दडपले जातात, कास्टींग काऊचच्या नावाखाली जे शोषण होतं त्यावरीलही झाकण उघडलं जाईल अशी अटकळ माहितगारांनी व्यक्त केलीच होती. आपली चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त बॉलिवुड नाही, मराठी चित्रपटसृष्टीही त्यात आहे आणि शेजारच्या राज्यांमधली विशेषत: दक्षिणेकडील शिस्तबद्ध चित्रपटसृष्टीही आहे. चित्रपटांत चमकायचंय, नाव कमवायचंय मग आधी शिल विक, शरीर वापरायला दे असा गलिच्छ पायंडाच सिनेसृष्टीतील बुभूक्षित जनावरांनी पाडला आहे. मग बदलत्या काळानुसार मुलींबरोबरच मुलांचेही शोषण सुरू झाले आणि आजही सुरू आहेच. कधी ना कधी या दुर्गंधीचा भपकारा बाहेर येणारच होता. तनुश्री दत्ताने थेट नाना पाटेकरला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर आपल्याकडेही मी टू.. अर्थात व्यक्त होण्याला सुरुवात झाली. तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर तिला नोटिस पाठवणार्‍या नानाने पत्रकारांनी गाठल्यावर मात्र, सत्य हे सत्यच असतं, मला माझ्या वकिलांनी बोलू नकोस असे सांगितले आहे, म्हणत तोंड मिटून घेतले. त्याच्याबरोबर काम केलेल्या डिम्पलनेही नानाची संभावना फार चांगली केलेली नाही. तनुश्रीच्या बाजूने कंगना रानौतपासून अनेकजण उभे राहिले आहेत. कंगनाने दिग्दर्शक विकास बहलच्या गैरवर्तनाबद्दलही तोंड उघडलं आहे. आता हे वादळ थांबणारं नाही. काही दिवसांपूर्वी पत्रकार-लेखिका संध्या मेनन यांनी ट्वीटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याच प्रकारच्या एका वादळाला वाट करून दिली. अभिनेत्रीच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील महिलांचे, युवतींचा गैरफायदा घेतला जातो, शोषण करण्याचा प्रयत्न होतो याचे पुरावे देणार्‍या काही पोस्ट, तिला अनेकांनी पाठवलेले मेसेज तिने ट्विटरवर टाकले आणि एकच खळबळ उडाली. कारण त्यात निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर अशी नावे होती. या लोकांनी महिला पत्रकारांशी कशी गैरवर्तणूक केली, त्यांना नको त्या पद्धतीने स्पर्श कऱण्याचा कसा प्रयत्न केला, याबद्दल संध्या यांना अनेक महिला पत्रकारांनी कळवलेले अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. पत्रकार नीता कोल्हटकर यांनीही मराठीतील एका ज्येष्ठ संपादकावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की असली जनावरे समाजात सर्व स्तरांत आणि थरांवर आहेत. स्त्री चा देह दिसला की बोटांऐवजी नख्या होणारे हे विकृत सर्वत्र आहेत. चित्रपटक्षेत्रच नव्हे तर पत्रकारिता, कॉर्पोरेट उद्योगव्यवसाय सर्व ठिकाणी महिला म्हणजे आपली हक्काची वस्तू समजून हे हरामखोर नजरेनेच समोरच्या स्त्रीला वस्त्रविहीन करत असतात. नवरात्रौत्सवात देवीची पूजाअर्चना करणार्‍यांमध्येही असे लंपट आहेत, राजकारणातही असे अधू मधू आहेत. लेखक चेतन भगतनेही असेच गैरवर्तन केले होते आणि ते उघड झाल्यावर माफी मागण्याचा शहाजोगपणा आता तो दाखवतो आहे. दिग्दर्शिका निर्मात्या विनता नंदा यांनी मंगळवारी एका संस्कारी अभिनेत्याविषयी फेसबुकवर पोस्ट टाकली. नाव न घेता पण संस्कारी अभिनेता असा उल्लेख केल्यामुळे हा अभिनेता म्हणजे आलोक नाथ हे सर्वांनाच कळले आहे. नंदा यांनी आलोक नाथवर बलात्काराचा आरोप केला आहे. अर्थातच आलोक नाथ यांनी तो फेटाळला आहे. पण, मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही, हे त्यांचे स्पष्टीकरण फारच अजब आणि गुळमुळीत आहे. अगदी नाना पाटेकरने केलेल्या खुलाशासारखे. विनता नंदा यांनी त्यांच्या तारा मालिकेतील मुख्य अभिनेत्रीलाही आलोक नाथ त्रास देत होता असा उल्लेख केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे नवनीत निशान. तिने लगेचच त्याला पुष्टी देत, सेटवर त्रास देणार्‍या आलोक नाथ यांच्या कानशिलात लगावली होती, अशी पोस्ट फेसबुकवरच टाकली आहे. महिलांना भोगवस्तू समजून त्यांचे शोषण करणारे संभवित चेहर्‍याने समाजात वावरत असताना, इतक्या वर्षांनी का बुवा बोलायला लागल्या महिला, असा एक प्रश्न विचारण्यात येतो आहे. अशा शोषणाची बळी ठरलेली युवती त्यावेळी अत्यंत भेदरलेली, दबावाखाली, एकाकी, अस्वस्थ अशी असणार हे उघड आहे. ती त्यावेळी बोलली नाही म्हणजे तिचे चुकले असे समजायचेही कारण नाही. आता संघटीत महिलाशक्तीमुळे धीर येऊन अनेकींना आपले शोषण सांगावेसे वाटू लागले आहे तर ते चूक कसे? समाज नावाचे श्वापद असे गुरगुरत असेल तर त्याचा निषेधच व्हायला हवा.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support