Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

नाशिकमध्ये सप्तशृंगी देवी दर्शनाने यात्रेला सुरुवात


आजपासून भाजपा महिलांचा मोर्चा शक्तिपीठांकडे
मुंबई । प्र्रतिनिधी
नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील शक्तिपीठांना व प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तिचा’ही 2200 किमीची यात्रा बुधवार 10 ऑक्टोबर रोजी नाशिक येथून सुरू करण्याचे ठरवले आहे.
नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचे दर्शन, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली, सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंना प्रणाम, परभणी येथे संत जनाबाई यांचे स्मरण, नांदेडमध्ये भिमाई यांना नमन, उस्मानाबाद येथे राजमाता विजयाराजे शिंदे यांना आदरांजली, कोल्हापूर येथे ताराराणी यांना अभिवादन तर सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण असे यात्रेतील कार्यक्रमाचे स्वरूप असेल. ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील यशस्वी भगिनींचा सन्मान करण्यात येईल तसेच भाजपा सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात येईल.
शेतकरी महिला संमेलन, बचतगट मेळावा, आंगणवाडी सेविकांचा सन्मान, महिला किर्तनकारांचा सत्कार, अनुसूचित जाती - जमातींच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणारा मेळावा, महिला लोकप्रतिनिधी संमेलन, सैनिकांच्या विधवांचा सत्कार आणि विद्यार्थिनींचा मेळावा असा भरगच्च कार्यक्रम यात्रेदरम्यान आखण्यात आला आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा कांता नलावडे, माजी प्रदेशाध्यक्षा नीता केळकर व आ. स्मिता वाघ या यात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपाच्या ठिकठिकाणच्या खासदार, आमदार, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या आदी लोकप्रतिनिधी विविध ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होतील.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support