This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

‘सुरेल’ रागेश्वरी!

लहान चणीची छोटीशी रागेश्वरी पाहताक्षणी आपले लक्ष वेधून घेत नाही परंतु ती एकदा गायला लागली की मग मात्र आपण तिच्या स्वरात हरवून जातो. आपले सर्वस्व ओतून ती संगीताची साधना करते हे ती गायला लागली की आपसूकच ऐकणार्‍याला उलगडत जाते. आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहे. असे असले तरी आपल्या समाजाची पुरुषी मानसिकता अद्याप बदललेली नाही आणि याची प्रचिती आपल्याला समाजात सर्रास घडणार्‍या घटनांतून येते. 
स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार आणि कौटुंबिक पातळीवर होणारा अन्याय यांचे वाढते प्रमाण स्त्री सुरक्षित नाही याचेच निदर्शक आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा एक पिता आणि त्यासोबत अख्खे कुटुंबच एखाद्या मुलीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे स्वप्न जोपासते तेव्हा ती निश्चितच दखल घेण्याजोगी बाब ठरते. आज रागेश्वरीची संगीत साधना अखंड सुरु राहावी म्हणून तिचे वडिल आणि संगीत क्षेत्रातील गुरु मुरलीधर गायकवाड खूप परिश्रम घेत आहेत आणि रागेश्वरीही या प्रयत्नाचे मोल जाणून खडतर साधना करते आहे. 
आपण संगीत या क्षेत्रातच भविष्य घडवायचे हे कधी निश्चित केले या प्रश्नाचे उत्तर देताना रागेश्वरी सांगते, आम्हाला संगीताचा वारसा आमच्या आजी आणि आजोबांकडून लाभला. दोघेही फार सुंदर भजने गायचे. आजोबा तबलाही उत्कृष्ट वाजवायचे. 
संताचे अभंग, ओव्या आणि भजने असे भक्तिरसाने ओतप्रोत वातावरण लहानपणापासूनच लाभल्याने माझ्या मनात संगीताबद्दल आवड निर्माण झाली. संगीताचा वारसा आजी आणि आजोबांकडून वडिलांकडे आणि त्यांच्याकडून माझ्याकडे आलेला आहे. माझे वडिल उत्तम गातात आणि तबलाही वाजवतात. त्यांनी माझा संगीताकडे असलेला ओढा ओळखला. मला माझी आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन तर दिलेच परंतु माझे मार्गदर्शक म्हणून ते प्रत्येक पावलावर सोबतीला उभे राहिले. त्यांनी माझ्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडियो उभा केला आहे. माझा रियाज आणि रेकॉर्डिंग संदर्भातील प्रयोग मला येथे करता येतात. मी लहानपणापासून संगीत शिकते आहे तरीही माझे वडिल चालवित असलेल्या विणा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मी नियमितपणे रियाजाला बसते. मला आयुष्यभर याच क्षेत्रात काम करायचे आहे. शिकत राहायचे आहे. 
आज संगीत क्षेत्रात संधीची अनेक दालने खुली झाली आहेत. परंतु आव्हानेही त्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. 
प्रसारमाध्यमांकडून सातत्याने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आणि स्पर्धा यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. परंतु यामुळेच नवनवीन प्रतिभावंत गायकांची नित्यनूतन भरही या क्षेत्रात पडताना दिसत आहे. स्पर्धेसंदर्भात आपली मते स्पष्टपणे मांडताना रागेश्वरी म्हणते, मी सातत्याने अशा स्पर्धांमध्ये सहभागी होते. अनेक स्पर्धा मी जिंकल्याही आहेत परंतु मी सहभागी होते ती केवळ माझी तयारी अनुभवण्यासाठी. स्पर्धा जिंकण्यापेक्षा सहभागी होऊन मला लाभणारा आनंद आणि अनुभव माझ्यासाठी मोलाचा आहे. स्पर्धा जरूर करावी पण ती स्वत:शीच! आपले गायन अधिक छान व्हावे यादृष्टीने अशा स्पर्धांतून काय साध्य करता येईल हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.  
आपली सामर्थ्यस्थळे आणि उणीवा यांची स्पष्ट जाणीव एखाद्या व्यक्तीला असली की ती व्यक्ती प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतेच, हे रागेश्वरीकडे पाहिल्यानंतर कळते. ती मुंबई विद्यापीठातून संगीताचे पुढील शिक्षण पूर्ण करत आहे आणि आपल्या वडिलांकडूनही नवनवीन गोष्टी शिकत आहे. तिचा आवाज आणि वडिलांचे पाठबळ या गोष्टी तिची शक्तिस्थळे आहेत परंतु सर्वात महत्त्वाचे आहे तिचे संगीतावर असलेले प्रेम! यासोबतच मेहनत करण्याची तयारी आणि आपले ध्येय साध्य करण्याचा निर्धार यामुळे ती एक दिवस आपले उद्दिष्ट साध्य करणार यात शंकाच नाही. तिच्या भावी वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा! 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support