This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

सातत्याने नवीन काही तरी करण्याचा तेजश्रीचा प्रयत्न

 सामाजिक प्रश्नांना भिडण्याची तेजतर्रार उर्मी

कल्याण । कुणाल म्हात्रे
तेजस्वीचे वडील शिक्षक असल्याने तिचं संपूर्ण शिक्षण बदलापुरात झालं. 8 वी पर्यंत मराठी त्यानंतर सेमी इंग्रजी पुढे उल्हासनगराच्या चांदीबाई महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण कला शाखेतून घेतले पण आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा तिला सरधोपट वाटेपासून वेगळ्या वाटेवर घेऊन गेला. आजोबा सलग 15 वर्ष गावांचे सरपंच आणि वडील उत्कृष्ट समुपदेशक या दोघांच्या कामांतुन प्रेरणा घेवून 12 वी नंतर तिने मुंबईच्या निर्मला निकेतन येथे समाजकार्यातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि खर्‍या अर्थाने तेजश्रीच्या वाटचालीला सुरुवात झाली.
पहिल्याच वर्षी प्रा. समन अफ्रोज यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेबरोबर महिला सबलीकरण या विषयावर काम करण्याची तिला संधी मिळाली. दुसर्‍या वर्षी प्रा. प्रभा तिरमारे आणि उल्का महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वहारा जन आंदोलन या संघटनेबरोबर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जनजागरण कसे उभारायला हवे याचे बारकावे तिने अनुभवले आणि तिसर्‍या वर्षी प्रा. वैजयंता आनंद आणि स्वाती मुखर्जी यांच्याबरोबर दि वात्सल्य फाउंडेशन बरोबर शिक्षणविषयक व्यापक काम जवळून हाताळण्याची संधी तिला प्राप्त झाली. याच काळात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कार्यकर्ता शिबीर, भारतीय छात्र सांसद, ग्रामीण अध्ययन शिबीर धुळे- मुंबई तसेच विविध युवामेळावे आणि चर्चासत्रे यांतील सहभागाने तिच्यातील सामाजिक कार्यकर्ती घडत होती.
भारत आणि श्रीलंका या दोन देशांतील पर्यावरण, युवकांचे प्रश्न आणि शिक्षणाची परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तेजश्रीने नुकताच श्रीलंका येथे अभ्यासदौरा केला. भारतीय छात्र संसदेत या अभ्यासदौर्‍याच्या अहवालाचे लोकार्पण झाले त्यावेळीं श्रीलंका दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघातील एकमेव मुलगी म्हणून आपल्या देशाची प्रतिभाताई पाटील असे यावेळी तेजश्रीला संबोधले गेले. तेजश्री सातत्याने युवकांचे प्रश्न, त्यातही फी वाढ आणि महिलांच्या समस्या यांवर व्यक्त होत असते.
सध्या तेजश्री विविध सामाजिक संस्थाबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. यांत प्रामुख्याने अंघोळीची गोळी या संस्थेबरोबर पाणी बचतीसाठी प्रयत्न करत आहे. विविध ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी तिची धडपड सुरू असते. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत हे सांगणारी अंघोळीची गोळी तेजश्री स्वतः तर घेतेच शिवाय इतरांनाही पाण्याचे महत्व आणि बचतीची गरज पटवून देते. त्याचबरोबर साद फाउंडेशन, अंबरनाथ या संस्थेबरोबर तेजश्री एकंदरच आदर्श गावं या संकल्पनेवर काम करत आहे. यांत प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य या विषयांवर तिचे कार्य सुरू असते.
 कोणतेही सामाजिक काम करतांना आपली स्वतःचीही ग्रोथ होत असते, विविध क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांशी ओळख होते, एकमेकांचे अनुभव, ज्ञानाची देवाणघेवाण करता येते. या सर्व गोष्टींतून तुम्हांला एक व्यक्ती म्हणून बरेच काही शिकता येते, असे अनुभवाचे बोल तेजश्रीने सांगितले.
पुस्तकांनी तिचं आयुष्य समृद्ध केले आहे. यामुळेच गाव तिथे ग्रंथालय या मोहिमेत सक्रिय योगदान देताना मुंबई ठाणे शहर परिसरात घेतलेल्या पुस्तकं संकलन मोहिमेत तेजश्री आणि तिच्या संपूर्ण टीमने लक्षवेधी कामगिरी केली. एकत्रित प्रयत्नांतून त्यांनी आजवर चार ठिकाणी ग्रंथालय उभारण्यासाठी पुस्तके दिली. जुनी, वाचुन झालेली पुस्तके संकलन करणारी तेजश्री आणि तिची टीम पुस्तकांबरोबर मोठ्या प्रमाणात जुने कपडे देखील जमा करतात आणि दुर्गम आदिवासी भागांत वाटतात.
पुढील काळात शिक्षणाबरोबरच पर्यावरण, महिलांचे आरोग्य आणि प्रामुख्याने पाणी प्रश्नांवर काम करण्याचा तेजश्रीचा मानस आहे. किमान आपल्या वैयक्तिक प्रश्नांसाठी तरी युवकांनी संघटीत व्हावं, व्यक्त व्हावं, यासाठी तेजश्री आपल्या संवाद कौशल्यातून आणि चळवळीच्या गाण्यांतून शाळेतील मुलांबरोबर, युवकांबरोबर सातत्याने संवाद साधते.
मी काहीच केलं नाही, फक्त सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न असतो, असे तेजश्री आवर्जून सर्वांना सांगते.
सामाजिक, राजकीय परिस्थिती कितीही अस्वस्थ करणारी असली तरी त्या अस्वस्थतेला उत्तर आहे ते म्हणजे  जात, धर्म, लिंग कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करणे, असे या तेजतर्रार तेजश्रीचे आजच्या युवापिढीला सांगणे आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support