Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

उल्हासनगरच्या पेट्रोल पंपांवर अवतरल्या सेल्सवुमन!

दसर्‍यानिमित्त आगळे सीमोल्लंघन
नोकरीच्या पहिल्याच दिवशी 12 वी पास संगिता सोनावणे यांना विचारले असता त्यांना पंप व्यस्थापनाने प्रशिक्षण कालावधीचा दिलेला पगार आणि जीवन विमा काढल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अन्य महिला कर्मचारी मंदाकिनी कनोजिया यांना आपत्कालिन व्यवस्थापनाबाबत विचारले असता महिनाभराच्या प्रशिक्षणामुळे आम्ही कोणतीही परिस्थिती हाताळू शकतो, असे सांगितले.
 उल्हासनगर । प्रतिनिधी
तोंडात गुटख्याचा तोबरा भरून अरेरावीची भाषा करणार्‍या पेट्रोल विक्रेत्या पुरूष सेल्समनना आता दसर्‍याच्या मुहूर्तावर मोठा झटका बसला आहे.त्यांची ही गुंडगिरी मोडित काढण्यासाठी आता सेल्सवुमन यांची उल्हासनगरातील पेट्रोल पंपांवर नेमणूक करण्यात आली आहे. ग्राहकांसोबत आदराने, आपुलकीने संवाद साधणार्‍या या महिलांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केले आहे. त्यामुळे श्रीराम चौकातील पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भरताना मोठ्या प्रमाणावर महिला दिसणार आहेत.
प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिलांनी आता पेट्रोल पंपावरील सेल्सवुमनचा रोजगार हसत हसत स्वीकारला आहे. 
उल्हासनगर कॅम्प 4 च्या श्रीराम चौकात शांता स्टेशन हा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर सेल्समन आणि ग्राहक यांच्यात नेहमीच खटके उडत होते. यावर उपाय म्हणून पेट्रोल पंप व्यवस्थापनाने वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी थेट सुशिक्षित मुलींना पेट्रोल पंपावर नोकरी देण्याचे ठरवले. मात्र पेट्रोल पंपावर काम करणे, हे धोक्याचे काम असल्याने कोणतीही महिला सुरुवातीस तयार होत नव्हती. महिनाभरापूर्वी 10 सुशिक्षित महिला पंप व्यवस्थापनाच्या संपर्कात आल्या. त्यांनी या महिलांना पंपावर काम कसे करायचे, ग्राहकांशी कशाप्रकारे संवाद साधायचा याचे प्रशिक्षण दिले.
गुरुवारी दसर्‍याच्या दिवशी 10 महिलांना शांता स्टेशन पेट्रोल पंप व्यवस्थापनाने नोकरी दिली. त्यांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाणार असल्याचे पंप व्यवस्थापक विजय थारवानी यांनी सांगितले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support