This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

वृत्तपत्र विक्रेत्यांना कधी मिळणार न्याय?


भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच वृत्तपत्र. याच वृत्तपत्र समुहाचा महत्वाचा घटक म्हणून वृत्तपत्र विक्रेत्याकडे पाहिले जातेे. हा वृत्तपत्र विक्रेता सकाळी चार वाजल्यापासून थंडी, पावसाची पर्वा न करता आपला व्यवसाय गेली अनेक वर्षे इमाने इतबारे करीत आहे. असे असतानाही, हा घटक शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहे. शासनाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांनसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे व योजनांच्या घोषणा केल्या पण अद्यापही त्याची कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इमाने इतबारे वृत्तपत्र विक्रिचे काम करणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनी विक्रेत्यांकडून विचारला जात आहे.
वृत्तपत्र विक्रेता दिवस हा वृत्तपत्र विक्रेत्यांना समर्पित आहे. ते वर्षाचे 360 दिवस सतत काम करून 3 ते 4 तासात भारतातील करोडो घरांपर्यंत वृत्तपत्र पोहचवतात. समाजाचे लक्ष वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अथक परिश्रमाकडे वेधणे आणि त्यांच्या 99 टक्के अचूक वृत्तपत्रे वितरणाची प्रशंसा करणे हे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. वृत्तपत्र उद्योगाचा महत्वाचा भाग असूनही भारतीय समाजामध्ये वृत्तपत्रे विक्रेत्यांचे स्थान आणि आदर यावर प्रश्नचिन्हच आहे. 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकडे आणि त्यांच्या विकासाकडे एक पाऊल असेल. प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याला आपल्या कामाचा अभिमान आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम म्हणजे कठीण परिश्रम, सहनशीलता, कोणत्याही परिस्थिती मध्ये काम करण्याची जिद्द आणि 100 टक्के शारीरिक आणि मानसिक परिश्रम यांचे एक जिवंत उदाहरण आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी वृत्तपत्र वितरण करण्याचे काम करून आपल्या कार्यकीर्दीला सुरुवात केली. आज ते आपापल्या क्षेत्रात महत्वाच्या सरकारी हुद्द्यावर आहेत. काही जण नेतेही झाले आहेत. प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यांचे पूर्ण लक्ष वर्तमान पत्राच्या वितरणाकडे असते आणि हे करत असताना कित्येकदा आम्ही आमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला मुकावे लागत असल्याच्या भावना देखिल अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगारांच्या कल्याणकारी महामंडळामध्ये सामील करून घेऊन व नोंदणी करून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध सघंटनांकडून करण्यात येत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे सर्व स्टॉल कायमस्वरूपी करण्यात यावेत. विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात यावी, घरकुल योजना, अपघात विमा संरक्षण, मेडिक्लेम, पेन्शन योजना सरकारने लवकरात लवकर लागू करावेत. शिवाय वृत्तपत्र वितरणासाठी शेड व्यवस्था करावी जेणेकरून पावसाळ्यात वितरणासाठी त्रास होणार नाही आदी मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या या मागण्यांची कोणत्याही प्रकारची दखल शासनाकडून घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन झाला पण वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल विचारला जात आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support