Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

भिवंडीत एक दुजे के लिए!


लग्नाला कौटुंबिक विरोधाच्या भीतीने प्रेमीयुगुलाची आत्महत्या
प्रेमसंबंधातून लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होईल, या भीतीपोटी प्रेमीयुगुलाने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना रविवारी भिवंडी तालुक्यात घडली आहे. आरती गुरूनाथ भोईर (20 रा. पारिवली ) व रोशन बाळाराम रंधवी ( 23 रा. चौधरपाडा ) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. 
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्‍या आरती व रोशन यांच्यात वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. हे दोघेही नातेसंबंधातच येत असल्याने सुरुवातीला त्यांना आपल्या लग्नाला विरोध होणार नाही, असे वाटले होते. या दोघांच्या भेटीगाठी बोलणे-चालणेही सुरळीत सुरू होते. मात्र आपल्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होईल, याचा संशय लागल्यावर आरतीने भिवंडी, माणकोली येथील मोठ्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली तर प्रेयसीच्या आत्महत्येची खबर कानी पडताच पुरता खचून गेलेल्या रोशनने चौधरपाडा येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमुळे भिवंडी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आरती ही रोशनच्या मोठ्या भावाची मेहुणी होती. ती भिवंडी तालुक्यातील माणकोली परिसरात राहणारी मोठी बहीण सिमाच्या पतीचे निधन झाल्यापासून वर्षभर तिच्याकडेच राहत होती. तर दुसरी मोठी बहीण रिना ही चौधरपाडा येथे  राहत होती. तिकडेही आरतीचे येणे-जाणे सुरू होते. या दरम्यान बहिणीचा दीर रोशनशी तिचे प्रेमसंबंध जुळून आले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने त्यांनी ‘साथ जिऐंगे, साथ मरेंगे’, अशा शपथाही घेतल्या होत्या. लवकरच हे दोघेही लग्न करणार होते. मात्र प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना दिल्यास ते आपल्याला लग्नाला विरोध करतील, अशी भीती या दोघांना सतावत होती. या भीतीनेही या दोघांनी ‘एक दुजे के लिए’आयुष्य संपवल्याची चर्चा आहे.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support