Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

राष्ट्रवादीने कंबर तर कसली, पण पुढे काय?


पुढच्या लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर बघण्याची संधी देशवासियांना लवकरच मिळणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. निमित्त आहे ते पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीचे. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकंदरीतच भिन्न असतात. विधानसभेच्या निवडणुका राज्याच्या पातळीवर तर लोकसभेच्या निवडणुका देश पातळीवर होतात. राज्यासाठी कोणता पक्ष उपयोगी आहे आणि केंद्रासाठी कोण चालेल याचा विचार करून जनता निवडणुकीचा कौल देते. पण, भारतीय जनता पार्टीचे एकमुखी नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे विधानसभा निवडणुकीतल्या भाजपाच्या कामगिरीचा संबंध थेट मोदींशी जोडला जाणार. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर म्हणून पाहिले जात आहे.
महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुकाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे इतर नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. सकाळ-संध्याकाळ भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत आहे. भाजपाही मूग गिळून आपल्या संघटनात्मक तयारीला लागली आहे. बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या प्रभारी सरोज पांडे यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत धडकत आहेत. काँग्रेसचे नेतेही कामाला लागले आहेत. त्यांनीही वेगवेगळ्या निमित्ताने रस्त्यावर उतरण्यास सुरूवात केली आहे. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पाही काँग्रेसने सुरू केला. त्याआधी गांधीजयंतीचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारी समितीची बैठक घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हल्ली वरचेवर महाराष्ट्रात दिसत आहेत. काँग्रेसचे नेते महाआघाडी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, आदींशी चर्चा करू लागले आहेत. आंबेडकरांनी एमआयएमबरोबर आघाडीही जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही या महाआघाडीत सहभागी होण्यासाठी धडपडत असतानाच स्वतःची तयारीही करत आहे. दोन दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातल्या 24 जिल्ह्यांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या भागात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद किती आहे, ती वाढवण्यासाठी काय करावे लागेल, यावर काथ्याकूट झाला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या व्यासपीठावर फेसबुकच्या माध्यमातून एक दीर्घ पत्र लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करतात. त्यांचे अनुकरण करत भाजपाचे इतर नेतेही समाजमाध्यमांचाच आधार घेऊ लागले आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. विरोधकही आता याच माध्यमांकडे वळू लागले आहेत. जयंत पाटील यांचे हे पत्र याच संस्कृतीचा वा अपरिहार्यतेचा भाग आहे.
आपल्या जाहीर पत्रात ते म्हणतात की, दिनांक 29 एप्रिल 2018 रोजी माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शरद पवारांनी निवड केली. आपल्या सर्वांच्या अपेक्षा कसोशीने पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. निवड झाल्यापासून मी राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका निरीक्षकांना भेटलो व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची सद्यस्थिती काय आहे याचाही आढावा घेतला. गेली 28 वर्षे राज्य विधिमंडळाचा मी सदस्य आहे. अनेक राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयांना जवळून अनुभवण्याची संधी मला लाभली. त्यामुळे मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू इच्छितो की, सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राचे कृषी, आर्थिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत दूरगामी नुकसान झालेले असून त्यात योग्यवेळी सुधारणा न झाल्यास त्याची फळे येणार्‍या पिढ्यांना भोगावी लागतील.
राज्यात सत्ताधारी पक्ष होऊन राज्यासाठी उत्तम काम करणे, हे तर आपल्या सर्वांचे ध्येय आहेच. पण, त्यासोबतच 21 व्या शतकाचा विचार करून नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेला महाराष्ट्र घडविणे हे आपल्या पक्षाचे मुख्य ध्येय असावे. त्यामुळे यापुढील काळात आम्हा सर्वांना आधीपेक्षा कितीतरी पट अधिक वेळ पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणार आहे. यापुढील काळात आपल्याला पक्षात अनेक सुधारणा कराव्या लागतील. गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणार्‍या कार्यकर्त्यांना प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईल आणि गरज पडल्यास काम न करणार्‍या आणि केवळ पदे मिरवणार्‍या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. 
शरद पवारांच्या राजकारणाचा भर महिला सक्षमीकरणावर राहिला आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व पवारांमुळे मिळाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, समाजाच्या सर्व स्तरांतील युवक-युवतींना पक्षात प्राधान्याने काम करण्याची संधी द्यायला हवी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना याआधीही पक्षात कोणतेही स्थान नव्हते आणि यापुढेही राहणार नाही. यापुढच्या काळात राष्ट्रवादीकडून बूथ स्तरावरील रचना मजबूत करण्याला पक्षात संपूर्ण प्राधान्य दिले जाईल. आम्ही नेते मंडळी नव्हे, तर बूथ स्तरावर काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू आहे. बूथ रचनेसाठी तयार करण्यात आलेल्या एपचा संपूर्ण वापर आपण सर्वांनी करायचा आहे. याद्वारे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्त्वापर्यंत संदेश पाठवता येईल आणि नेतृत्त्वालाही शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत निरोप पोहोचवता येईल. राष्ट्रवादी अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा असलेला पक्ष आहे व राहील, असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांनी मागच्या खेपेला लोकसभेची निवडणूक लढवली नाही. यावेळीही ते यापासून दूर राहणार आहेत. तसे त्यांनीच जाहीर केले आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उतरण्याच्या प्रयत्नात आहे. शरद म्हणजेच राष्ट्रवादीतले मोठे पवार याला सध्या तरी तयार नाहीत. पुढच्या काळातले चित्र स्पष्ट व्हायचे आहे. वाट पाहू.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support