This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

अपंगत्वावर मात करून तिने घेतली फिनिक्स भरारी

उद्याच्या मानकरी आहेत वर्षाताई परचुरे

 ठाणे । विनोद पितळे
परावलंबित्व टाळून आज भाग्यश्री स्वतःच्या पायावर उभी आहे. हे सांगण्याचे कारण एवढेच की वयाच्या दहाव्या वर्षी एका भीषण अपघातात उजवा हात आणि कवटीचे हाड तिने कायमचे गमावले पण अपंगत्वावर मात करून अंगभूत कलागुणांना भाग्यश्रीने एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे आकार दिला आणि त्यातूनच घडली तिची यशोगाथा! अर्थात लग्नानंतर पती मिलिंद व सासूबाईंनी, सासरेबुवांनी तिला सतत शिकण्यासाठी आणि कलाविकास करण्यासाठी प्रेरणा दिली.
डावा हात आणि कलात्मकता जोपासणारा मेंदू, कुटुंबाचे पाठबळ, मार्गदर्शन, पतीचे सहकार्य या जोरावर ती जरा भरारी घेत असतानाच आधी सासरे आणि नंतर पती मिलिंद यांच्या निधनाचे झटके तिला सहन करावे लागले. याही परिस्थितीत न डगमगता भाग्यश्री उद्योगात स्वतःला गुंतवत गेली. त्यानंतर तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आज ती आपल्या सासूबाईंसह ठाण्यात राहते आहे. पण खेद नाही, तक्रार नाही. परिस्थितीला आणि परमेश्वराला दोष नाही. फक्त स्वतःच्या हिंमतीवर विश्वास आणि जिद्द हेच भाग्यश्रीचे स्ट्राँग पॉइंट आहेत.
लहानपणीच्या एका अपघाताने उजव्या हाताला कायमचे अधू केले. खेळणं, बागडणं, नाचणं, अभ्यास करणं, दप्तर भरणं... प्रत्येक गोष्टीत तिची कुचंबणा होऊ लागली. ती शिकत होती पण तिची घुसमटही होत होती. पण मिलिंद विद्वांस या तरुणाने निशा पाटणकर या आपल्या समोरच्या इमारतीत राहणार्‍या मुलीच्या मनाचा थांग-अथांग ओळखला आणि निशाची भाग्यश्री झाली. 
लग्नानंतर फुलदाणीवर चित्रकला तसेच शिल्पकला या कलांमध्ये तिने प्राविण्य मिळवले. चित्रांची आवड तिला काचेवरील, कापडावरील, कागदावरील तैलचित्रे व भित्तीचित्रांकडे, वारली पेंटिग्जकडे आणि दागिन्यांची आवड वेगवेगळी इमिटेशन ज्वेलरी बनवण्याकडे आकृष्ट करत गेली. अवघ्या दीड दोन वर्षात तिने तब्बल 500 सिरॅमिक पेंटिंग्जच्या फुलदाण्या बनवल्या व व्यावसायिक स्वरूपात चांगला जम बसवला. भाग्यश्रीने चित्रातून साकारलेल्या मातीच्या भांड्यांवरील राधाकृष्णाची किंवा आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग पाहताना आपल्यालाच विश्वास बसत नाही, एवढी अप्रतिम कला आहे. कारण, हे रंग भरले गेले आहेत ते केवळ एका हाताने. तिला आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली होती. दिली. तिने बनवलेल्या लहान-मोठ्या आकारांतील रंगीबेरंगी व वेगवेगळ्या रेखाटनांचे व चित्राकृतींचे मातीचे सुंदर पॉटस्, खरेखुरे वाटावेत असे विलक्षण कलाकुसरीचे नकली मोत्यांचे दागिने, चित्रे, मेणाच्या वस्तू, हँडमेड भेटवस्तू यांना आज विलक्षण मागणी आहे. विविध डिझाईन्सचे नेकलेस, मोत्यांचे, खड्यांचे दागिने, बांगड्या, मंगळसूत्र यांची मागणी तर दिवसेंदिवस वाढत आहे. 
भाग्यश्री एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं टायपिंग, कॉम्प्युटर, मॉन्टेसरी असे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. नोकरीही केली. कॉम्प्युटरमधील अ‍ॅडव्हान्स कोर्स ती शिकली. आज भाग्यश्रीला आपल्या अपंग हाताचे काही वाटत नाही. एकेकाळी चारचौघांत मिसळण्याचा न्यूनगंड वाटणारी भाग्यश्री आत्मविश्वासाने घर, कुटुंब आणि नोकरी-व्यवसाय अशा जबाबदार्‍या सांभाळते आहे. ‘नारीरत्न’ सारखे पुरस्कारही तिला मिळाले आहेत. युवा-तरुण पिढीची प्रतिनिधी असणार्‍या भाग्यश्रीने आपल्या कृतीने नवोदितांसमोर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा एक आदर्शच ठेवला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support