Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 30, 2018

कर्जत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मुलीला मिळविण्यासाठी हट्ट नाही!

आमदार सुरेश लाड यांचे स्पष्टीकरण
कर्जत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मुलीला मिळविण्यासाठी हट्ट नाही!

  खोपोली । प्रतिनिधी
आगामी कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षापदाचा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार, सुनिल तटकरे व आघाडीचे नेते ठरवतील त्यामुळे माझी मुलगी प्रतिक्षा लाड हिलाच उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश लाड यांनी दिले आहे.
निवडणूक प्रक्रियेत आघाडीतील इच्छुक उमेदवारीची चाचपणी करून उमेदवार ठरवू तर माझ्या मुलीला उमेदवारी दिल्यास घराणेशाहीची चर्चा होवू शकते. मात्र आरोप करणार्‍यांनी मागील निवडणुकीतील आपल्या घराणेशाहीचा इतिहास तपासून पहावा असा टोलाही आमदार लाड यांनी विरोधकांना लगावला.
कर्जत नगरपालिकेची निवडूक जानेवारी महिण्यात होत असून नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने आमदार सुरेश लाड यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत-खालापूर विधानसभा युवती अध्यक्षा प्रतिक्षा लाड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर प्रतिक्षा लाड यांचा कर्जतमध्ये दांडगा जनसंपर्क असून अनेक महिलांसाठी अनेक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण करण्याचे काम त्या करीत आहेत. 
त्यामुळे महिलांमधून प्रतिक्षा लाड यांना पहिल्या नंबरची पसंती असल्याने नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांनाच द्यावी अशी मागणी होत असल्याने प्रतिक्षा लाडला उमेदवारी देणार का? असा प्रश्न लाड यांना खालापूरात एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारताच याबाबत पक्षश्रेष्ठ व आघाडीचे नेते घेतील तो निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
Share:

विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

 डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी आमदार किणीकर यांची निदर्शने
 डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी आमदार किणीकर यांची निदर्शने,विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

उल्हासनगर । प्रतिनिधी
अंबरनाथ व उल्हासनगर येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड येथून तातडीने हटविण्यासाठी आणि कचरा डेपो सुरु करण्याकरीता जबाबदार अधिकार्‍यावर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी बुधवारी विधान भवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. आमदार किणीकर यांच्या या मागणीला पाठिंबा देत आमदार सुभाष भोईर, शांताराम मोरे यांनी देखील त्यांच्यासोबत निदर्शने केली.
उल्हासनगर कॅम्प 5मधील गायकवाडपाडा, महात्मा फुले नगर, सेक्शन-36 जवळ असलेल्या अनधिकृत कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरुन स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असाच प्रकार अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत पूर्वेकडील पाईपलाईन रोडलगत असलेल्या कचरा डेपोचा आहे. या कचरा डेपोमध्ये कचर्‍याचे मोठ-मोठे डोंगर तयार झाले आहेत. कचर्‍याच्या डोंगराला आग लागत असल्याने त्यातून निर्माण होणार्‍या धूराचा परिसरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
डंम्पिगला सतत आग लागून निर्माण होणार्‍या धुरामुळे ताप, साथीचे आजार, निमोनिया, खोकला, डेंग्यू या सारख्या आजाराला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी करुनही हा अनधिकृत कचरा डेपो हटविण्याबाबत मागणी केलेली आहे. मात्र निष्क्रिय प्रशासनाने अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नसल्याने हा अनधिकृत कचरा डेपो हटविण्याची मागणीही आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी केली. 
महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन नागरी वस्तीजवळ करता येत नाही. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत जलस्त्रोताच्या जवळ कचरा डेपो करता येत नाही,  बाबी कायद्याने वागा संघटनेने चव्हाट्यावर आणल्या  आहेत. तथापी, या तरतूदीचे उल्हासनगर महापालिकेकडून सपशेल उल्लंघन होत आहे. 
Share:

तीन मजली नवी इमारत उभारणार

भिवंडीतील दिवाणी न्यायालयाची इमारत इतिहासजमा
भिवंडीतील दिवाणी न्यायालयाची इमारत इतिहासजमा,तीन मजली नवी इमारत उभारणार

 भिवंडी । प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून रखडलेले भिवंडी दिवाणी व फौजदारी कोर्टाच्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात झाली असून या तीन मजली इमारतीच्या जागेसाठी सध्याची कोर्टाची 160 वर्षे जुनी इमारत इतिहास जमा होणार आहे. शहरातील वकील संघटना, पक्षकार आणि शहरातील नागरिकांनी या घटनेचे स्वागत केले असून या इमारतीमुळे पक्षकार आणि वकीलांच्या कामास गती येऊन त्यांचा ठाण्याला जाणासाठी लागणारा अमुल्य वेळ वाचून त्यांची आर्थिक बचत होणार असल्याचे मत ज्येष्ठ वकील नारायण अयंर, अ‍ॅड. हर्षल पाटील यांनी व्यक्त केले.
शहरात सुरू असलेली कोर्टाच्या इमारत 160 वर्षे जुनी असून या इमारतीच्या जागी आता नवी इमारत उभी राहणार असून त्या ठिकाणी कोर्टाची तीन मजली इमारत उभी राहणार आहे. सदर इमारतीत सेशन कोर्ट, सिव्हिल कोर्ट, सिनिअर डिव्हिजन कोर्ट-2 यांचा समावेश होणार आहे. त्यामुळे शहरातील आणि भिवंडी कोर्टाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पक्षकारांना ठाणे येथे जावे लागणार नाही. त्यामुळे पक्षकारांसह वकीलांचा देखील वेळ आणि पैसा वाया जाणार नाही. या नवीन कोर्टाच्या इमारतीत लायब्ररी, कॅन्टीन, वकील बाररूम, लेडीज वकील बाररूम व वकीलांची लायब्ररी असणार आहे. तसेच पक्षकारांना देखील बसण्याची जागा असणार आहे.
कोर्टाची नवीन इमारत होण्यासाठी साधारणत: दोन वर्षाचा कालावधी जाणार आहे. परंतु नवीन इमारत झाल्यानंतर फॅमिली कोर्ट देखील सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती भिवंडी वकील संघटनाचे अध्यक्ष अ‍ॅड. मंजीत राऊत, सेक्रेटरी सिध्दार्थ भोईर, अ‍ॅड हर्षल पाटील, अ‍ॅड सुनिल पाटील यांनी दिली.
* भारतातील प्रथम लोकन्यायालय भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात सुरू झाले.
* या कोर्टात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका दाव्यासाठी आाले
होते. त्यांनी तो दावा येथे चालविला.
* सध्या या कोर्टात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका असून ते सुनावणीच्या वेळी येत आहेत.
* तसेच दहशतवादी कारवायांचा आरोप असलेल्या साकीब नाचनची केस सुरू आहे.
Share:

ग्रामपंचायतीचा कचरा रस्त्यावर

भिवंडीत स्वच्छता अभियानाचा फज्जा
ग्रामपंचायतीचा कचरा रस्त्यावर,भिवंडीत स्वच्छता अभियानाचा फज्जा

भिवंडी । प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत अभियानासाठी दिवसरात्र जनजागृती करून देशातील जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा थेट मुख्य रस्त्याच्या कडेला टाकून नागरिक व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात टाकून शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचे धिंदवडे उडवत असल्याची घटना दापोडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदारपणाला आळा कधी बसेल? असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना पडला आहे.
तालुक्यातील विकसित समजल्या जाणार्‍या दापोडा ग्रामपंचायतीचा गावातील दैनंदिन कचरा माणकोली, अंजुरफाटा महामार्गावर असलेल्या सरवना हॉटेल ते गुप्ता कंपाऊंडच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत थेट रस्त्यावर टाकला जात आहे. गावातील रोजचा ओला आणि सुका कचरा रोजच या ठिकाणी टाकला जात असल्याने या रस्त्याला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. त्यातच रोजचा निघणारा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी व अगोदरच्या कचर्‍याची विल्हेवाट लागावी यासाठी या कचर्‍याला रोज आग लावण्यात येत आहे. 
त्यामुळे कचर्‍याची दुर्गंधी व पेटलेल्या कचर्‍याच्या धुराने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. त्यातच या कचर्‍यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र असल्याने ही आग रोजच धुमसत असल्याने प्रवाशांसह आजूबाजूला असलेल्या गोदामांमध्ये काम करणार्‍या कामगारांचे व स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या कचर्‍याची विल्हेवाट पर्यायी जागेत करावी अशी मागणी नागरिक व प्रवासी करत आहेत.
Share:

