Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

विक्री जास्त तरीही नफा कमी


महाड । प्रतिनिधी
दसर्‍या दिवशी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. महाडमध्ये जवळपास 20 टन झेंडू बाजारात हातोहात विक्री झाला असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली असून या विक्रीतून मात्र शेतकर्‍यांना अपेक्षेप्रमाणे नफा मिळाला नसल्याचेही सांगण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रांतील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, जेजूरी, बारामती, निरा, येथून झेंडू फुलांची आवक केली जाते. कलकत्ता आणि नामधारी अशा दोन प्रकारांमध्ये झेंडूच्या फुलांची आवक होते. परंतु सर्व साधारण कलकत्ता जातीची फुलांची अधिक आवक करण्यात येत असल्याचे नरेंद्र शिगवण यांनी सांगितले. 
राज्यांतील बहुतांशी व्यापारी जेजूरी, निरा, वाशी मार्केट, बारामती, पुणे या ठिकाणांहून फुलांची खरेदी करतात. यातील बराचसा माल मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. यावर्षी फुलांची आवक जरी बर्‍यापैकी असली तरी शेतकर्‍याला समाधानकारक दर मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली 
आहे. 
महाड शहरांतील शिवाजी चौक परिसरांमध्ये बहुतांशी फुलांची दुकाने रस्त्याच्या बाजुला मांडण्यात आली. रमेश महाडीक, अमित ओंबळे, मंगेश शिंदे, अमित साळूंके, सुभाष पाटील आणि नरेश शिगवण यांची भेट घेतली असता दोनशे पेक्षा अधिक झेंडू फुलांची दूकाने थाटण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. साधारण 50 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत प्रति किलो फुलांची विक्री झाली आहे. 
महाडमध्ये झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी भोर, सासवड येथून काही शेतकरी आले होते. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. जिल्ह्याच्या बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांना गावोगावी जाऊन फुलांची थेट विक्री करावी लागते. मात्र या थेट विक्रीत जेमतेम खर्चच हाती लागतो.
- संपत जाधव, शेतकरी
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support