Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

स्वमग्न मुलांची माता अंबिका


प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते. आपल्याला होणारं बाळ हे स्वस्थ, सुंदर, छान, गुटगुटित असावं. पण.. पण, हेच मुल जेव्हा अपंगत्व घेऊन जन्माला येतं तेव्हा ? तेव्हा त्यांचं सुखी मुलाचं स्वप्न विस्कटतं. बरं ! अपंगत्वची लक्षण जेव्हा मुलं जन्माला येतं तेव्हा कळतात तरी. पण ! स्वमग्न मुलांचे काय हो ! ते अपत्य जसं जसं मोठं होतं जातं तसे तसे त्याच्यातलं व्यंग कळतं पालकांना. त्यावेळी जो धक्का बसतो ना तो मानसिक धक्का सहन न होण्यासारखा असतो. साधारण पंधरा वर्षापूर्वी अंबिका टाकळकर आणि त्यांच्या पतीनं पाहिलेलं सुखी मुलाचं चित्र असंच काहीसं विस्कटलं. मग सुरु झाला त्या चित्राला सावरण्याचा प्रयत्न.
 अगदी आनंदाने बाळाचं नाव ठेवलं श्रीहरी. तो मोठा होऊ लागला तसं तसं अंबिकाला त्याच्यामध्ये काही तरी कमतरता असल्याचं जाणवू लागलं. काही चाचण्यानंतर तो ऑटिस्टीक (स्वमग्न) असल्याचं निष्पन्न झालं आणि अंबिका यांचं स्वमग्न असणार्‍यांच्या जगात पहिलं पाऊल पडलं. मुलगा जरी स्वमग्न असला तरी त्याला काही विशेष थेरपी देऊन स्वमग्नेतेचे प्रमाण काही अंशी कमी करु शकतात याची माहिती त्यांना मिळाली. त्यातून शोध सुरु झाला अशा मुलांच्या विशेष थेरपी सेंटरचा. श्रीहरीला विविध थेरपी देण्यासाठी शहरात, औरंगाबादमध्ये, मराठवाड्यात सर्वत्र धावपळ करावी लागत होती. ती धावपळ करताना त्यांच्या लक्षात आले की केवळ औरंगाबाद येथेच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात स्वमग्न मुलांसाठी एकही थेरपीचे केंद्र नाही. एकीकडे ससेहोलपट होत होतीच. पण, त्याचवेळी मनही अस्वस्थ होत होते ते अशा अन्य अनेक दिव्यांग मुलांसाठी. काही दिव्यांग मुलांचे पालक आपल्या मुलांना अशा विशेष प्रशिक्षणाची गरज आहे हे मान्य करुनच घेत नव्हते. अशावेळी त्या पालकांना त्यांचे मुल स्वावलंबी होऊ शकते हा विश्वास देणे आवश्यक होते. हा विश्वास देतानाच अशा मुलांना विशेष थेरपी एकाच ठिकाणी मिळतील अशा सेंटरची निर्मिती करण्याची गरजही होती. स्वतःच्या मनात असलेल्या कल्पना आणि इतर पालकांच्या गरजा ओळखून एक अदययावत व आधुनिक सेंटर मराठवाड्यात असावं याचा ध्यास त्यांनी घेतला. कल्पना जरी एकाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेकांचे योगदान लागते. सौ. अंबिका टाकळकर, त्यांचे पती, पुण्यातील डॉक्टर अमिता पुरोहित, बेळगावचे शंशाक कोणो आणि सामाजिक जाणिवेतून एकत्र आलेले मिलिंद कंक हे सारे मैत्रजण एकत्र आले आणि 4 नोव्हेंबर 2011 रोजी आरंभचा पाया रचला गेला.
आरंभची निर्मिती तर झाली. परंतु, या सेंटरसाठी लागणार्‍या विशेष प्रशिक्षकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा अंबिका टाकळकर यांनी पुढील शिक्षण घेत विशेष बी.एड.ची अर्हता प्राप्त केली. शिवाय या विशेष मुलांसाठी योग्य प्रशिक्षण देणारा व अर्हता प्राप्त असणाराच शिक्षकवर्ग नेमून दिला. यामुळे प्रत्येक मुलाच्या विशेष गरजा ओळखून त्याचे समायोजन करणे सोपे झाले. विविध थेरपीद्वारा मुलांच्या क्षमता विकसित करण्यावर अंबिका टाकळकर यांनी भर दिला. अ‍ॅक्युपेशनल थेरपी, प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ड्रामा थेरपी, मास्क थेरपी, स्पिच थेरपी, फिजिओथेरपी अशा विविध थेरपी देतानाच त्यांनी आवाज या अदययावत थेरपीचा प्रयोग सुरु केला. समोरच्यांशी न बोलता आपल्या भावना दुसर्‍या माध्यमाच्या सहाय्याने त्याच्यापर्यंत पोहोचविणे हा या थेरपीचा उपयोग. 2 एप्रिल 2012 ला ऑटीझम डे च्या दिवशी हे आधुनिक तंत्रज्ञान आरंभमध्ये आणण्यात आले.