चोरीच्या 33 मोबाईलसह आरोपीला अटक

चोरीच्या 33 मोबाईलसह आरोपीला अटक
 उल्हासनगर । प्रतिनिधी
मोबाईलच्या दुकानाचे शटर मध्यभागी उचकटून त्यावाटे आत शिरून नवीन 33 मोबाईल फोन बॉक्ससह घरफोडी करून चोरून नेणा-या चोरटयाला उल्हासनगर गुन्हे शाखा घटक  4 च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले सर्व मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प 4 येथील सेक्शन 29 परिसरातील श्रीरामनगर येथे आनंद पांडे यांचे अनमोल मोबाईल सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हीस नावाचे मोबाईलचे दुकान आहे. चोरटयाने त्या दुकानाचे लोखंडी शटर मध्यभागी उचकटून त्यावाटे आत प्रवेश केला. दुकानातील वेगवेगळया कंपनीचे नवीन मोबाईल बॉक्ससह सुमारे 45 हजार 510 रूपये किंमतीचे 33 मोबाईल घरफोडी करून चोरून नेले होते. याबाबत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.  नफिज इसहाक खान(20) असे या आरोपीचे नाव आहे.
Share:

डोंबिवलीतील 6 एकर शेती भस्मसात

डोंबिवलीतील 6 एकर शेती भस्मसात

 डोंबिवली । प्रतिनिधी
डोंबिवलीजवळील दावडी-सोनारपाडा येथील एका शेतकर्‍याच्या 5 ते 6 एकर जमिनीवरील पिकांना अज्ञात इसमांनी आग लावल्याने पिके भस्मसात झाली आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लावल्याची शक्यता गावकर्‍यांनी व्यक्त केली असून यापाठीमागे जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. 
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील दावडी- सोनारपाडा गाव समाविष्ट आहे. येथील शेतकरी दिलीप पाटील यांच्या मालकीच्या 13 क्रमांक आणि 18 क्रमांक सर्वेच्या शेतजमीनवरील पिकांना दुपारी आग लागण्याचे काही ग्रामस्थांनी घरी फोन करून सांगितले. या आगीत तुरीची लागवड, कलमे आणि भातशेती जळून खाक झाली होती. ठाकूर यांनी मानपाडा पोलिसांना कळवताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. 
23 ऑक्टोबर रोजी कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या सोनारपाडा गावठाण हद्दीत चौघा अनोळखी व्यक्तींनी ड्रोनद्वारे सर्व्हे करताना त्या भागातील शेती जाळली होती. संतप्त गावकर्‍यांनी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. याची पोलिसांनी गंभीर दाखल घेतली पाहिजे. आमचा एका विकासकावर संशय असून त्याची पोलिसांनी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.
- दिलीप ठाकूर, शेतकरी
पिकांना आग लागली का लावली याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना देणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आहे. 
- गणेश म्हात्रे, ग्रामीण नेते
Share:

गॅस स्फोटात अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू

चायनिज हॉटेलमध्ये मध्यरात्री लागली आग
गॅस स्फोटात अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू,चायनिज हॉटेलमध्ये मध्यरात्री लागली आग
याच महिन्याच्या सुरुवातीला कल्याण पूर्वेत बचावकार्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या 2 जवानांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता ही दुर्घटना घडल्याने कल्याण डोंबिवली अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेचा आणि सुरक्षा उपकरणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
कल्याण । प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशामन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण जागीच गंभीर जखमी झाला आहे. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले होते. त्यावेळी आमले आणि पालवे हे दुकानासमोर उभे राहून आग विझवण्याची तयारी करत असतानाच अचानक प्रचंड मोठा कानठळ्या बसवणारा असा स्फोट झाला. त्यात दुकानाच्या अगदी समोरच उभे असल्याने हे दोघेही जण त्यामध्ये गंभीर जखमी झाले. तर दुर्दैवाने आमले यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री एक वाजून 10 मिनिटांनी हा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. स्फोटानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे जवान जगन आमले यांचा जागीच मृत्यू झाला तर पालवे हे गंभीर जखमी झाले.
Share:

मराठा जल्लोष!

राज्यभर अभिनंदन आणि स्वागत
मराठा जल्लोष!,राज्यभर अभिनंदन आणि स्वागत

  मुंबई । प्रतिनिधी
विधानसभेत गुरुवारी मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात मराठा जल्लोष झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याने सत्ताधारी विरोधक सर्व पक्षांच्या नेतेमंडळींनी त्यांचे स्वागत केले. 

आरक्षणासाठी लढणार्‍या सकल मराठा समाजाचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. भगवे फेटे बांधून सभागृहात बसलेल्या सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी जय भवानी, जय शिवाजी.. राज्य का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो, अशा घोषणा दिल्या.
सकल मराठा समाजाचे अभिनंदन
आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात 58 मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला व संघर्षाला यश आले असून विधिमंडळात एकमताने मराठा आरक्षण कायदा मंजूर झाला. यासाठी मी मराठा समाजाचे अभिनंदन करतो.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विधान परिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या आरक्षणासाठी लढा देणार्‍या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणार्‍या सर्वांचे मी आभार मानतो. -धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
विधेयकाचे स्वागत
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सभागृहामध्ये जे विधेयक मांडण्यात आले त्याचे स्वागत आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास एसइबीसींच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता, जागांच्या आरक्षणासाठी व नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या व पदांच्या आरक्षणासाठी तत्सम व संबंधित बाबींची तरतुदीसाठी हे विधेयक आहे.-अजित पवार, विधिमंडळ पक्षनेते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन 
मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली. तत्परतेने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देताना एससी-एसटी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली.
-रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
Share:

पत्रकार आशिष पाठक याचे निधन

पत्रकार आशिष पाठक याचे निधन

  कल्याण । प्रतिनिधी
कल्याणमधील ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रतिनिधी आशिष पाठक यांचे गुरुवारी निधन झाले. ते 38 वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे. 
आशिष यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात ठाणे वार्तापासून केली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी दै. गावकरीतही काम केले. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही सकाळच्या बातम्यांसाठी त्यांनी काम केले होते. शांत संयमी, हसतमुख आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी  झुंज देत होते. त्यातून बरे झाल्यावर त्यांनी पुन्हा आपले कामही सुरूही केले होते. ते या आजारातून बरे झाले असे वाटत असताना तो पुन्हा बळावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण गणेशघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Share:

ठाणे सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पतीच्या खुनाच्या आरोपातून पत्नीची निर्दोष मुक्तता
ठाणे सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल,पतीच्या खुनाच्या आरोपातून पत्नीची निर्दोष मुक्तता
पत्नी जेहराने पतीची हत्या करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नाही. दांपत्यामध्ये उद्भवणार्‍या भांडणाचा तक्रारीत कुठे उल्लेख नाही. त्यामुळे पतीची हत्या करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी लागणार्‍या ठोस पुराव्यांच्या अभावामुळे जेहराची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल न्यायालयाने दिला.
  ठाणे । प्रतिनिधी
पतीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या पत्नीविरोधात कुठलाही ठोस पुरावा सरकारी पक्ष सादर न करू शकल्याने पुराव्याअभावी पत्नीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ठाणे सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांनी बुधवारी हा निवाडा दिला.
मुंब्रा, आलमास कॉलनी येथे पती मोहमद मेहंदी सय्यद व पत्नी जेहरा राहत होते. 2 मे 2017 रोजी मोहमदच्या काकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात पुतण्या मोहमद मेहंदी हा मृतावस्थेत सापडल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी समशानभूमीतही नेल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्मशानाकडे धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. मात्र शवविच्छेदनात मोहमदचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घरातून गायब असलेली पत्नी जेहराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. याप्रकरणात जेहराने ओढणीने पतीचा गळा आवळून खून केला व हत्येनंतर गुन्ह्यात वापरलेली ओढणी कचरापेटीत टाकली, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. मृताचे काका आई आणि भाऊ यांचीही साक्षही याप्रकरणात नोंदवण्यात आली. मात्र, न्यायालयात सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांची साक्ष आरोप सिद्ध करण्यासाठी पुरसे नसल्याचे न्यायमूर्ती बिष्ट यांनी सांगितले.
Share:

ठाण्यात स्वच्छ भारत अभियानाचा भाजपाकडून धुवाँ!

