Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

नादिया मुराद आणि मुकवेगे यांना शांततेचे नोबेल


 स्टॉकहोम । वृत्तसंस्था
युद्धकाळात महिलांना लैंगिक गुलाम बनवून दहशतवाद्यांकडून होणार्‍या लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवणार्‍या  नादिया मुरादआणि काँगोचे डॉ. डेनिस मुकवेगे यांची यंदाचे नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.नादिया या आयसिस दहशतवाद्यांच्या अत्याचारांची शिकार ठरलेल्या इराकमधील याझिदी समाजातील आहेत. नादिया आणि स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या मुकवेगे यांनी लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढतानाच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केल्यानेच त्यांचा गौरव करण्यात आल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
 यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी 331 जणांची नावे आली होती. आतापर्यंत 98 जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात 104 लोकांचा आणि 27 संघटनांचा समावेश आहे. या 104 विजेत्यांमध्ये 16 स्त्रियांचा समावेश आहे. निवड समितीने म्हटले आहे. यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी 331 जणांची नावे आली होती. आतापर्यंत 98 जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात 104 लोकांचा आणि 27 संघटनांचा समावेश आहे. या 104 विजेत्यांमध्ये 16 स्त्रियांचा समावेश आहे. 
कोण आहेत डॉ. मुकवेगे 
यादवीग्रस्त काँगोतील डेनिस मुकवेगे यांनी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे. मुकवेगे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे. 
कोण आहेत नादिया  
नादिया मुराद या इराकच्या असून त्या याझिदी या अल्पसंख्याक समाजातील आहेत. इसिसने नादिया यांचे गाव बेचिराख करून तेथील मुलींना लैंगिक गुलाम बनवले होते. या अतिरेक्यांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचे काम केले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support