Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

पसंतीची बाईक चोरणारे गजाआड

कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून 10 मोटरसायकली जप्त
सुमारे 5 लाख 40 हजार रुपये 
किंमतीच्या 10 मोटरसायकली व 1 रिक्षा या दोघांकडून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मोटरसायकल चोरी प्रकरणी बेन्सन जॉन मोतीस (27) व आकाश गायकवाड(25) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.


 उल्हासनगर । प्रतिनिधी

मोटरसायकल आवडली रे आवडली की ती साथीदारांसह हातोहात लांबवयची. मग, अगदी हौस फिटेपर्यंत ती वापरायची आणि नंतर तिला बेवारस स्थितीत सोडून द्यायचे. हा चोरीचा मामला करणार्‍या मोटरसायकल चोर शौकिन व त्याच्या मित्राला विठ्ठलवाडी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 10 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. 
दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक 35 हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली होती. ती चोरणारे बेन्सन जॉन मोतीस (27) व आकाश गायकवाड(25) हे दोघे व्हीटीसी ग्राउंड येथे चोरीची गाडी घेऊन उभे असल्याची कुणकुण विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल समीर गायकवाड यांना लागली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील, पो हवालदार नांगरे, आ. आर. पाटील, पो. ना. आर.एस. बुधवंत, डी. बी. मोरे, पो. ना. एन. बी. तायडे, पो. कॉ. एस. एस गायकवाड, आहिरे यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
दररोज नवनव्या मोटरसायकली उडविण्याची हौस असलेला बेन्सन जॉन मोतीस रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरसायकली चोरायचा. मोटरसायकल आवडताच तो मित्र आकाशच्या मदतीने मोटरसायकल ची हातोहात चोरी करायचा. त्यानंतर ती मोटरसायकल चालवून आपली हौस पूर्ण करायचा. 
ती आडवाटेला बेवारस स्थितीत फेकून द्यायचा. हा या चोरांचा फंडा होता. या दोघांनी कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातून 10 विविध कंपनीच्या मोटरसायकली चोरी करून बेवारस स्थितीत सोडून दिल्या होत्या.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support