खोपटमध्ये गॅस पंपासमोर फटाके फोडून आरक्षण जल्लोष
ठाण्यात स्वच्छ भारत अभियानाचा भाजपाकडून धुवाँ!,खोपटमध्ये गॅस पंपासमोर फटाके फोडून आरक्षण जल्लोष

 ठाणे । प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत असताना ठाण्यात भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना भलतीच झिंग चढली. खोपट परिसरात गॅस पंप असल्याचे भान न राखता येथे फटाक्यांची माळच्या माळ लावून केंद्रातील मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचाही धुवाँ उडवला.
पार्टी विथ डिफरन्स आणि सुसंस्कृताचा पक्ष म्हणून मिरवणार्‍या भाजपाच्या या फटाकेबाजीत ठाणे भाजपा अध्यक्ष, महिला अध्यक्षा, ठाणे महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच कार्यकर्ते भान विसरून गुंग झाले होते. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्याने श्रेयवादासाठी स्पर्धा कधीच सुरू झाली आहे. या स्पर्धेत भाजप अव्वल राहावा, यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात संपूर्ण राज्यात जल्लोष करा, हा भाजपा सरकारचा फतवा पाळण्यात आल्याची टीका होत आहे.
भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी स्वच्छ भारत अभियान भररस्त्यावर फटाक्याची माळ लावून साजरे केले. यावेळी प्रचंड प्रमाणात फटाक्यांचा कचराही केला. खोपट भागात महानगर गॅसचा पंपही आहे. सुदैवाने फटाक्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी केली होती. हे अभियान एका वेगळ्याच चळवळीचे रूपात ठाणे भाजप कार्यकर्ता दिसले. फटाक्यांमुळे धूर, ध्वनि व वायू प्रदूषण, भररस्त्यात धागंडधिंगा आणि वाहतूककोंडीमुळे भाजपाच्या संस्कृतीविरोधी जल्लोषावर ठाणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Share:

ठाण्यात स्मार्ट मीटरचा मार्ग अखेर खुला!

 रखडलेले प्रकल्प लागणार झटक्यात मार्गी
ठाण्यात स्मार्ट मीटरचा मार्ग अखेर खुला!, रखडलेले प्रकल्प लागणार झटक्यात मार्गी

ठाणे । प्रतिनिधी
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवणार
  •   पहिल्या टप्यात 1 लाख 13 हजार नळसंयोजनांवर स्मार्ट मीटर बसवणार
  •   कामासाठी 104.50 कोटींचा निधीची तरतूद 
  •   ठाणे महापालिकेला स्मार्ट सिटीतून 70 व 30 टक्के खर्च स्वत: पालिका उचलणार 
  •   1 लाख 13 हजार स्मार्ट मीटर पहिल्या टप्प्यात बसणार
  •   या अंतर्गत निगा देखभाल, मीटर रीडिंग, बिले देणे आदी कामे संबंधित संस्थेला करावी लागतील
  •   वाढीव तरतुदीच्या प्रस्तावाला मंजुरी

शहरातील रखडलेले प्रकल्प लवकरच सुरू होणार असून ठाणे महापालिका स्मार्टसिटी अंतर्गत ‘स्मार्ट मीटर’चा मार्ग गुरुवारी अखेर मोकळा झाला. ठाणे शहर व पोलिसांच्या कमांड कंट्रोल रूमसह एकीकृत शहर डेटा सेंटर डिझाईन व प्रकल्पांच्या अंमलबजावणी संबंधीचा प्रस्ताव, मांसुदा तलाव पदपथ, स्मार्ट सिटी संकेतस्थळासह इतर महत्त्वपूर्ण विषयांना स्मार्ट सिटी मंडळाच्या सातव्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
वाढीव आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्याबरोबर निधी येऊनही रखडलेल्या काही प्रकल्प या बैठकीत चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीत निवड झाल्यानंतर ठाणे शहरासाठी तब्बल 450 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. महापालिकेने आपलेच काही प्रकल्प स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार आत्तापर्यंत 26 प्रकल्पांपैकी सुमारे 12 प्रकल्पांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. यातील 21 प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. तर आलेल्या 450 कोटींच्या निधीपैकी महापालिकेला केवळ 58 कोटी खर्च झाल्याचे सप्टेंबरमध्ये समोर आले होते.
ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत परिसर विकास व सर्व शहरांचा विकास अशी कामांची वर्गवारी केली आहे. परिसर विकासात 10 प्रकल्पांचा समावेश असून सर्व शहर विकासात 6 प्रकल्पांचा समावेश आहे. आधी हायटेक नंतर स्मार्ट व नंतर सेमी ऑटोमेटिक मीटर पद्धतीने मागील 11 वर्षे पालिका नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पद्धतीने निविदा काढण्यात आल्या होत्या.
आता नवीन वर्षात स्मार्ट मीटरची योजना सुरू होणार आहे. ठाणे शहरात 2 हजार सीसीटीव्हींपैकी शहराच्या मुख्य भागांत आजघडीला 450 च्या आसपास कॅमेरे लागले आहेत. त्यानुसार ठाणे शहर व ठाणे पोलिसांच्या कमांड व कंट्रोल रूमसह एकीकृत शहर डेटा सेंटर डिझाईन आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीत 5 वर्षांसाठी ऑपरेशन देखभाल व व्यवस्थापनासाठी संस्थेच्या निवडीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिबीलिटी समिती तयार करणे, पेडेस्ट्रियन इमप्रुव्हमेंट प्रकल्पासाठी ठेकेदाराची नियुक्ती, मांसुदा तलावाजवळील शिवाजी रोडची व पदपथ रुंदीकरणासाठी ठेकेदाराची नियुक्ती, महापालिका अंतर्गत सर्व्हिस लेव्हल बेंचमार्किंग मॉनिटरिंगसाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली डिझाईन व अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर नियुक्तीसाठी निविदा मंजुरी, सिवरेज सिस्टिम प्रकल्पासाठी ठेकेदार नियुक्ती, महापालिकेच्या सेवांसाठी एकत्रित इआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्ससेस प्लानिंग) सोल्युशनच्या अंमलबजावणीसाठी निकष, अटी व शर्ती ठरवणे, स्मार्ट सिटी कंपनीची स्वतंत्र वेबसाईट तयार करणे आदींसह इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. 
Share:

