Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीचा झाला भिवंडीत जयघोष


 भिवंडी । प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या आदेशानुसार एमएमआरडीएने भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही काँक्रीट रस्त्याचे जाळे पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते गावांमधील चार रस्त्यांचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम सकाळी सकाळी करण्यात आला. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी तालुक्यात स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांच्या नेतृत्वखाली नागरी सेवा संवाद पदयात्रा काढली. महिलांसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता पंधरवडा निमित्ताने नागरी सेवा संवाद यात्रा भाजपचे ज्येष्ठ प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्लास्टिक मुक्त गांव असा जयघोष करून रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील चार रस्त्यांचे भूमीपूजन खासदार  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व कामाला रविवारपासून सुरुवात करण्यात आली. ओवळी रेल्वे फाटक ते बायपास महामार्ग (3 कोटी 99 लाख), भरोडी ते वेहेळे सारंग (1 कोटी 99 लाख), तर जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांच्या अंजूर गटातील भरोडी फाटा ते सुरई, अंजूर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे आज भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला महिलासह ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वर्षानुवर्षे डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना काँक्रीट रस्त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, जिप सदस्य जयवंत  पाटील, पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र डाकी, भानुदास पाटील, सारंगच्या सरपंच उषा शिवाजी पाटील,राम माळी, दिवे अंजूरचे सरपंच आकाश म्हात्रे, मनिष तरे, सुरईचे अरुण पाटील, माजी सरपंच श्रीधर पाटील,विश्वनाथ वझे, सुधाकर म्हात्रे आदी उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support