Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

राजकारणातून समाजकार्यही अ‍ॅड. अनिता गौरी


लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या अ‍ॅड.अनिता गौरी यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजोपयोगासाठी तर केलाच शिवाय ठाणे महापालिकेतही इतिहास रचला. ठाणे महापिलेकेच्या सभागृहनेते पदी अ‍ॅड. अनिता गौरी निवडून आल्या आणि पुरुषांची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. उच्चशिक्षणाचा ध्यास लागलेल्या अ‍ॅड.अनिता गौरी यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार वकिलीचे शिक्षण घेतले. अ‍ॅड.गौरी यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर रमाकांत ओवळेकर यांच्या हाताखाली वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली. ही प्रॅक्टिस सुरू असताना अनेक शेतकर्‍यांच्या जमिनीसंदर्भातील समस्या त्यांच्या लक्षात आल्या. खारीगाव, पनवेल, पेण, अलिबाग येथील विविध जमिनींच्या केसेस अ‍ॅड.गौरी यांनी लढवल्या.
वकिलीची ही प्रॅक्टिस सुरू असतानाच सासरे आमदार जनार्दन गौरी आणि वडिल आर.सी. पाटील यांनी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. सासरे आणि वडिल यांच्या मार्गदर्शनानुसार अ‍ॅड.गौरी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सामान्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या. त्यांच्या या समाजसेवेच्या वृत्तीमुळे कळवा-खारीगाव, पारसिक नगरमधून त्या सलग तीनवेळा निवडून आल्या. प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अडीअडचणी तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या सातत्यापूर्ण आयोजनामुळे नागरिक त्यांना बहुमताने निवडून देत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन तसेच त्यांच्यातील गुणांची पारख करून ठाणे पालिकेने त्यांची अडीच वर्षांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी निवड केली होती. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महिलेला सभागृहगनेतेपद मिळाले आहे. अनिता गौरी सभागृहनेत्या असताना त्यांनी खारीगाव येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरण केले. नगरसेविकाच्या कार्यकाळात प्रभागात स्वातंत्र्यसैनिक कै.हरी पाटील उद्यानाचे नूतनीकरण थीम पार्कच्या आधारावर केले. परिसरात असलेल्या गणेश विद्यालयाच्या त्या सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. या विद्यालयाच्या क्रीडांगणात त्यांनी सुसज्ज साधनसामुग्रीयुक्त पेव्हर ब्लॉक, रिक्षा आणि बस स्टॅन्ड येथे आकर्षक शेड बांधून दिल्या. ज्येष्ठांसाठी वाचनालय, ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचीही सोय अ‍ॅड.गौरी यांनी करून दिली आहे. सामाजिक कार्याव्यतिरिक्त त्या शैक्षणिक कार्यातही अग्रेसर आहेत. अलिबाग येथील कोकण एज्यूकेशन संस्थेच्या समितीवर त्यांनी बरीच वर्षे काम केले. संपूर्ण रायगड जिल्ह्यात या संस्थेच्या 108 शाळा आणि तीन ते चार महाविद्यालये आहेत. त्यातील दोन मेडिकल कॉलेजही आहेत. 2007 ते 2012 या कालावधीत गैरी कोकण एज्यूकेशन संस्थेच्या उपाध्यक्षा होत्या तर 2012 आणि 2013 ही दोन वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
                                                                                    -अशोक घाग
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support