विधिमंडळात विधेयक चर्चेविना मंजूर राज्यातील आरक्षणाची मर्यादा आता 68 टक्क्यांवर

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण
विधिमंडळात विधेयक चर्चेविना मंजूर   राज्यातील आरक्षणाची मर्यादा आता 68 टक्क्यांवर,मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण
मुंबई। प्रतिनिधी
प्रदीर्घ प्रतीक्षा, 41 मराठा तरुणांची आहुती आणि लाखोंच्या घरातील मराठा समाजाचे 58 शांततापूर्ण मोर्चे अशा वाटचालीनंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणासाठी हे आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळात कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे.
आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचा एसईबीसी असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर आरक्षण अस्तित्वात येईल. हे  आरक्षण तमिळनाडूच्या धर्तीवर असणार आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यात आता 68 टक्के आरक्षण झाले आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने दिलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारून सरकारने हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवालावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचा कृती अहवाल (एटीआर) विधानसभेत सादर केला. अहवाल अभ्यासासाठी विधानसभेतील सदस्यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर दुपारी कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेविना आरक्षण विधेयकावर मोहोर उमटविण्यात आली. विधेयक क्रमांक 78 मंजूर झाल्यानंतर फेटे बांधून आलेल्या भाजपा आमदारांनी शिवाजी महाराज की जय घोषणेने सभागृह दणाणून सोडले. सर्वच विरोधी पक्षांनी विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानले. विधान परिषदेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास थांबवून मुख्यमंत्र्यांना विधेयक सादर करण्याची परवानगी दिली. मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात सादर होणार असल्याने सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. अधिकाऱी व प्रेक्षक गॅलर्‍या तुडूंब भरल्या होत्या. 
हे आरक्षण टिकणार : मुख्यमंत्री
*‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रियेच्या अभ्यासानंतर मराठा समाजाला आरक्षण दिल्याने हे आरक्षण टिकाऊ आहे 
* राज्यात मराठा आंदोलनादरम्यान ज्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत, अशा 200 आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील.
अहवाल आणि शिफारसी
* मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) म्हणून घोषित * एसईबीसी मराठा समाज संविधानातील अनुच्छेद 15(4), 16(4) मध्ये समाविष्ट आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास पात्र
* अल्पसंख्यांकाच्या शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था, खासगी शैक्षणिक संस्था, अनुदानप्राप्त, विनाअनुदानित संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद
* लोकसेवा, सरळसेवा नियुक्त्यांमध्ये आरक्षण
आरक्षणासमोर कायद्याचे आव्हान
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकर्‍यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार असले तरी या आरक्षणासमोर घटनेतील तरतुदी आणि कायद्याचे आव्हान उभे आहे. राज्य सरकारने गेल्या रविवारी राज्य मागास आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी विधेयक मंजूर झाल्यावर हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र या आरक्षणाला कुणबी समाजाकडून न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कुणबी समाजाचा समावेश करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणे शक्य नाही. कारण, कुणबी समाजाचा आधीच ओबीसी कोट्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कुणबी मराठा समाजासोबत एसईबीसी वर्गात सामील होणार नाहीत, या निर्णयाच्या विरोधात ते याला कोर्टात आव्हान देतील. मराठा  
समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यातल्या आरक्षणाची मर्यादा आता 68 टक्क्यांवर गेली आहे. तामिळनाडूनंतर एवढं आरक्षण देणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. राज्यघटनेनुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येत नाही. मात्र विशेष परिस्थितीत राज्य सरकार जास्त आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ शकते.
तामिळनाडूच्या आरक्षणाचा प्रश्न हा अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळं तिथे निर्धोकपणे 69 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याच पॅटर्नचा आधार घेत आता महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घेतल्याने हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकावा यासाठी राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे.
आरक्षणाची वर्गवारी
अनुसूचित जाती जमाती - 20 टक्के
ओबीसी - 19 टक्के
मराठा - 16 टक्के
भटके विमुक्त - 11 टक्के
विशेष मागासवर्ग - 02 टक्के
एकूण आरक्षण - 68 टक्के
Share:

हा तर लोकसभा निवडणुकीचा उघड प्रचार!


