This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

डिजिटल पर्यायांनी पर्यटन उद्योगात घडविले आमूलाग्र बदल


मागच्या दशकभराच्या काळापासून पर्यटन उद्योगात इतके मोठे आमूलाग्र बदल झाले आहेत की, पर्यटनाचे नियोजन कसे महाकठीण काम असायचे याची कल्पनाही करणे आता अशक्य आहे. आपल्या आवडीच्या ठिकाणाची तिकिटे बुक करणे, वाहतुकीचे स्थानिक पर्याय, हॉटेल्स, कुठल्या ठिकाणाला भेट द्यायची हे ठरवणे आणि तेही चांगल्या किमतीत या सगळ्यासाठी खूप प्रयत्नांची गरज असायची आणि त्यासाठी अनेक पर्यटन एजंटांपासून ते आपल्या माहीतगार शेजार्‍यांपर्यंत प्रत्येकाशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. तरीही अज्ञात ठिकाणी आपल्याला जास्त पैसे भरावे लागतील किंवा अनोळखी माणसावर अवलंबून राहावे लागेल याची भीती सतत असायची. नियोजन कऱणार्‍यावर संपूर्ण सुट्टीत इतका ताण असायचा की आधीच्या सुट्टीत आलेला ताण कमी करण्यासाठी त्यांना आणखी एक सुट्टी काढावी लागे!
इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणेच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या आजच्या प्रवासाची पद्धत बदलली आहे. आपल्या आवडीचे ठिकाण निवडण्यापासून ते आपण तिथे भेट देणार असलेल्या रेस्टॉरंट्समध्ये आरक्षण करण्यासाठीच्या संपूर्ण प्रक्रियेला फक्त काही मिनिटे लागतात. ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीज (ओटीए) या संभाव्य पर्यटकाच्या प्रत्येक गरजेच्या पूर्ततेसाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म बनल्या आहेत. त्या विविध निकषांवर आधारित राहून विविध प्रकारचे पर्याय निवडतात. वन साइज फिट्स ऑलपासून ते अत्यंत सूक्ष्म पातळीचे कस्टमायझेशन डिजिटल टुरिझमने शक्य केले आहे आणि त्यातून पर्यटकांचे सबलीकरणही केले आहे.
पर्यटनातील तंत्रज्ञानाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकण्याची क्षमता होय. ट्रॅव्हल चॅटबोट्स, हे एक तंत्रज्ञानात्मक सोल्यूशन आहे जे पर्यटन उद्योजकांसाठी अत्यंत आवडीचे ठरले आहे आणि त्यांच्याकडे ग्राहकांकडून आलेली माहिती साठवण्याची क्षमता आहे. त्यातून प्राधान्यांचा अंदाज लावण्यासाठी ते अशा प्रत्येक संवादाचा मेळ घालतात. सतत प्रवास करणार्‍यांसाठी तिकिट बुक करणे आणि आपल्या आवडीच्या हॉटेलमध्ये कुठल्याही ठिकाणी राहणे ओटीए रोबोला सांगण्याइतके सोपे आहे. याशिवाय एआयने प्रेरित अद्ययावत ट्रॅव्हल टूल्स आणि मशीन लर्निंग हे सातत्यपूर्ण व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करतात आणि त्यात पर्यटकांची अगदी वैद्यकीय गरजेपासून ते एक विशिष्ट रंगसंगती असलेल्या आपल्या आवडीच्या खोलीपर्यंतची प्रत्येक गरज पूर्ण केली जाते.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (आय-ओ-टी)सारख्या अद्यायवत तंत्रज्ञानाच्या उगमामुळे एक नवीन क्रांती होऊ घातली आहे. त्यांनी एका सूक्ष्म पातळीवर उत्पादन/ सेवेची स्मार्ट संकल्पना व्यापक पातळीवर शहर/राष्ट्र पातळीवर नेली आहे. दुबईसारख्या स्मार्ट शहरांनी आपल्या विमानतळावरील इ-गेट, एकात्मिक सार्वजनिक आणि खासगी वाहतूक यंत्रणा, मोबाइल पार्किंग इत्यादी सुविधा त्यांना दरवर्षी भेट देणार्‍या मोठ्या प्रमाणावरील पर्यटकांच्या सहकार्यासाठी जोडल्या आहेत.
जगभरातील देशांमध्ये पर्यटन हे आर्थिक वाढीत आणि सामाजिक विकासात भर घालणारे माध्यम ठरले आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आयओटी आणि मशीन लर्निंग यांच्यासारख्या उगवत्या तंत्रज्ञानांमध्ये अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये पर्यटनाच्या महसुलाची नवीन लाट आणण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे स्थानिक समुदायात रोजगारनिर्मिती होईल आणि एकूणच अर्थव्यवस्थेची प्रगती होईल. 
मुक्तपणे उपलब्ध वायफाय, एआर-व्हीआर असलेले नकाशे, स्मार्ट असिस्टन्स किओस्क हे तंत्रज्ञानावर आधारित अनेक असे घटक आहेत ज्यांचा वापर आपण पुढील वर्षांमध्ये पर्यटनाशी संबंधित ठिकाणांचा भाग म्हणून करू शकतो. उद्योगातील भागधारक पर्यटकांना ब्रँड स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, फारशी माहीत नसलेली ठिकाणे, स्थळे आणि इतर आकर्षणांशी जोडण्याच्या परिणामाबाबत उत्सुक आहेत. या ट्रेंडमुळे प्रचंड सकारात्मक परिणाम साध्य झाला आहे आणि जगभरातील अनेक सार्वजनिक-खासगी भागीदारांनी डिजिटल एक्सेस निर्माण करून तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू केल्या आहेत. घाबरलेल्या प्रवाशांना आवश्यक असलेली सुरक्षितता देण्यापासून ते स्थानिक उत्पादकांना स्थानिक आणि जागतिक ग्राहकांशी जोडल्याने प्रदेश, शहर किंवा देशाच्या आर्थिक प्रगतीत भर घातली आहे, स्मार्ट टुरिझममध्ये पर्यटनाच्या क्षमतांची कल्पना व्यापक दृष्टिकोनातून करण्याची क्षमता आहे. पर्यटनाचे जग आता त्याच्या व्यापक अमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support