Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण



ठाणे । प्रतिनिधी
कोकणच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असणार्‍या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप आणि पालवी महिला मंडळातर्फे नुकत्याच एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कोकणाच्या उन्नतीसाठी कार्यरत असणार्‍यांना कोकणरत्न, कोकणमित्र आणि विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे या फेसबुक ग्रुपने आयोजित केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट फोटो स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात रविवारी झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभात जानकीबाई गोवळकर या अध्यक्ष म्हणून तर पत्रकार-साहित्यिक विनोद पितळे आणि श्री जन सामाजिक सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार व निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे अ‍ॅडमिन संदेश जिमन आणि पालवी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. समिरा भारती यांनी केले होते. ज्येष्ठ सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते निशिकांत महांकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दीपक देशमुख यांनी मानपत्रांचे वाचन केले. कल्याण येथील गणराज इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष संजय म्हात्रे यांनी तसेच ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत गोवळकर यांनी व पत्रकार सुधीर मुणगेकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support