केंद्र सरकारने आता जिल्हा, जिल्ह्यात, घरोघरी पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याची योजना आखली आहे. या योजनेत आपल्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा शुभारंभ नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. त्याच वेळी तो आपल्या जिल्ह्यातही झाला. इतकी महत्वाची योजना राबविली जात असताना इथल्या लोकप्रतिनिधींना थांगपत्ता नाही हे कसे शक्य आहे? शिवाय या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कोणी केला? महाराष्ट्र सरकारला, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना याची कल्पना कशी नाही? हा प्रकार काय आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.
एवढ्या महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला एकही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते हजर नव्हते. मात्र जिल्हाधिकारी पांढरपट्टे आणि अन्य अधिकारी आवर्जून उपस्थित होते. यावेळी बोलताना पांढरपट्टे यांनी प्रदूषण मुक्त सिंधुदुर्गसाठी नैसर्गिक गॅस घरोघरी मिळणार असल्याचे जाहीर करत जनतेने त्याचा लाभ  घ्यावा असे आवाहन केले. महिलांना चूल पेटविण्यासाठी होणारा त्रास आणि धुरापासून त्यांची मुक्तता होणार आहे, तेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस योजनेची पाईपलाईन पोहोचविण्यासाठी संबंधित कंपनीला सहकार्य करावं असं आवाहनही पांढरपट्टे यांनी केलं. पांढरपट्टे यांनी केलेली ही घोषणा आणि सिंधुदुर्गवासीयांना केलेले आवाहन ऐकून सर्वांची माने सुखावली असतील. महिला तर आताच इतक्या आनंदीत झाल्या की विचारू नका.
वीस- पंचवीस वर्षांपूर्वी रिलायन्स कंपनी जिल्ह्यात गॅस पाईपलाईन टाकणार आणि लोकांना घरोघरी गॅस मिळणार अशा बातम्या त्यावेळी वृत्तपत्रातून झळकल्या होत्या पण पुढे काहीच झाले नाही. आताच्या बातमीने मात्र लोक खरोखरच आनंदीत झाले कारण एकच. जिल्हाधिकारी स्वतः आवाहन करतात म्हणजे बातमी खरी आहे. जिल्ह्यात पाईपलाईनचे काम कधी पूर्ण होणार हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. एक मात्र खरं की निवडणुकीपूर्वी कामाला नक्की सुरुवात होईल नंतरचे काय हे कोणीच सांगू शकणार नाही. जणू काही उद्यापासूनच घरपोच गॅस मिळणार असेच पांढरपट्टे यांना वाटले असावे. जी कंपनी हे काम करणार आहे, त्या कंपनीच्या कामाची सुरुवात दोडामार्गपासून सुरू करणार असे त्यांनी जाहीर केले. असले तरी काम कधी पूर्ण होणार हे मात्र सांगायला कंपनीचे अधिकारी जाणूनबुजून, सोयीस्करपणे  विसरले असावेत. या योजनेवर किती खर्च येणार, तो कोण करणार? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड कोणी  आणि कशी केली? हे व असे अनेक प्रश्न आज तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडले असणार! तसे ते पांढरपट्टे यांनाही पडले असणार? पण ते तरी काय करणार? वरून आदेश आला आणि सर्व अधिकारी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित राहिला.कदाचित या निवडणुकीपर्यंत काम सुरूही होईल. पण नंतर काय? 
ही घोषणा फसवी असेल तर ‘गॅस कनेक्शन घ्या’ असे आवाहन करणारे  पांढरपट्टे तेव्हा निवृत्त झालेले असतील. या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले लोकप्रतिनिधी,र ाजकीय नेतेमंडळी अंग झटकून मोकळे होतील. उज्वला गॅस योजनेचा असाच डांगोरा पिटण्यात आला. दुर्गम भागात पहिला सिलिंडर पोहोचला. मात्र दुसरा सिलिंडर (रिफिल)आणण्यासाठी खेड्यापाड्यातील गोरगरीब ग्रामस्थांनी रिक्षाला पैसे आणायचे कुठून? एकूणच या योजनेचा बोजवारा उडणार हे वेगळे सांगायला नको.
परवा राज्य  वीज मंडळाचे पाठक नावाचे एक संचालक अचानकपणे जिल्ह्यात येऊन गेले. जणू देवदूतच. सिंधुदुर्गातील विजेचे सर्व प्रश्न आता सुटणार असे त्यांनी जाहीर केले. येतांना ते सोबत पाच हजार कोटी रुपये घेऊन आले आहेत अशा थाटातच त्यानी अनेक घोषणा केल्या. एरवी भरमसाठ वीज बिलातून झटका देणार्‍या वीज वितरण कंपनीच्या संचालकांनी क्षणभर का होईना पण एक सुखद धक्का मात्र नक्की दिला.
मागील चार वर्षांत मुख्यमंत्री आणि वीज मंत्री यांनी जे उत्तम नियोजन केलं त्यामुळे आता भारनियमन होणार नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलं. आता नियोजन काय केलं, कसं केलं कोण जाणे पण लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी भारनियमन नाही हे नक्की. पाठक यांच्या या आकस्मिक भेटीने अनेकांना शंकेने ग्रासले असणार! इतक्या वर्षात वीज मंत्री येऊन आश्वासने देऊन गेल्याचे आणि ती कधीच पाळली नाहीत हे आम्ही ऐकले आहे, पाहिले आहे. पण कोणीतरी पाठक नावाचा एक संचालक अचानक जिल्ह्यात येतो काय आणि सरकारच्या कारभारावर स्तुतीसुमने उधळतो काय यावरून हा निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे हे सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही हे पाठक यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.
ही तर राणेंविरुद्ध संघर्ष यात्रा!
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ‘जनसंघर्ष यात्रा’ नुकतीच पार पडली. या यात्रेच्या निमित्ताने सर्व प्रमुख शहरात काँग्रेस पक्षाच्या सभा झाल्या आणि काँग्रेसचं अस्तित्व जाणवलं. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्वच जाणवत नव्हतं. किंबहुना राणेंच्याच भाषेत सांगायचे तर त्यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून जिल्ह्यात काँग्रेस शिल्लकच ठेवली नाही. गेले वर्षभर तर जिल्ह्यात काँग्रेस आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात लक्ष घालून काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली.जिल्हा काँग्रेसची नव्याने पुनर्रचना केली. पक्षाच्या कामाला, सभासद नोंदणीला सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाला मानणारी, जी जुनी-जाणती मंडळी इतकी वर्षे अलिप्त राहिली होती ती राणे आणि त्यांचे समर्थक पक्ष सोडून गेल्यानंतर पुन्हा सक्रिय होऊ लागली. मात्र गेल्या काही महिन्यात काँग्रेसकडे कार्यक्रमच नसल्याने एक प्रकारे मरगळ आली होती. परवाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने ही मरगळ झटकली गेली.
खरं तर लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना या यात्रेच्या निमित्ताने पक्षाची नेतेमंडळी कार्यकर्त्यांना कार्यक्रम देतील अशी अपेक्षा होती. पण याच दरम्यान ‘राणेंची राष्ट्रवादीशी जवळीक’, स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पाठिंबा देणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या (की जाणून बुजून तशा पुड्या सोडण्यात आल्या ). या बातमीने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळे यात्रेला हजेरी लावणारे नेते बिथरले आणि काहीनी राणेंवर तोंडसुख घेतले. राणे काँग्रेसमधून बाहेर पडले तरी काँग्रेस पक्ष संपलेला नाही, अशी गर्जनाही काहींनी केली. राणे जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हा काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांचे ‘रेड कार्पेट’  स्वागत झाले. आज जे नेते राणेंवर तोंडसूख घेत आहेत त्यापैकी काहींनी तेव्हा राणेंचे इतके गुणगान गायले होते ते कार्यकर्ते आजही विसरलेले नाहीत. ते नेते मात्र विसरले असतील.        
अर्थात बिथरलेल्या, मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण करावा लागतो हे जरी खरे असले तरी नेतेमंडळींनी राणेंवर बोलणे टाळायला हवे होते असे काही कार्यकर्तेच आता उघडपणे बोलू लागले आहेत. राणेंवर तोंडसूख घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांना वाढती महागाई, जिल्ह्याच्या विविध समस्या यावर आंदोलनात्मक कार्यक्रम द्यायला हवा होता. पक्षवाढीसाठी आणि येणार्‍या निवडणुकीसाठी हे गरजेचे होते. एकूणच जनसंघर्ष यात्रेमुळे कार्यकर्त्यांमधील मरगळ गेली आणि काँग्रेसचे अस्तित्व जाणवले. हेच या यात्रेचे फलित म्हणावे लागेल.
नाणार विरोधी आंदोलन!
नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आता स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा.महेंद्र नाटेकर मैदानात उतरले आहेत. येत्या 27 नोव्हेंबर रोजी नाटेकर आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. संघर्ष समितीची नुकतीच कणकवलीत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कोकणवासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाटेकर यांनी केले आहे. या निमित्ताने नाणार प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Share:

हे आरक्षण तरी खरोखरीच मिळू दे!

लाखोंच्या घरातील मराठा समाजाचा 58 शांततापूर्ण मोर्चे, 41 मराठा तरुणांची आरक्षणासाठी आहुती आणि दीर्घ प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण अखेर जाहीर केले आहे. तसे विधेयकही गुरुवारी विधिमंडळात एकमताने आणि चर्चेविना मंजूर झाले. हेच आरक्षण आधीच्या आघाडी सरकारनेही निवडणुका तोंडावर आल्यावर नारायण राणे यांची समिती नेमून दिले होते. राणे समितीनेही 16 टक्के आरक्षणाचीच शिफारस केली होती. ती स्वीकारून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलेही होते. अर्थातच ते न्यायालयात टिकले नाही. निवडणुका झाल्या, भाकरी मतदारांनीच फिरवली आणि मराठा आरक्षणाची पुन्हा फरफट सुरू झाली. योगायोगाच्या गोष्टी असतात. तेव्हा आरक्षण जाहीर झाल्यावर जे मथळे प्रसार माध्यमांनी दिले, आंदोलकांनी आणि समर्थकांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी ज्या घोषणा दिल्या, जो जल्लोष झाला तोच गुरुवारीही अनुभवास आला. फक्त पार्टी बदलली होती. आता पुन्हा निवडणुका काही महिन्यांवर आल्याची चर्चा आहे. आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षण तेही नेमके 16 टक्केच जाहीर झाले आहे. या वेळी मागास वर्ग आयोगाच्या शिफारसी स्वीकारून या आरक्षणाचे विधेयक मांडले गेले, विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला पण कायद्याच्या चौकटीवर हे आरक्षण टिकणारे नाही अशी कुजबुज लगेचच सुरू झाली आहे. तसे होऊ नये, मोठ्या कष्टाने आणि मोठ्या संघर्षानंतर, 41 मराठ्यांनी बलिदान दिल्यानंतर हातातोंडाशी आलेले हे आरक्षण तरी टिकावे अशीच समस्त मराठा समाजाची भावना आहे. जल्लोष करा म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द पाळला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेतच. कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच हे आरक्षण दिले आहे, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. मराठा समाज त्यामुळे आश्वस्त झाला असला तरी एकूण आरक्षण प्रकरणाची पूर्वपीठीका पाहाता मनात धाकधूक आहेच. कुणी ना कुणी उठतो आणि या आरक्षणात कोलदांडा घालतो असा पूर्वानुभव असल्यामुळेच ही धाकधूक आहे. ओबीसींच्या आरक्षणात हस्तक्षेप न करता स्वतंत्र प्रवर्गाद्वारे आरक्षण दिले असले तरी कुणबी समाजच न्यायालयात जाऊ शकतो, अशी एक अटकळ आहे. बहुसंख्य मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिन्ही निकष पूर्ण करतो. सध्या कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आहे. त्यांचा मराठा समाजाबरोबर अंतर्भाव झाल्यास त्यांच्या आरक्षणाचा टक्का कमी होणार हे उघड. म्हणूनच कुणबी समाज या आरक्षणाविरोधात न्यायालयात जाऊ शकतो. अर्थात,  9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार फक्त उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींनाच या आरक्षणाचा लाभ मिळणार असे सरकारने म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काही घटक आजही कार्यरत आहेत. या घटकांकडून कुणबी समाजाला चिथावणी मिळाल्यास न्यायालयीन लढाई अटळ आहे. सरकारने या सगळ्याची काळजी घेतली आहे, अशी फडणवीस यांची ग्वाहीच सध्या आशेचा किरण म्हणावी लागेल. जल्लोष करताना पुढे काय वाढून ठेवले आहे याचीही जाणीव व्हावी म्हणून हा उहापोह आवश्यक आहे. तमिळनाडू पॅटर्नचा अवलंब सरकार मराठा आरक्षणासाठी करणार असेल तर तेथेही सर्वोच्च न्यायालयाची राखून ठेवलेल्या निकालाची टांगती तलवार राहाणारा आहे. माजी महाधिवक्ता श्रीहरी राणे यांच्या मते विधेयकाची अंमलबजावणी करण्यास सरकाराची कसोटी लागणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले असे सरकार म्हणते म्हणजे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला गेला असे म्हणावे लागेल. त्यामुळे नाव बदलून आरक्षण देणे हे कोर्टात अडचणीचे ठरू शकते, असे अणे यांचे म्हणणे विचारात घ्यावे लागेल. अनुसूचित जाती जमाती - 20 टक्के, ओबीसी - 19 टक्के, भटके विमुक्त - 11 टक्के, विशेष मागासवर्ग - 02 टक्के आणि आता मराठा समाजासाठी 16 टक्के असे राज्यातील एकूण आरक्षण 68 टक्के झाले आहे. राज्यघटनेनुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येत नाही. मात्र विशेष परिस्थितीत राज्य सरकार जास्त आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ शकते. मराठा समाजातील 13.42 टक्के निरक्षर आहेत, 93 टक्के मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखांच्यापेक्षा कमी असते, 24.2 टक्के मराठा समाज दारिद्र्यरेषेखाली आहे, 71 टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक आहेत, हे मुद्दे आरक्षणाचे समर्थन करताना सरकारला न्यायालयात ठामपणे आणि पुराव्यांसह मांडावे लागतील. जल्लोष आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरु असताना या वास्तवाचे भान मराठा समाजाने बाळगावे इतकेच.
Share:

