Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

देवेंद्रजी, मेटेंच्या पापाचे धनी होऊ नका!


शिवस्मारक समिती ही राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आहे. या समितीचा कारभार शासनाच्या नियमाने करावा लागतो असे सर्वसामान्य जनतेला वाटते. शिवसंग्रामचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे (ते ही देवेंद्रजींच्या आशिर्वादाने) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. एवढा महत्वाचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. शिवाजी महाराज हे काही शिवसंग्रामची खासगी प्रॉपर्टी नाही. वास्तविक पाहता मेटे यांनी सरकारमधील मंत्र्यांना आणि विरोधी पक्षांनाही आमंत्रित करायला पाहिजे होते. परंतु आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अक्कलशुन्य मेटेंनी सरकारी अधिकारी आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना स्मारकाच्या जागी घेऊन गेले. तेही त्यांच्या कुलाबा येथील शिवसंग्राम कार्यालयापासून प्रारंभ केला. 
सरकारचा कार्यक्रम आणि त्याला पक्षीय स्वरूप त्यांनी दिला हे कोणीही नाकारू शकत नाही.
हा पायाभरणीचा कार्यक्रम एकप्रकारे शिवसंग्राम पुरस्कृत कार्यक्रम होता हे सिद्ध होत आहे. जर सरकारी असता तर सर्व पक्षांना घेऊन हा कार्यक्रम पार पडला असता. यातून हे स्पष्ट होत आहे की, विनायक मेटे यांनी स्वतःच्या अस्तित्वाला लागलेली गळती थांबविण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता आणि त्यांनी राज्य सरकारची शुद्ध फसवणूक केली. स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रमाला फक्त शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांना श्रेय घ्यायचे होते. स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी 25 जणांचे प्राण पणाला लावले. त्यात शेकापाचे आमदार जयंत पाटील हे देवासारखे धावून आलेत म्हणून एकाचा बळी गेला. सिद्धेश पवार हा चार्टर्ड अकाऊंटंट... दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेला शिवप्रेमी युवक याला भरल्या संसारातून उठून जावे लागले. मेटेंनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले नव्हते तरीही राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी सिद्धेशला पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र ठाण्यात इमारतींना पेंटिंगचे काम करत करत छत्रपतींच्या नावाने कोट्यवधींची माया केलेल्या मेटेंना सिद्धेशला मदत करण्याची इच्छा अजून तरी झाली नाही. तसे असते तर त्यांनी पत्रकारांना बोलावून मदत जाहीर केली असती आणि स्वतःची प्रसिद्धीची हौस पूर्ण केली असती.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन आणि इतर अधिकारी होते याचा अर्थ हा कार्यक्रम सरकारी होता. जर सरकारी कार्यक्रम होता तर सरकारच्या बोटी असणार, तर नियमानुसार एका बोटीत किती माणसं न्यायाची हे नियम ठरले असणारच. पत्रकारांच्या बोटीत नियमानुसार पत्रकारांना घेण्यात आले म्हणून ते सुखरूप पोहचले. मग कार्यकर्त्यांची मानसिकता लक्षात घेऊन आयोजकांनी लक्ष ठेवण्याची गरज होती. पोलिसांच्या माहितीप्रमाणे त्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते घुसले होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढले म्हणून नाहीतर मृत्यूचा आकडा वाढला असता. स्वतःच्या प्रसिद्धीच्या मस्तीत असलेल्या विनायक मेटे यांना याचे भान राहिले नाही. त्यामुळे सिद्धेशच्या मृत्यूला सर्वस्वी मेटेच जबाबदार आहेत. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारकडे मेटे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केलेली मागणी ही रास्त आहे. मुख्यमंत्र्यानी भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून मेटेंवर कारवाई करावीच आणि विरोधकांनीही ही मागणी सभागृहात करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई केली तर संपूर्ण मराठा समाज नाराज होईल असा समज मुख्यमंत्र्यांनी करून घेतला असेल तर त्यांचा गैरसमज आहे. त्यांच्याकडे गृहखाते आहे, गुप्त यंत्रणा आहे त्या आधारे मेटे यांच्या मागे मराठा समाज आहे की नाही याची खात्रीपूर्वक माहिती मिळू शकते. जर ते खरोखर मराठा समाजाचे मासिहा असते तर भाजपाच्या तिकिटावर विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून येण्याची गरज नव्हती. पण राज्यकर्त्यांवर भुरळ घालण्यात वस्ताद मेटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार, दिवंगत आर.आर. पाटील यांना शिवसंग्रामच्या नावाखाली आपली पकड मजबूत करून घेतली. राष्ट्रवादीला टांग मारून भाजपाचा हात पकडला. जिथे सत्ता तिथे मेटे, हे समीकरण या नायकाचे आहे. स्वतःला मराठ्यांचा नेता समजणारे मेटे यांनी शिवसंग्रामच्या किती कार्यकर्त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून निवडून आणलेत, या विषयाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली पाहिजे. 
कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी नगरसेवक किंवा आमदार केले नाही फक्त शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांना भाजपाची उमेदवारी मिळवून त्यांना नरेंद्र मोदी यांच्या लाटेत निवडून आणले, तेवढेच काय एक ’पुण्यकर्म’ त्यांनी केले. त्यावर शिवसंग्रामचे कार्यकर्ते किती नाराज आहेत याची माहिती मुख्यमंत्र्याना मिळू शकते. त्यांच्यामुळे अनेक कार्यकर्ते अक्षरशः भिकेला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या खिशाला चाट देऊन संघटनां मोठी केली, ते कार्यकर्ते आता कोठे आहेत याचा शोध त्यांनी घ्यावा. कार्यकर्त्यांवर प्रभाव टाकण्यासाठी सुरवातीला मंत्रालयात 15 ते 20 कार्यकर्ते आणून राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, आर.आर. पाटील, जयंत पाटील या नेत्यांकडे घेऊन काम करत असल्याचे नाटक आणि इंप्रेशन पाडण्याची एकहाती त्यांनी मोहीम यशस्वी पार पाडली. प्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांना मंत्रालयात सोडून विमानातून किंवा हेलिकॉप्टर मधून जाणे, अजितदादा पवार किंवा आर.आर. पाटील यांच्या पीएना पटवून विमानात जागा मिळविणे. जे पीए मेटेंना विरोध करतील त्यांना धमकावणे अशी भाईगिरी करून विनायकाचे नायक झाले. जेम्स लेनच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या लिखाणाला विरोध करण्याची मोहीम मेटे यांनी हाती घेऊन स्वतःचं स्थान भक्कम केलं आणि त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही. मिळालेल्या संधीचं सोन करणं हे त्यांचं वैशिष्ट्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ही तर महाराजांचे विचार राबविण्यापेक्षा स्मारकाकडे ते सोन्याची अंडी देणारं स्मारक म्हणून पहात आहेत.
मराठवाड्याचे म्हणून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मेटेंना आशिर्वाद होता. तीच जादूगिरी त्यांनी मराठवाड्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे चालू ठेवली असावी. मात्र फडणवीस यांनी जातीचे आणि विभागाचे राजकारण बाजूला ठेवून सोकावलेल्या मेटेंना आताच टाळ्यावर आणले पाहिजे अन्यथा राष्ट्रवादीला लुबाडून भाजपालाही गुंडाळून ते ठेवतील. 
शिवस्मारकाला सिद्धेशचा बळी घेऊन छत्रपतींच्या नावाला काळिमा फासणा-या मेटेंना वेळीच हटवा आणि पुढील संकट टाळा आणि त्यांच्या पापांचे धनी होऊ नका. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, तर काळ सोकावतोय. छत्रपतींचे आशिर्वाद घेऊन जनसेवा करण्याची प्रतिज्ञा करणारे भाजपा विनायक मेटेंना शिवस्मारक समितीवर ठेऊन पापाचे धनी होऊ 
नका.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support