Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

कोकणात जलनियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक

 जलपुरुष राजेद्र सिंह यांचे महाडकरांना मार्गदर्शन

महाड । प्रतिनिधी

कोकणातील भौगोलिक स्थिती पाहता पडणार्‍या पावसाचे पाणी डोंगर उतारावर अडवणे गरजेचे आहे. अशा ठोस उपाययोजनेतून कोकणातील जलनियोजन शक्य असल्याचे मत जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी महाड येथे व्यक्त केले. महाडमधील हिरवळ या संस्थेच्या वतीने ‘गरज जलनियोजन-अंदाजपत्रक’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेच्या सांगता समारोहप्रसंगी राजेंद्र सिंह बोलत होते.
महाड येथे हिरवळ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त यशदा, एसीटी आणि डब्ल्यूओटीआर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसाच्या जल नियोजन आणि अंदाजपत्रक या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा सैनिक वसतिगृह येथे जल पुरुष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सांगता सामरोह संपन्न झाला. 
या वेळी व्यासपीठावर जि.प. उपाध्यक्ष अस्वाद पाटील, जलनायक किशोर धारीया, प्राचार्या डॉ. स्नेहल दोंदे, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे, प्रशिक्षक सुमंत पांडे, आनंद पुसावळे, रोटरीचे अध्यक्ष नितीन मेहता, माजी नगरसेवक नितीन पावले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण परिषदेला जिल्ह्यातून जवळपास शंभर जलकार्यकर्ते आले होते.

पाण्यासाठी डोळ्यात पाणी आले की पाण्याचे महत्व कळते. कोकणात पडणारा मुसळधार पाऊस डोंगरावरच अडविला पाहिजे, पाण्याचा प्रवाह मंद केला पाहिजे, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी भुगर्भात पाण्याचे साठे निर्माण केले पाहिजेत, गवत आणि वनस्पती वाढविले पाहिजेत. गवतामुळे मातीची धूप थांबणार आहे. नद्यांना मातेचा दर्जा दिला पाहिजे तरच नद्यांचे प्रदूषण थांबू शकेल. तसेच शाळेतूनच जल साक्षरतेचे धडे दिले पाहिजेत. सध्या गंगेसाठी लढा देत असून, गेल्या आठ दशकातच नद्या मोठ्याप्रमाणात प्रदुषित झाल्या आहेत.- राजेंद्र सिंह, जलपुरुष
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support