मुलांमधील ‘फ्लॅट फूट’

ईतर,मुलांमधील ‘फ्लॅट फूट’

भारतात असे म्हटले जाते की, 20 टक्के ते 25 टक्के लोक फ्लॅट फूटने पीडित आहेत. या अभूतपूर्व आजारामध्ये पायाच्या तळव्यासोबतच पायाचा आर्क देखील पूर्णपणे किंवा अंशत: जमिनीला टेकतो. मेडिअल लाँगीट्युडिनल आर्क म्हणून ओळखला जाणारा आजार जीवनाच्या सुरूवातीच्या काळामध्ये विकसित होतो. म्हणूनच फ्लॅट फूट हा आजार तान्ह्या बालक, मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. हा आजार प्रौढ व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. पायाचा आर्क पायाला लवचिकता देतो, ज्यामुळे पायाचा मधला भाग विस्तारित व जवळ येऊ शकतो. यामुळे पायाला संतुलन व चालण्यासाठी शक्ती मिळते. 
लक्षणे: काही लोकांमध्ये फ्लॅट फूटशी संबंधित कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे आढळून येत नाहीत. फ्लॅट फूटने पीडित रुग्णांच्या खासकरून टाचेमध्ये वेदना जाणवतात. पायाच्या आर्कच्या आतील भागावर सूज देखील येऊ शकते. 
कारणे: काही लोकांचा पायाचा आर्क बालपणातील संगोपनामुळे प्रबळपणे विकसित होतो, तर काही लोकांमध्ये पायाचा आर्क प्रबळपणे विकसित होत नाही. काही मुलांमध्ये लवचिक फ्लॅट फूट असते, ज्यामध्ये मुले बसले असताना टाचांवर उभे असताना आर्क दिसून येते, पण उभे राहिल्यानंतर दिसनासे होते. बहुतांश मुलांमध्ये कोणत्याही समस्यांशिवाय लवचिक फ्लॅट फूट विकसित होते. काहीवेळा आर्क्स देखील पडतात. वर्षानुवर्षे बदलासह आर्कला साह्य करणारे घोट्याच्या आतील स्नायूबंध कमकुवत होतात. 
तान्ही बालक आणि मुलांमधील फ्लॅट फूट : सामान्यत: तान्ह्या बालकांमध्ये पायाच्या आर्कचा आकार कमी असतो. नवजात बालक व लहान मुलांमध्ये मेडिअल लाँगीट्युडिनल आर्किंगअंतर्गत पायाचा तळवा सरळ असतो. हे आर्किंग 2 ते 5 वर्षे वयादरम्यान आर्क विकसित होत असताना त्यांचे संरक्षण करते. 3 ते 6 वर्षे वयोगटातील 45 टक्के मुलांचे तळवे सपाट आहेत. ज्यामुळे त्यांना आपले वजन सांभाळत पुढे सरकताना काळजी घ्यावी लागते. या बहुतांश मुलांमध्ये वयाच्या 10 व्या वर्षादरम्यान अधिक प्रमाणात सामान्य आर्क विकसित होते. पण फ्लॅट फूट एका बाजूला किंवा वयाच्या 12 ते 14 वर्षांदरम्यान विकसित झाले तर मुलाला स्पेशालिस्टकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. मुलांमधील लठ्ठपणा हे बालपणीच लाँगीट्युडिनल आर्क विकसित होण्यासाठी कारणीभूत ठरते. 
निदान: डॉक्टर मुलाच्या पायाची शारीरिक तपासणी करेल आणि उभे राहून, तसेच बसलेल्या स्थितीत पायाचे निरीक्षण करेल. या आजारासोबत वेदना होत असतील तर एक्स-रेज, फूट प्रिंट्स सारख्या चाचण्या देखील केल्या जाऊ शकतात. काही केसेसमध्ये कम्प्युटेड टोमोग्राफी किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगचा देखील सल्ला दिला जाऊ शकतो. 
उपचार: वेदना होत नसल्यास फ्लॅट फूटसाठी उपचाराची गरज नाही. पण फ्लॅट फूट वेदनादायी असेल तर डॉक्टर खालील सल्ला देऊ शकतात: 
आर्क सपोर्ट्स (ऑर्थोटिक डिवाईसेस): ओव्हर-द-काऊंटर आर्क सपोर्ट्स फ्लॅट फूटमुळे होणा-या वेदना कमी होण्यामध्ये मदत करू शकतात. किंवा पायाच्या कॉन्टर्ससाठी तयार करण्यात आलेले कस्टम-डिझाइन आर्क सपोर्टचा सल्ला दिला जाऊ शकतो. आर्क सपोर्ट्स फ्लॅट फूट बरा करणार नाहीत, पण ते लक्षणे कमी करतात. 
स्ट्रेचिंग व्यायाम: फ्लॅट फूट असलेल्या काही मुलांमधील अ‍ॅकिलीज टेंडन कमी उंचीचे असते. या टेंडनना स्ट्रेच करण्याचा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.  
सपोर्टिव्ह शूज: रचनात्मकदृष्ट्या सपोर्टिव्ह शूज कमी सपोर्टसह सँडल्स किंवा शूजपेक्षा अधिक आरामदायी असू शकतात. 
फिजिकल थेरपी: फ्लॅट फूटमध्ये धावल्याने पायाला दुखापती होऊ शकतात. यासंदर्भात फिजिकल थेरपीस्टची मदत फायदेशीर ठरू शकते. धावण्यामधील तंत्रे सुधारण्यासाठी व्हिडिओ अ‍ॅनालिसिसचा उपयोग होऊ शकतो.
सर्जिकल उपचार: वेदना कमी करत पायाचा आकार मूळ करणे हा सर्जरीचा हेतू आहे. शूज किंवा ऑर्थोटिक मोडिफिकेशन्सला प्रतिसाद न देणारी लक्षणे असलेल्या आणि वेदना कमी करणा-या कृती करण्यामध्ये असमर्थ असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत राखीव आहे.  
Share:

