Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

उल्हासनगरात गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडसत्र


 उल्हासनगर । प्रतिनिधी
हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरनाथ तालुक्यातील खरडगाव व वसारगाव परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार खरडगाव येथील शंकर मंदिराच्या मागे असलेल्या परिसरात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष घनश्याम पलंगे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस हवालदार आसवले, पोलीस नाईक प्रविण पाटील, पो.कॉ.सुदिप भिंगारदिवे, थोरवे, लोंढे यशवंत कुंदे यांनी रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी धाड टाकली. त्याठिकाणी 25 प्लास्टिकच्या ड्रममध्ये प्रत्येकी 200 लिटर सडका गुळ व नवसागर मिश्रीत रसायनाचा साठा सुमारे 5 हजार लिटरचा माल पोलिसांनी त्याठिकाणी उद्ध्वस्त केला. 105 लिटर गावठी दारू व गावठी दारू बनविण्यासाठी लागणारी सामग्री, एक मिनीडोअर गाडी असा 1 लाख 80 हजार 500 रूपयाचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई यशवंत कुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत व निलेश या दोघांविरूध्द हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
दुसरी घटना वसारगाव शिवार येथील ताडाचे शेड नसलेल्या झाडाच्या बाजूला सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी 5 हजार लिटर गावठी दारूसाठी लागणारा नवसागर गुळमिश्रीत रसायनाचा साठा सुमारे 1 लाख 9 हजार रूपये किंमतीचा पोलिसांनी उध्वस्त केला. पोलीस शिपाई प्रदिप लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम या इसमाविरूध्द हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आसवले करीत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support