This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

या, ‘सैराटां’ना समाजभूषणच द्या!

जातीसाठी काय पण, नि खोट्या प्रतिष्ठेसाठी घेऊ  जीवपण.. या वास्तवातल्या सैराट’ कहाण्या आपल्या देशाची पर्यायाने पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्रची मान दररोज शरमेने खाली घालायला भाग पाडत आहेत. पण, आपण चित्रपटाच्या कथानकांवर जास्त नि आपल्या शेजारी घडणार्‍या गोष्टींवर कमी व्यक्त, (रिअ‍ॅक्ट) होत असतो. हा अनुभव सध्या आपुला महाराष्ट्र घेतो आहे. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात खोट्या प्रतिष्ठेपायी आई वडिलांनी मुलीचा खून पाडून तो पचविण्याची तयारी अगदी स्मशानात अंत्यविधि उरकण्याच्या तयारीनिशी केला होता. त्याला कारणही तसेच होते प्रतिष्ठित, सुशिक्षित सावत्र आई आणि नावाला जन्मदाता असलेल्या बापाचे लेकीने नाक कापले. शेतात राबणार्‍या एका सालगड्याच्या मुलाशी पे्र्रमसंबध जोडून त्याच्याशी पळून जावून लग्नगाठही बांधली. बी.ए.एम.एस. चे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या या खुळ्या मुलीला जात काय नि प्रतिष्ठा काय असते हे ठावुक नव्हते. उच्च-नीच काय असते, याची काडीची अक्कल नाही. अगदी 22 वर्षांची असलेल्या या मुलीला आपलं भल का नि बुरं काय हे न कळावं. सोलापूरच्या सलगर बुद्रुक या गावात लेकीची हत्या करून सामाजिक प्रतिष्ठा परत मिळवणार्‍या बापाचं यामुळे आता कमालीच वजन वाढलं आहे. ही हत्या रागाच्या भरात केल्यानंतरही कोणतीही पश्चातापबुद्धी नाही. हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विठ्ठल धोंडिबा बिराजदार व त्याची पत्नी श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांना आता पुढचं आयुष्य तुरुंगाची हवा खाण्यात घालवावं लागणारं आहे. त्यांनी जो काही सामाजिक प्रतिष्ठेचा पाया रचला आहे, त्याबद्दल त्यांच्यासह अशी निर्घृण कृत्य करून खून पचवणार्‍या आई-बापांचा सत्कार करायलाच हवा. समाजभूषण, समाजरत्न असे पुरस्कार प्रदान करून जातपंचायत, खापपंचायत राबवणार्‍यांनी त्यांचा गौरव केला पाहिजे. माणसांमाणसांतील सामाजिक, जातीय विषमतेची दरी अधिक वाढविण्यासाठी असेच प्रोत्साहन दिले पाहिजे. आपला कायदा कडक असला तरी तो राबणारे लंगडे सरकार असलेल्या सरकारनेही आता मुला-मुलींची खुलेआम कत्तल करून मानवतेचा भरचौकात खून पाडणार्‍यांचा गौरव केला पाहिजे. कठोर कायद्याचा धाक-दाब अशी कृत्य करणार्‍यांना नसेल तर सरकारने त्यांचे सत्कार सोहळे घ्यायला काय हरकत आहे? न्याय, कायदा, पोलीस आपआपले काम करतो. पण, जात-धर्म-पंथ पाहून माणसे मारणे म्हणजे अगदी सोपे, असे वाटणार्‍यांना सरकार अथवा व्यवस्थेची कधीच जरब बसणार नाही का? हेच मंगळवेढाच्या घटनांवरून प्रतीत व्हावे. अनुराधा बिराजदार या 22 वर्षांच्या पोटच्या लेकीला संपवताना आई-बापाला नाते कुठेच आठवले नाही. अनुराधा कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए. एम. एस. चे शिक्षण घेत होती. विठ्ठल बिराजदारांकडे सालगडी म्हणून काम करणार्‍याच्या मुलाने अनुराधाशी सिंदगी येथे जाऊन लग्न केले. हा सामाजिक प्रतिष्ठेला छेद देणारा प्रकार अनुराधाचे वडील विठ्ठल यांना सतत अस्वस्थ करत होता. रागाने लालबुंद झालेले अनुराधाचे पिता आता काय करू नि काय नाही, या विचाराने सैरभैर झाले होते. त्याने सिंदगी गाठून अनुराधाला घरी आणले. तिला बोराळे गावातील मामांकडे आणून ठेवले. आई-वडिलांचा राग शांत झाला असा अनुराधाचा समज झाला. परंतु सालगड्याच्या मुलासोबत लग्न करून मुलीने माझी बदनामी केली, आता मी तिला सोडणार नाही! या अविचाराने पेटून उठलेल्या विठ्ठल बिराजदारांनी अनुराधाला फसवून घरी आणले. तिची तोंडी परीक्षा राहिली आहे तिला घेऊन जातो, असे सांगून ते तिला पतीच्या घरून घेऊन आले. पण, आपल्या आई-बापाच्या मनात नेमकं काय शिजतयं याचा ठाव नसलेल्या अनुराधाची फसगत झाली. अशा कित्येक अनुराधा कावेबाज, निष्ठूर, सैतानी वृत्तीच्या पालकांच्या मानसिकतेचा आजही बळी ठरत आहेत. अनुराधाने प्रेम हा रंग निवडून जात-धर्म- प्रतिष्ठा ही चौकट मोडण्याचा किंबहुना या चौकटीबाहेरचा विचार केला. परंतु, जातीची चौकट मोडणे कठीण. आजला वरवर कितीही पुढारलेपणं आपण दाखवत असलो तरी जातीची मळमळ आणि जातीची तळमळ आपल्याला सोडवत नाही. अगदी सच्चाईने एकदा आपल्या अंर्तमनाला प्रश्न विचारून बघाच.  मालेगावातही अशाच जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचे जातीबाहेरचे प्रेमसंबंध उघड झाल्याने बळी घेतला. इथेही समाजात बदनामी होण्याच्या भीतीपायी आईने मुलीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. वडील व चुलत भावाने आपुल्याच लेकीचा-आपुल्याच बहिणीचा गळा आवळला. हे आपलं जिवाभावाचं. रक्तामांसाचं माणूस मारताना कोणतही दु:ख नाही. पण, जात किंवा सामाजिक प्रतिष्ठा मरता कामा नये. नेहा चौधरी या तरुण मुलीचा गळा आवळणार्‍या वडील शरद चौधरी, आई सुनीता चौधरी व चुलत भाऊ निलेश चौधरी यांची प्रतिष्ठा आता तुरुंगाची हवा खाण्यात जाणार आहे. काही वर्षांपूर्वी नवी दिल्ली नोएडा येथील आरुषी हत्याकांडातही आई-बापाच्या सामाजिक प्रतिष्ठेची चर्चा झाली होती. घरातील नोकरासोबत प्रेमसंबध जोडल्याच्या चुकीमुळे आरूषीचा बळी गेला होता. ही प्रतिष्ठा, ही जातवार गणना अनेक शिकल्या सवरलेल्यांसाठी भूषणावह आहे. अशा समाजभूषणांना गांधीगिरीने गौरवून त्यांच्यात खोलवर रूजलेली बुरसटलेल्या विचारांची जळमटं हटविण्याचा सार्वत्रिक कार्यकम आज विज्ञानयुगातही घेण्याची गरज वाटते, यापेक्षा मागासलेपण ते काय?

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support