स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांसाठी रिहॅबिलिटेटिव्ह केअर

स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांसाठी रिहॅबिलिटेटिव्ह केअर

स्तनाचा कर्करोग हा काही महिला सहन करत असलेला मानसिक व शारीरिक स्थितींवर परिणाम करणारा आजार आहे. उपचारानंतर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात. ज्यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात आणि स्नायूंची शक्ती देखील कमी होते. मानसिक आरोग्यासंदर्भात कोणतीही व्यक्ती या आजारामुळे होणा-या संघर्षाबाबत विचार देखील करू शकत नाही. 
उपचारादरम्यान किंवा उपचारानंतर शरीरामध्ये काही समस्या जाणवल्या तर त्याबाबत डॉक्टरांना सांगा. यामुळे योग्य शारीरिक रिहॅबिलिटेटिव्ह केअर घेता येऊ शकेल. अनेक लोक कर्करोगाच्या उपचारानंतर त्यांच्या रोजच्या कृती, नियमित कामे किंवा व्यायाम करण्याची योग्य वेळ कधी येईल याबाबत विचार करत असतात. तर काहीजण अगदी योग्य दिशेने वाटचाल करतात आणि काहीजण योग्य दिशेने वाटचाल करत नसतीलही. योग्य दिशेने जाण्याचा मार्ग चांगला आहे, पण काळजीसोबत सावधानता देखील बाळगली पाहिजे. 
* तुमच्या रोजच्या कृती हळूहळू वाढवा; शरीरावर लगेच कामाचा ताण टाकू नका. 
* सौम्य स्वरूपाचा व्यायाम चांगला आहे. पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यांची संमती असल्यावरच व्यायामाला सुरूवात करा. 
* शरीराच्या शस्त्रक्रिया झालेल्या भागावर बारकाईने नजर ठेवा. 
* कोणतीही वेदना झाल्यास, अस्वस्थ वाटल्यास आराम करा. ही लक्षणे कमी झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सौम्य स्वरूपाचा व्यायाम करू शकता. 
* व्यायाम करताना वारंवार लक्षणे जाणवू लागली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
* उपचारानंतर व्यायाम तुम्हाला शक्ती मिळवण्यामध्ये मदत करू शकते. म्हणून हळूहळू व्यायाम वाढवा. असे केल्यास तुम्हाला रोजच्या कृती करण्यामध्ये आनंद येईल. 
स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांनी उपचारानंतर त्यांचे सामान्य जीवन जगण्यासाठी अनेक सल्ले घेतले पाहिजेत. या आजाराचे दीर्घकालीन मानसिक परिणाम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मानसिक परिणामांमुळे कर्करोगातून वाचलेल्या अनेकांना त्यांचे जीवनावरील नियंत्रण गमावल्यासारखे वाटते आणि त्यांच्यामध्ये असहाय्यपणाची भावना निर्माण होते. त्यांच्यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) निर्माण होण्यासोबतच अनेक मानसिक, न्यूरोलॉजिकल व शारीरिक समस्या निर्माण होतात आणि या समस्या महत्त्वपूर्ण पाच-वर्षांच्या उपचारानंतर देखील अधिक तीव्र होतात.
 या समस्येवर मात करणारे उपाय :
भावना एकमेकांना सांगणे महत्त्वाचे आहे: हे अवघड असले तरी कर्करोग, विशेषत: स्तनाचा कर्करोग सारख्या जीवन बदलणार्‍या घटनेचा अनुभव घेतल्यानंतर जीवनात काय घडत आहे याबाबत बोलणे काही चुकीचे नाही. एखाद्याने त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा समुपदेशक किंवा थेरपीस्टसोबत त्यांचे अनुभव आणि समस्यांबाबत बोलले पाहिजे. एखाद्याला मानसिक पाठिंबा मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 
उपचाराचा प्रवास लांब असला तरी हळूहळू प्रयत्न करा: तुम्हाला उपचार पूर्ण झाल्यानंतर, बरे वाटल्यानंतर सोडले जाऊ शकते किंवा तुमची नवीन ध्येये असू शकतात, जी तुम्हाला पूर्ण करायची आहेत. पण तुम्हाला कर्करोगानंतर देखील जीवनात चिंता भासू शकतात. तुम्ही रोजच्या जीवनात करत असलेल्या गोष्टी करण्यासाठी काहीसा अवधी लागेल. आजार होण्यापूर्वी तुम्ही करत असलेल्या नेहमीच्या कामांसाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागेल. तुम्ही नवीन सामान्य जीवन जगण्यासाठी मनापासून तयार झाले पाहिजे, तुम्ही एका रात्रीमध्येच बरे होणार नाही. असे म्हटले जाते की, काळ हा सर्वोत्तम उपचार आहे. जीवनामध्ये सौंदर्याची भावना, स्वत:वरील विश्वास आणि इतर सकारात्मक गोष्टींवरील फोकस परिस्थितीला उत्तमपणे हाताळण्यामध्ये मदत करतात. 
समर्थन करणारा समूह: समर्थन करणारा समूह याच प्रवासामध्ये असलेल्या लोकांसोबत मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करण्यामध्ये मदत करतो. ते देखील उपचारांच्या विविध पैलूंसंदर्भात मार्गदर्शन करतात आणि शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीनच निदान झालेल्या रुग्णांना आत्मविश्वास देतात. 
Share:

बैठका - व्यायाम आपण का टाळावा?

बैठका - व्यायाम आपण का टाळावा?

