Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

डोंबिवलीकरांच्या भेटीला मराठी कलाकारांची मांदियाळी

अमृता खानविलकर, राकेश बापट, दिप्ती श्रीकांत यांनी रासरंगात धरला ठेका
गरबा आणि दांडियासोबतच रविवारी अस्सल मराठमोळ्या भोंडल्याचेही आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेत्री दिप्ती श्रीकांत ही देखील या भोंडल्यात सहभागी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत आणि मराठमोळ्या साजशृंगारासह अतिशय उत्साहाने डोंबिवलीकर महिला मोठ्या प्रमाणावर या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.

 ठाणे । प्रतिनिधी
 खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित डोंबिवली रासरंग दांडियाचा फीवर आता टिपेला पोहोचला असून रविवारी प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर, दिप्ती श्रीकांत, अभिनेता राकेश बापट आदी नामांकित कलाकार डोंबिवलीकरांच्या भेटीला आले होते. हजारो डोंबिवलीकरांसह रासरंगच्या रंगात रंगत त्यांनी गरबा आणि दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. प्रख्यात मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले यांनीही उपस्थितांशी संवाद साधत धमाल उडवून दिली.
‘डोंबिवली रासरंग’ने सलग दुसर्‍या वर्षी तरुणाईचा ताबा घेतला असून दररोज हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी डोंबिवली (पूर्व) येथील डीएनसी मैदानावर सुरू असलेल्या या जल्लोषात सहभागी होत आहेत. दररोज दोन महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येत असून सिमरत गायकवाड (राष्ट्रीय कबड्डीपटू), अनिता दळवी (संचालिका, अस्तित्व मतिमंद मुलांची शाळा), डॉ. किशोरी भगत (शिक्षणतज्ज्ञ), डॉ. विंदा भुस्कुटे, रिताबेन शहा (प्राचार्या), मारसिलिंग काब्राल (प्राचार्या), लीना ओक-मॅथ्यू (एशियन ज्युडो खेळाडू), प्रेरणा कोल्हे (शिक्षणतज्ज्ञ), श्रुती कानडे (एमपीएससी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण) या यंदाच्या नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी आहेत.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या उपक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी आदींचे सहकार्य लाभले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support