Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे वादग्रस्त विधान

 एसटीने घसघशीत पगारवाढ दिल्यामुळे कर्मचारी वेडे झालेत!

औरंगाबाद । प्रतिनिधी
एसटी कर्मचार्‍यांचे एवढे पगार वाढलेत की ते वेडे झालेत,  असे वादग्रस्त विधान राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे केले. महापालिका व एसटीच्या वतीने स्मार्टसिटी अंतर्गत चालवण्यात येणार्‍या शहर बस संदर्भात रावते पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सदर विधान केले.

औरंगाबाद महापालिकेच्या वतीने शहरात स्मार्टसिटी अंतर्गत सिटीबस चालवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने परिवहन मंडळाशी 125 बसेसेचा करार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना रावते यांनी या कराराची अधिकृत माहिती दिली. 
गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या काळात राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तेव्हा एसटी महामंडाळाचे कोट्यावंधीचे नुकसान झाले होते. तसेच नागरिकांचे देखील प्रचंड हाल झाले होते. या संदर्भात एसटी कर्मचार्‍यांच्या पगारवाढी संदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारताच  तुम्ही कुठल्या सालात जगत आहात, असा प्रश्न करत रावते यांनी संताप व्यक्त केला. 
एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढलेत की ते वेडे झालेत, असे वादग्रस्त विधान दिवाकर रावते यांनी केले. हे मी अधिकृतपणे बोलतोय हे सांगायला देखील ते विसरले नाही. जास्तीचे काम करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना आम्ही अतिरिक्त कामाचे पैसे देखील देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी  झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आणि औरंगाबाद महापालिका आयुक्त विनायक निपुण यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी खासदार  चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, उपायुक्त वर्षा ठाकूर आदींसह वरिष्ठ अधिकारी-पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 
एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळादरम्यान झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ 100 मिडी बसेस खरेदी करून एसटी महामंडळाला देणार आहे. त्याद्वारे एसटी महामंडळ औरंगाबाद शहरांतर्गत या बसेसची सेवा सुरु करण्यात आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत पहिल्या टप्यातील 50 मिडी बसेस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतील तर उर्वरित 50 बसेस पुढील वर्षी जानेवारी - फेब्रुवारी मध्ये प्राप्त होतील. एसटी महामंडळ आपल्या चालक - वाहकांमार्फत या बसेसची वाहतूक करणार आहे
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support