Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

वाचन प्रेरणा दिनी अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना आगळे अभिवादन

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्सप्रेसमध्ये आजपासून फिरते ग्रंथालय
  मुंबई । प्रतिनिधी
राज्यात सोमवारी साजर्‍या होणार्‍या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून यंदापासून रेल्वेत लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) संकल्पना सुरू करण्यात येत असून याचा आरंभ सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस या दोन गाडयांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होत असून प्रवाशांना आता प्रवासातच वाचनाचा आनंद मिळणार आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी म्हणजे 15 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.
गेल्या तीन वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आता फिरते ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांमध्ये (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरू होत आहे.

15 ऑक्टोबरपासून या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मराठी 
भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत.- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

15 ऑक्टोबरला मुंबई सीएसटीएममधून सायंकाळी 5.10 मिनिटांनी पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि 6.15 मिनिटांनी सीएसटीएमहून नाशिककडे जाणार्‍या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ही वाचन सेवा सुरू होणार आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support