This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

पृथ्वीची ‘शॉ’नदार कामगिरी

आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज शतक झळकावीत क्रिकेट विश्वावर दस्तक देणार्‍या अवघ्या अठरा वर्षाच्या पृथ्वी शॉ ची चर्चा आता केवळ भारतातच नव्हे तर जगात होऊ लागली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ ला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करीत पृथ्वी शॉ ने धडाकेबाज शतक झळकावले. पृथ्वी शॉ ने आपल्या शैलीदार फलंदाजीने वेस्ट इंडिज गोलंदाजांचे लक्तरे काढली. पृथ्वी शॉ ने पदार्पणातच शतक झळकावीत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अवघ्या अठराव्या वर्षी शतक झळकवणारा पृथ्वी शॉ  सचिन नंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण पृथ्वीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. पृथ्वीने बालवयातच स्वतःच्या खेळाची चुणूक दाखवली. अवघ्या चौदा वर्षाचा असताना नोव्हेंबर 2013 मध्ये पृथ्वीने आंतरशालेय हॅरीस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्डतर्फे खेळताना सेंट फ्रांसिस संघाविरोधात विरोधात विक्रमी 546 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 85 चौकार व 5 षटकार मारले होते. त्यावेळी हा राष्ट्रीय विक्रम होता. त्याच्या या खेळीनंतर त्याला सचिन तेंडुलकरचा वारसदार समजण्यात येऊ लागले. सचिनने ही त्याच्या या खेळीचे कौतुक करीत त्याला क्रिकेट मधील महत्वाच्या टिप्स दिल्या, त्यानंतर आजपर्यंत पृथ्वीने आपल्या खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यात कोणतीही कसूर केली नाही. पृथ्वीने रणजी व दुलीप ट्रॉफीमध्ये ही पदार्पणातच शतक झळकावले आहे. या शिवाय तो भारताच्या अंडर 19 संघाचा कर्णधारही होता, त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 चा विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेतही त्याने बहारदार फलंदाजी करीत 261 धावा केल्या होत्या. त्या ही अवघ्या सहा मॅचमध्ये त्याच्या या फलंदाजीमुळेच त्याला आय पी एल मध्ये आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायजी मध्ये स्पर्धा लागली होती. 2018 साली दिल्ली डेअर डेव्हील या संघाने 1 कोटी वीस लाख रुपये मोजत पृथ्वीला आपल्या संघात घेतले. तो आय पी एल मध्ये खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. पृथ्वीच्या फलंदाजीने आज संपूर्ण क्रिकेटजगत मोहित झाले आहे. पृथ्वीने हे यश प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवले आहे. भविष्यातही जिद्द आणि  मेहनतीच्या जोरावर तो क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले रचणार यात शंका नाही. हेच पृथ्वी ने दाखवून दिले आहे. पृथ्वीला आगामी करकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा! -- श्याम बसप्पा ठाणेदार दौंड पुणे

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support