Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

ठाणे ग्रामीण पोलिसांची ‘सुवर्ण’ कामगिरी मिरा-भाईंदर, शहापूर, मुरबाडमध्ये चोरांचा धुमाकूळ

सोनसाखळी चोरांना 20 लाखांच्या ऐवजासह उचलले!
 ठाणे । प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी टी-शर्ट परिधान करून शतपावली करणार्‍या पुरुष व महिलांना हेरून धूमस्टाईलने हातोहात सोनसाखळी लांबवणार्‍या तीन अट्टल चोरांच्या मुसक्या ठाणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत.ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, शहापूर, मुरबाड आणि गणेशपुरी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून धूम ठोकणार्‍या टोळीने नागरिकांत असुरक्षेचे वातावरण होते. मिरा-भाईंदरमधील एका घटनेत चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्याआधारे एका टोळीतील दोघांना गजाआड केले. तर खबर्‍यामुळे दुसर्‍या टोळीतील तिघांना अटक करणे पोलिसांना सोपे झाले.
सोनसाखळी चोरी नियंत्रणात आणण्यासाठी मिरा भाईंदर परिसरात नेमलेल्या पोलीस पथकाला रेकॉर्डवरील अट्टल सोनसाखळी चोरांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या पथकाने अधिक चोर्‍या होणार्‍या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.दुचाकीवरील चोरटे रेकॉर्डवरील नामचीन गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा अट्टल सोनसाखळी चोर परशुराम उर्फ अनू देजू सालियन (32 रा. विरार) आणि आनंदकुमार उर्फ सोनू समरबहादूर सिंह (28, अंधेरी, पूर्व) या दोघांना 28 सप्टेंबरला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
 मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असताना सालियन आणि आनंदकुमार यांची ओळख झाली होती. कारागृहातून सुटल्यानंतर या दोघांनी जबरी चोर्‍या सुरू केल्या होत्या. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने त्यांची मोडस ऑपरेंडी ओळखून दोघांना अटक केली. या दोघांनी 16 महिला व 8 पुरुषांच्या सोनसाखळ्या हिसकावल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून 4 दुचाकी आणि 5 सोनसाखळ्या अशा एकूण 9 गुन्ह्यांची उकल केली. तब्बल 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही टोळीतील आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी दिली.
कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्याआधारे एका टोळीतील दोघांना गजाआड केले. तर खबर्‍यामुळे दुसर्‍या टोळीतील तिघांना अटक करणे पोलिसांना सोपे झाले. सोनसाखळी चोरी नियंत्रणात आणण्यासाठी मिरा भाईंदर परिसरात नेमलेल्या पोलीस पथकाला रेकॉर्डवरील अट्टल सोनसाखळी चोरांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या पथकाने अधिक चोर्‍या होणार्‍या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरील चोरटे रेकॉर्डवरील नामचीन गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा अट्टल सोनसाखळी चोर परशुराम उर्फ अनू देजू सालियन (32 रा. विरार) आणि आनंदकुमार उर्फ सोनू समरबहादूर सिंह (28, अंधेरी, पूर्व) या दोघांना 28 सप्टेंबरला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असताना सालियन आणि आनंदकुमार यांची ओळख झाली होती. कारागृहातून सुटल्यानंतर या दोघांनी जबरी चोर्‍या सुरू केल्या होत्या. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने त्यांची मोडस ऑपरेंडी ओळखून दोघांना अटक केली. या दोघांनी 16 महिला व 8 पुरुषांच्या सोनसाखळ्या हिसकावल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 दुचाकी आणि 5 सोनसाखळ्या अशा एकूण 9 गुन्ह्यांची उकल केली. तब्बल 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही टोळीतील आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support