Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

आयुक्तांसोबत बोलणी फिस्कटली, म्युनिसिपल कर्मचारी युनियन मागणीवर ठाम

केडीएमसी कर्मचार्‍यांना हवा 25 हजार रुपये बोनस 

  कल्याण । प्रतिनिधी
केडीएमसी मुख्यालयात झालेल्या द्वारसभेत म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी यंदा दिवाळीसाठी 25 हजार बोनसची मागणी केली आहे. याबाबत महापौर दालनात आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत बोनसबाबत बोलणी फिस्कटल्याने ठोस निर्णय होऊ शकला नाही. मात्र बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 
केडीएमसीकडे सरकारकडून मिळणारे अनुदान व कर विभागाकडून होणारी वसुलीतून कसाबसा कर्मचार्‍यांचा पगार काढला जात आहे. विकास कामासाठी निधी अपुरा पडत असल्याने विकासकामे रखडून पडली आहेत. मात्र तरीही दिवाळीनिमित्त कर्मचार्‍यांना बोनस देण्याची पद्धत आहे. यंदाही म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका कर्मचारी, बालवाडी शिक्षिका,  ठोक पगारी कामगार अशा तब्बल 6  हजार 300 कर्मचार्‍यांना 25 हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी करत कामगार संघटनेने सोमवारी दुपारी  कामगारांची द्वारसभा घेतली. या सभेला युनियनचे उपाध्यक्ष रवी पाटील व प्रकाश पेणकर यांच्यासह अजय पवार, सुनील पवार, रमाकांत जोशी, संजय भालेराव आदी पदाधिकारी होते. आयुक्त गोविंद बोडके यांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांना बोलावून बोनसच्या मागणीवर सायंकाळी 4 वाजता बैठक घेतली जाईल, असे सांगितले.
महापौर दालनात आयुक्तांसमवेत चार वाजता पार पडलेल्या बैठकीत आयुक्तांनी पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याचे सांगत 25 हजार बोनसची मागणी पूर्ण करण्याबाबत असमर्थता दर्शवली. मात्र कामगार संघटनेचे पदाधिकारी  25 हजार रुपये बोनसच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे बोनसबाबत येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार होणार असून या बैठकीत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support