This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

गडकरी रंगायतन येथे रविवारी सुरेल मैफिलीचे आयोजन

 गदिमा, बाबुजी, पुलं यांना ‘त्रिवेणी’ची मानवंदना

ठाणे । विशेष प्रतिनिधी
गदिमा अर्थात गजानन दिगंबर माडगुळकर, बाबुजी तथा सुधीर फडके आणि पुलं म्हणजेच भाई.. अवघ्या महाराष्ट्राची ही लाडकी व्यक्तिमत्वं. चाहत्यांनी मनाच्या गाभार्‍यात, रत्नजडीत कोंदणात विराजमान केलेली. मराठी माणसांच्या मनांत या दिग्गजांना, शब्द आणि सुरांच्या किमयागारांना ध्रुवासारखे अढळपद आहे. या तिघांच्याच किमयेचे स्वरगारूड गडकरी रंगायतन येथे येत्या रविवारी एका सुरेल मैफिलीतून उलगडणार आहे.
घंटाळी मित्र मंडळ आणि स्वरसाज एंटरटेनमेंट यांच्या विद्यमाने आणि अपूर्वा प्रॉडक्शन ही मैफिल सादर करत आहे. दै. महाराष्ट्र दिनमान मीडिया पार्टनर असलेल्या या मैफिलीत गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या अनेकपदरी किमयागारीचे रंग अभिवाचन, संगीत, गायन या माध्यमांतून रसिकांसमोर सादर होणार आहेत. गडकरी रंगायतन येथे 21 ऑक्टोबर, 2018 रोजी रात्री साडेआठ वाजता या मैफिलीचा पडदा वर जाईल.
गदिमा, बाबुजी आणि पु.ल. देशपांडे यांच्या अफाट कारकीर्दीचा एक मागोवा घेण्याचा सुरेल प्रयत्न या मैफिलीतून साकारणार आहे. निवेदन आणि अभिवाचनाची जबाबदारी दिपाली केळकर, मयुरेश साने हे सांभाळणार असून, या बहारदार मैफिलीसाठी संगीत संयोजन अमेय ठाकूरदेसाई यांनी केले आहे. गदिमांचे शब्द, बाबूजी आणि पुलंचा स्वरसाज, संगीत आणि पुलंचे आजही ताजेतवाने वाटणारे, मराठी माणसाला आपलेसे करणारे लिखाण याची जादू त्यांचे चाहते विसरणे शक्य नाही. अभिवाचन, संगीत आणि गायनातून ही जादू पुन्हा एकदा गडकरीत या मैफिलीला उपस्थित असणार्‍या रसिकांना मराठीच्या सुवर्णकाळात घेऊन जाणार आहे. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील गायक जयदीप बगवाडकर, गौरव महाराष्ट्राचा विजेती धनश्री देशपांडे, सारेगम फेम केतकी भावे-जोशी आणि धनंजय म्हसकर यांच्या आवाजाने ही जादू जागवली जाणार आहे.
रसिकांचा उदंड प्रतिसाद
या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून, प्रवेशिकांसाठी गडकरी रंगायतन आणि वेव्हज म्युझिकल येथे गर्दी होत आहे. बुकमायशो या साईटवर या मैफिलीच्या प्रवेशिका ऑनलाईनही खरेदी करता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क :  9819813429, 9323149333
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support