अ‍ॅक्युपेशनल थेरपीमुळे मुलांना अति उत्तेजित भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. लवकर ती सामान्य होतात. प्ले थेरपीच्या माध्यमातून आपल्यातील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरुन मोकळ्या वातावरणात आनंद घेऊन खेळातून अनेक छोट्या छोट्या गोष्टी मुलांना शिकायला मिळतात. मुलांसाठी आवश्यक गोष्टी खेळाच्या माधमातून शिकवल्या जातात. जीवनातल्या भावना समजण्यासाठी मनोरंजन सर्वात मोठा आधार. ड्रामा थेरपीद्वारे विविध भावनांचे प्रकटीकरण कसे करायचे हे हसत खेळत मुले शिकतात. याचे प्रशिक्षण अंबिका टाकळकर यांनी चेन्नईत तीन दिवस राहून स्वतः घेतले. अन्य मुलांप्रमाणे इतरांच्या नजरेला नजर स्वमग्न मुले देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मास्क थेरपी दिली जाते. विविध रंगीबेरंगी मुखवटे हे विविध भावना दर्शवतात व फक्त डोळे उघडे व बाकी चेहर्‍यावर मुखवटा त्यामुळे नजर देणे ह्या मुलांना शक्य होते जे ते सामान्यतः करत नाहीत.
प्रत्येक व्यक्तीत काहीतरी सुप्त गुण असतातच. फक्त गरज असते ते ओळखण्याची. स्वमग्न मुले या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुध्दी ही सामान्य मुलांप्रमाणे असते. त्यांच्यातले हे सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यमातून सुरु केले. या आर्ट झोनमध्ये 10 वर्षांवरील मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार प्रशिक्षण दिले जाते. सुंदर कलात्मक वस्तुंची निर्मिती करुन त्याचे प्रदर्शन व विक्री करून स्वमग्न मुलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. आरंभ आर्ट झोनमध्ये औरंगाबाद येथे प्रथमच ब्लॉक पेंटींगचे रुमाल, विविध आकाराच्या आकर्षक आणि बहुपयोगी अशा रांगोळ्या, पणत्या, सांजवातीसह आकर्षक मेणबत्या, दिवाळीसाठी उपयुक्त लिफाफे आणि ग्रीटींग कार्ड, प्रदूषण मुक्त पेपरबॅग, सुतळीपासून लेटर हँगिंग, ग्लास पेंटिंग आणि पेंटिंग फ्रेम्स तयार करण्यात आली. याचे प्रशिक्षण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिले जाते. संस्थेत पूर्ण वेळ काम करणारे कला शिक्षकही या मुलांकडून ही मेहनत करुन घेतात.
या स्वमग्न मुलांना सदैव नवनवीन कल्पना घेऊन काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न असतो. आणि तो काही अंशी फलदायीही ठरला. मिळालेल्या नफ्यातून मुलांची बँक खाती खोलण्यात आली. दर महिन्याला त्यांना काही रक्कम चेकद्वारे दिली जाते. आरंभच्या छोट्या मित्रांनी स्वयंपूर्णतेकडे उचललेले हे पहिले पाऊल.
 चेन्नई येथे विशेष नाट्य प्रशिक्षणाची तीन दिवसीय कार्यशाळा अंबिका टाकळकर यांनी केली. ज्याचा उपयोग नाटकांच्या दिग्दर्शनासाठी झाला. मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतानाच विविध ठिकाणी सहलीसाठीही नेण्यात येते. ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव मुलांनी पर्वतारोहण करुन मिळवला. याचसोबत मुलांच्या समस्या व पालकांना येणार्‍या अडचणी, त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी वेळोवेळी पालकांसाठीही कार्यशाळा घेण्यात येतात. स्वमग्न जागृती सप्ताहानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पालक आपल्या स्वमग्न मुलांच्या सामाजिक वर्तणुकीवर नाराज असतात. त्यामुळे आपल्या पाल्याला कुठे घेऊन जाण्यास उत्सूक नसतात. ही गोष्ट हेरून आरंभने सर्व मुलांना काही पालकांची नाराजी असतानाही त्यांना तयार करुन मुलांसहीत बर्फी चित्रपट बघण्यास नेले. या मुलांनी चित्रपटाचा घेतलेला आनंद पाहून नकळत पालकांचेही डोळे पाणावले होते.
 आज आरंभमध्ये 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी केवळ 12 ते 13 विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असून अन्य विद्यार्थ्यांना येथे मोफत शिक्षण दिले जाते. एका संस्थेचा डोलारा सांभाळणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. पण न डगमगता हाती घेतलेला वसा पूर्ण करण्याचा विडा अंबिका टाकळकर यांनी उचलला आहे. आरंभमधील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणं, त्यांना स्वावलंबी बनविणे, समाजात स्वमग्न मुलांविषयी जागृती करुन त्या मुलांना विशेष शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करण्याचं काम अंबिका टाकळकर यांनी हाती घेतले. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अंबेमातेची विविध नऊ रुपांची पुजा आपण सारेच करतो. पण, स्वमग्न मुलांसाठी काम करणार्‍या आणि विशेष म्हणजे अंबेचं नाव धारण करणार्‍या अंबिका टाकळकर या आजच्या युगातील नवदुर्गांपैकी एका दुर्गेचं रुप आहे असं म्हणायला
हरकत नाही.
(लेखक हे सामाजिक, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील पत्रकार आहेत.)
अधिक माहितीसाठी संपर्क 9987269476
                                                             -महेश पवार
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support