Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

भिवंडीतील करचुकव्यांना महापालिकेचे ‘अभय’ नाही!

 आयुक्तांचा दणका, वसुली न केल्यास कर्मचार्‍यांची 40 टक्के पगार कपात

भिवंडी । प्रतिनिधी
भिवंडी महापालिका क्षेत्रात गेली दोन वर्षे अभय योजने अंतर्गत मालमत्ता करावर व्याज माफी देण्यात आली होती. त्यानंतरही थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम भरत नाहीत, हे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. यंदा अभय योजना लागू होणार नाही, असे जाहीर करून त्यांनी करचुकव्यांना दणका दिला आहे.
तसेच कर्मचारी व अधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन करवसुली मोहीम राबवावी. या कामात कसूर केल्यास पगार कपात व निलंबनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेकडून व्याज माफी मिळेल या अपेक्षेने नागरिक करभरण्यास टाळाटाळ करत आहेत. ही बाब प्रशासनातील वसुली विभागाने आयुक्त मनोहर हिरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
मालमत्ताधारक त्यांच्या थकित कराची रक्कम भरत नसेल अशा मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करा, पाणीपट्टी खंडित करा, विद्युत पुरवठा खंडित करा आणि थकबाकीदार करदात्यांवर कारवाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्त हिरे यांनी दिल्या आहेत. या कामासाठी पालिका कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी कार्यालयाबाहेर पडले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी वसुलीच्या कामात दिरंगाई, हलगर्जी करतील त्या कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई म्हणून 40% टक्के पगार कपात करण्याचे आदेश आयुक्त मनोहर हिरे यांनी सर्व प्रभाग अधिकार्‍यांना दिले आहेत.
वास्तविक गेल्या वर्षापासून मालमत्ता कराबरोबर प्रत्येक मालमत्तेला 1500 जलकर लागू केला आहे. त्यामुळे एकाच इमारतीसाठी लागणारी पाणीपट्टी आता प्रत्येक सदनिकाधारकास भरावी लागत आहे. इमारतीमधील फ्लॅटधारकाच्या घरांत सोसायटीच्या नळातून पाणी पुरवठा होत आहे. पालिकेचा थेट पाणीपुरवठा करणारा नळ नसताना हा जलकर जबरदस्तीने लावल्याची भावना करदात्यांत आहे. अनेक झोपडपट्टीत थेट पालिकेकडून पाणीपुरवठा करणारे नळ नसताना त्यांना जलकर लागू केल्याने असंतोष पसरला आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवकही या संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेता मौनीबाबा बनले आहेत. 

नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. सध्या अनेक ठिकाणी कर आकारणी होत नसल्याने महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट होत आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली होती. मात्र त्यास प्रतिसाद न दिल्याने ती आता बंद करण्यात आली आहे.
-मनोहर हिरे, आयुक्त, भिवंडी, महापालिका

भिवंडी महापालिका प्रशासन मालमत्ता कर आकारणी करून घेते. मात्र नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिक कर भरण्यासाठी तयार नाहीत. 
- रामदास दानवले, सामाजिक कार्यकर्ते
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support