Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

माणुसकी नसेल तर विद्वत्ता कवडीमोल

पुलित्झर पारितोषिक हे जागतिक दर्जाचं पत्रकारितेत सर्वोच्च कामगिरी करणार्‍या पत्रकारासाठीचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक 1993 वर्षासाठी केव्हीन कार्टर नावाच्या दक्षिण आफ्रिकी पत्रकारास मिळाल होतं. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जगभरात त्याची वाहवा झाली. तरीही सन्मान प्राप्त झाल्यानंतरच्या थोड्याच दिवसांत त्यांनी नैराश्याने ग्रासून आत्महत्या केली! काय झाले असेल बरे? झाले असे, की तेव्हा सूदान (आफ्रिकेतील एक देश) मध्ये भयंकर दुष्काळ पडलेला होता. हजारो लोकांचे प्राण उपासमारीपायी गेले होते. त्या वेळीच एक बालिका एका निर्जन स्थळी भुकेने व्याकूळ होऊन अन्नासाठी तडफडत होती! आणि थोड्या अंतरावरच एक गिधाड तिच्या मरणाची वाट पाहात, त्या मुलीकडे पाहात होते! (कारण गिधाड फक्त मृत प्राण्यांचेच मांस खातो) हा प्रसंग पत्रकार केव्हिन कार्टर याने कॅमेर्‍यात टिपला, आणि वृत्तपत्रात ते छायाचित्र The vulture and the little girl या शिर्षकाने प्रसिद्ध झाले, आणि त्याबद्दलच कार्टरला पुलित्झर पुरस्कार देण्यात आला! त्यानंतर ठिकठिकाणी त्याचे सत्कार समारंभ वगैरे झाले! एकदा एका कार्यक्रमात त्याला एका श्रोत्याने प्रश्न विचारला,
कार्टरसाहेब, बाकी सोडून द्या, पण त्या मुलीचे पुढे काय झाले? सध्या ती कशी आहे? याबद्दल थोडे सांगाल का?  तर त्यावर कार्टरने उत्तर दिले, की मला माहित नाही! मला फ्लाईट (विमान) पकडायची होती, मी ताबडतोब तेथून निघून गेलो! त्यावर तो श्रोता संतापून म्हणाला, म्हणजे त्या ठिकाणी दोन गिधाडे होती, पैकी एकाच्या हातात कॅमेरा होता!
झाले, कार्टर पश्चातापाने तळमळू लागला, त्यातच त्यास नैराश्य आले, व शेवटी त्याने आत्महत्या केली! जर त्यावेळी कार्टरने स्वतः च्या प्रवासाची चिंता न करता त्या मुलीस यूनोच्या भोजन-शिबिरापर्यंत पोचविले असते, तर केव्हिन कार्टर हा व्यक्ती जिवंत असता!
सारांश, आपण कितीही विद्वान असू, किंवा कोणत्याही मोठ्या पदावर असू, वेळोवेळी आपणास मानव असण्याचे, आपल्यात माणुसकी शिल्लक असण्याचे प्रत्यक्ष प्रमाण द्यावेच लागेल, अन्यथा आपल्या हुशारीस अथवा विद्वत्तेस काहीच किंमत राहणार नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support