Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडातून महिलांना आर्थिक मदत

बकरी पालनातून सात हजार महिलांना रोजगार

  
नागपूर । प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील सात हजारांवर महिलांना बकरी पालनातून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच्या दुधापासून तयार केलेले साबण, खत आणि इतर साहित्याच्या विक्रीचा स्टॉल नागपुरात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरसमध्ये लावण्यात आला आहे.
शासनाच्या ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडातून आर्थिक महिलांना मदत झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 700 महिला बचत गटांना बकरी पालनासाठी निधी उपलब्ध करून दिला. या बचत गटांना विदर्भ पशु संसाधन उन्नती केंद्राच्या माध्यमातून जोडण्यात आले. प्रत्येक तालुक्यात बचत गटांतील महिलांपैकीच 60 पशुसखी तयार करण्यात आल्या. या पशुसखींना बकरीवर प्राथमिक उपचारासह साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. पशुसखी बचत गटांकडून बकरीचे दूध व लेंड्या खरेदी करतात. 
बाबुळगाव तालुक्यातील केंद्रावर पशुसखींनी गोळा केलेल्या साहित्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यापासून खत, साबण, हॅण्डवॉश, पशुखाद्य तयार करण्यात येते. या साहित्याच्या पॅकेजिंगपासून मार्केटिंगपर्यंतचे काम या पशुसखी करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेत यवतमाळच्या महिला बचत गटांनी बकरीच्या दुधापासून तयार करण्यात येत असलेल्या साबणासंदर्भात माहिती दिली असता ते अवाक झाले. त्यांनी बचत गटांना भेटण्याचे आमंत्रणसुद्धा दिले. कुठल्याही रसायनाचा वापर न करता तयार केलेले हे साबण आरोग्यवर्धक असल्याचा दावा महिलांनी केला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support