Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी हिरवा कंदिल

 147 प्रकल्पग्रस्तांची यादी तयार
धरणाची उंची 3  मीटरने वाढवण्यात आल्याने पाणीसाठा 181.58 द.ल.घ. मी वरून 240 द. ल घ.मी एवढा (40%) वाढला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा दुप्पट म्हणजे 340.48 द.ल.घ.मी इतका होणार आहे. वीज निर्मितीही करता येणार आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धरणाचे काम पूर्ण करण्याचे ठरले आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांंचे पुनर्वसन करण्यासाठी घरटी एक नोकरी देण्यासाठी नावे अंतिम करून त्याची यादी जिल्हा पातळीवर अंतिम करण्यात येत असल्याचे अधीक्षक अभियंता पंडितराव यांनी सांगितले.

डोंबिवली । प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार्‍या बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रकल्पग्रस्तांंच्या विविध प्रश्नांमुळे रखडले आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीने प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. सुमारे 191 नावांपैकी 174 जणांची नावे अंतिम करण्यात आली आहेत.
औद्योगिक विकास मंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार एका कुटुंबाचे चार भाग झाल्याचे दाखवून प्रत्येकी नोकरी मिळावी अशी मागणी होती. पण त्याला नकार देण्यात आला. प्रत्येक कुटुंबातील जी व्यक्ती ज्येष्ठ असेल ती सांगेल त्याला नोकरी देण्यात येणार आहे, अशी 174 नावे अंतिम करण्यात आली. या शिवाय जमीन ताब्यात घेण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. कोळे-वडखळ येथील जमीन वनखात्याच्या अखत्यारीत असून ती जमीन मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याने या गावातील नागरिकांचे पुनर्वसन रखडले आहे. तर काचकोळी येथील 125 कुटुंबे स्थलांतर होण्यास तयार असली तरी स्थानिक दडपणामुळे त्यांना जाता येत नाही यातून मार्ग काढला जात आहे. तर तोंडली येथील गावकर्‍यांनी जमिनीच्या बदल्यात रोख किंमत देण्याची मागणी केली असून त्याचा निर्णय या महिना अखेर होणार्‍या बोर्ड मीटिंगमध्ये होण्याची चिन्हे आहेत. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम बहुतेक पूर्ण झाले असून वक्र दरवाजेही बसवण्यात आले असून ते उभे करून इतर काम तेवढे शिल्लक आहे. धरणाचे काम रखडल्याने आर्थिक नुकसान होत आहे, शिवाय पाण्याची वाढती मागणीही पूर्ण करता येत नाही. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support