Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

कर्नाटकात काँग्रेसच्या मंत्र्याची भर सभेत माफी


नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
पक्षाने राज्यात विधानसभा निवडणुकांच्यावेळी लिंगायत समुदायाबाबत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला नको होता, असे म्हणत जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या माफी लोकांची माफी मागितली.
कर्नाटकातील गडक येथील रामभापुरी सेर वीरा सोमेश्वर शिवचार्य स्वामींच्या दसरा संमेलनात ते बोलत होते. शिवकुमार म्हणाले, काँग्रेस पक्षाने राज्यात मोठी चूक केली. ही चूक मी नाकारणार नाही. मला असे वाटते की, कोणत्याही सरकारने जाती आणि धर्माशी निगडीत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करायला नको. लिंगायतांना स्वतंत्र धर्माच्या दर्जाबाबत आमच्या पक्षाने दिलेला पाठींबा योग्य नव्हता.
अनेक मंत्री आणि नेत्यांनी या मुद्यावर भाष्य केले आहे. मात्र, निवडणुकीत जनतेद्वारा देण्यात आलेला जनादेश या गोष्टीचा पुरावा आहे की, सरकारांना या बाबतीत हस्तक्षेप करायला नको होता. जर आमच्या सरकारने चूक केली असेल तर मी आपली माफी मागतो, असे शिवकुमार यांनी जाहिररीत्या कबुल करत माफी मागितली.
दरम्यान, लिंगायत समुदायाला धार्मिक अल्पसंख्यांक समुहाची मान्यता द्यायला वीरा सोमेश्वर यांनी जोरदार विरोध केला होता. वीरा सोमेश्वर गडक येथील प्रभावशाली लिंगायत समुदायाचे धर्मगुरु आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या दसरा संमेलनात शिवकुमार यांनी वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भर सभेत आपल्या सरकारच्या निर्णयाला चुकीचे ठरवत उपस्थितांची माफी मागितली आहे. शिवकुमार काँग्रेसचे कद्दावर नेते असू त्यांच्या या माफीनाम्यामुळे राजकीय वतुर्ळात चर्चा होत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support