Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

एम. जे. अकबर यांचा प्रिया रमानींविरोधात मानहानीचा खटला

लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले
 नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी महिला सहकार्‍यांनी केलेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळल्यानंतर पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात भादवि कलम 499 आणि 500 अंतर्गत हा खटला भरला. 
एम. जे. अकबर यांच्यावर सुमारे डझनभर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मी टू मोहिमेअंतर्गत हे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 
रविवारी परदेशातून आल्यानंतर अकबर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रिया रमानी यांच्यासह इतर महिलांनी केलेले आरोप फेटाळून लावत हे आरोप द्वेषभावनेतून करण्यात आल्याचा दावा केला होता. हे आरोप करणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात भादवि कमल 499 आणि 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे. यानुसार
त्या दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. करंजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्या मार्फत हा खटला भरण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे वकील करंजावाला यांच्याविरोधात एका वकील महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support