बैठका काढणे ही शरीराची एक अत्यंत मूलभूत हालचाल असते. या व्यायामप्रकाराला व्यायामाचा राजा असेही म्हटले जाते, कारण शारीरिक ताकदीची आवश्यकता असलेल्या प्रत्येक खेळात या व्यायामप्रकाराचा अनेक दशकांपासून वारसा चालत आलेला आहे. शरीरसौष्ठवापासून ते कुस्तीपर्यंत कुणाच्याही दैनंदिन व्यायामात बैठका हा एक महत्त्वाचा व्यायाम असतो. यात शरीराचे कंबरेपासून खालचे अवयव आणि शरीराच्या मध्यवर्ती भागातील स्नायू समाविष्ट असतात. त्यामुळे ही अत्यंत कार्यक्षम अशी हालचाल असते.
असे असले तरी बैठकांमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी सराव आणि वेळ दोन्हीची आवश्यकता असते. ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. त्यात अनेक तांत्रिक बाबी लक्षात घ्यावा लागतात, शरीराच्या हालचालीची ढब बदलावी लागते, अनेक बारीसारीक तपशीलांचा विचार करावा लागतो. पण, बैठका काढणे न जमणार्‍यांपैकी तुम्ही एक असाल तर काय? बैठका काढताना किंवा बैठका काढल्यानंतर तुमच्या गुडघ्याच्या भोवती वेदना होत असतील तर काय? यातील सत्य हे की तुमच्या आवडत्या व्यायामप्रकारच्या बाबतीत तुम्ही अधिक विचार केला पाहिजे आणि तुम्ही तो व्यायाम किती वेळ करता हेही लक्षात घेतले पाहिजे. पण तुम्ही या आधी कधी जिममध्ये गेलाच नसाल किंवा पहिल्यांदाच जिममध्ये जाणार असाल तर काय? बैठका पूर्णपणे टाळणे, हाच त्यावरील उपाय आहे का?
बैठका हा एक संयुक्त, पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. बैठकांमध्ये विविध प्रकारच्या हालचाली, तीव्रता, वजन, पुनरावृत्ती, सेट्स आणि बैठकांचे प्रकार (स्मिथ मशीन किंवा बारबेल) यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात उर्जा खर्च होते. खोल बैठका आणि वजन आणि/किंवा अडथळे यामुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर दाब येतो. त्याचप्रमाणे बैठकांमुळे पाठीच्या कण्याचा कटीभाग आणि गुडघ्यांचे आजार उद्भवू शकतात, असे अनेक अभ्यासांती आढळून आले आहे. त्याचप्रमाणे गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिस (जीर्ण) होण्यासाठी बैठकांचा व्यायाम कारणीभूत असतो, अशा प्रकारची निरीक्षणे आढळून आली आहेत.
आपल्यापैकी काही जणांना शारीरिकदृष्ट्याच बैठकांचा व्यायाम साजेसा नसतो
खालील कारणांसाठी हा व्यायामप्रकार टाळणे आवश्यक होऊन बसते:
1.  मांडीच्या मागील बाजूस ग्लुट्स आणि हॅमस्ट्रिंग्स हे स्नायू असात. या दोन स्नायूंकडे काहीसे दुर्लक्ष होते आणि विशेषत: ज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात, कारमध्ये बसून ऑफिसला जातात किंवा ज्यांची बैठी जीवनशैली असते त्या व्यक्तींचे हे स्नायू कालांतराने हे कमकुवत होतात. तुमचे हॅमस्ट्रिंगचे स्नायू आणि ग्लुट्स कमकुवत असताना तुम्ही बैठका मारण्याचा प्रयत्न केला तर शरीर पाठीच्या खालच्या भागातील स्नायू अधिक वापरते. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात दुखणी निर्माण होऊ शकतात.
2.  अनेकांना पोक काढून बसायची सवय असते. अशा व्यक्तींनी शारीरिक ढब न बदलताच बैठका मारण्यास सुरुवात केली तर त्यांच्या पाठीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.
3.  टीनएजर्स, विशेषत: स्थूल मुली आणि/किंवा ज्यांचे पाय सपाट आहे त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक बैठका काढल्यास गुडघ्याच्या पुढील भागात (गुडघ्याच्या वाटीभोवती) वेदना होऊ शकतात. ही सहनशक्तीची मर्यादा व्यक्तीसापेक्ष आहे आणि पौगंडावस्थेतील काहींमध्ये याचे प्रमाण नगण्य असू शकते.
4.  उच्च रक्तदाब असलेल्या किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी बैठका काढणे टाळावे कारण काही अहवालांनुसार हा व्यायामप्रकार करताना रक्तदाब अचानक वाढू शकतो.
मग, तुम्ही बैठका टाळाव्यात का? बहुतेक संशोधनांनुसार योग्य पद्धतीने बैठका काढणे हा सुरक्षित आणि परिणामकारक व्यायामप्रकार आहे. इतकी चांगली गोष्ट वाईटही असू शकते का? ’अति तेथे माती’ ही म्हण आपल्या सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे सुजाणपणा आणि नियमन ही गुरूकिल्ली आहे.
Share:

पोषक आहार आणि व्यायामाने करा हिवाळ्यातील सांधेदुखीवर मात

पोषक आहार आणि व्यायामाने करा हिवाळ्यातील सांधेदुखीवर मात

हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. सांधे जखडणे, सुजणे, वेदनापूर्वक हालचाली इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी हिवाळ्यात सुरू होतात. थंडीमुळे शारीरीक हलचाली मंदाविल्यानेही सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. थंडीच्या काळामध्येवाढलेला सांधेदुखीचा त्रास जवळपास दोन तृतीयांश रुग्णांना सहन करावा लागतो. हा त्रासवरील उपायांमुळे कमी होतो. वेदना कमीझाल्याने तुमचे दैनंदिन काम तुम्हाला सहज करता येते.
सर्वसाधारणपणे सांधेदुखीची लक्षणे  60 ते 65 वर्षेवयोगटातील वृद्धांमध्ये सांधेदुखीची तक्रार दिसून येते. थंड हवामानात सांध्यामधील वेदना, ताठरपणा आणि सूज वाढते. या आजारासाठी कोणताही कायमस्वरूपी उपचार नसल्याने अनेक आरोग्यतज्ज्ञ सांधेदुखीपासून आराम मिळावायासाठी योग्य आणि पोषक आहारावर भर देण्याचा सल्ला देतात.
जसजसा हवामानाचा पारा खाली उतरू लागतो तसतसे सांधेदुखी डोके वर काढू लागते सांधेदुखीचा त्रास असणार्‍यांसाठी हिवाळा हा वेदनादायक ठरू शकतो. हिवाळ्यामध्ये सांधेदुखी का वाढते या मागची वैज्ञानिक कारणे अनिश्चित आहेत. परंतु या काळात सांधेदुखीच्या रुग्णांची स्थिती क्लेशदायक होते हे नक्की काही सांधेदुखी विषयक संशोधनातून असेसमोर आले आहे की बॅरोमेट्रिक प्रेशर मुळेसांधेदुखी थंडीच्या काळात अधिक बळावते. पण योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या औषधांमुळे सांधेदुखीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे.
हवेच्या दाबातील छोट्याशा बदलांमुळे सांधेदुखी वाढू शकते. यात आणखी भर म्हणून थंडीच्या काळा मध्ये कमी प्रमाणात होणार्‍या शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण ही कमी प्रमाणात होते. असे देखील आढळून आले आहे की याकाळामध्ये परिघीय भागातील रक्ताभिसरण नेहमी पेक्षा कमी 
होते.
सांधेदुखीचा आणि हवामानाचा संबंध खरा असो अथवा नसो, सांधेदुखीमध्ये आराम मिळण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचबरोबर व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. 
1.  कायम उबदार रहा : थंडीमध्ये तुमच्या सर्व सांध्यांना उबदार कपड्यांनी लपेटा. सांध्यांना ऊब द्या.
2.  व्यायाम :  व्यायामा बद्दल तुम्ही जेवढे कमी उदासीन असाल तेवढेच तुमच्या शारिरीक हलचाली सहज होतील.  चालणे हासर्वांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच घरात असतानाही हालचाल करीत रहा. व्यायाम सांधेदुखीला लगाम घालतो. व्यायामानेतुमची शारीरिक क्षमता लवचिकता वाढीस लागते आणि त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते. मात्र तुमच्याफिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच व्यायाम करा. एक चुकीचा व्यायाम तुमचे दुखणे वाढवू शकतो. मी नेहमी माझ्या रुग्णांना हाचसल्ला देतो की तुम्हाला कोणता व्यायाम करायचा आहे हे ठरविण्याआधी तुम्हाला कोणती शारीरिक हालचाल करायची नाही आहेहे शिकून घ्या.
3.  वाफ : सांधेदुखी मध्ये मोलाची मदत करू शकते. बहुतेकदा लोक इलेक्ट्रिक हीटिंग पॅडचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीचावापर करतात, परंतु हे दोन्ही वापरताना काळजी घ्यायला हवी. कारण या दोन्ही गोष्टी झोपताना अंगाखाली राहून गेल्यातरसांधेदुखीच्या वेदना तर कमी होतील परंतु त्वचा मात्र भाजली जाऊ शकते.  या दोन्ही वस्तूंचा वापर पंधरा तेवीस मिनिटांपेक्षाजास्त करू नये. डायबेटिक न्यूरोपथीच्या पेशंटनी वाफेचा अथवा हीटिंगपॅडचा खूप काळजीपूर्वक उपयोग करायला हवा.
4.  आरोग्यदायी आहार: नेहमी संतुलित आहार घ्या. ओमेगा3, फॅटीअ‍ॅसिडस, व्हिटॅमिनके, आणि व्हिटॅमिन सी आर्थ्रायटिसच्यावेदनां कमी करण्यात सहाय्यक ठरतील. ओमेगा6 फॅटी अ‍ॅसिडस असलेले खाद्यपदार्थ शक्यतो टाळा त्याच्यामुळे सांधेदुखी जास्तहोऊ 
शकते.
5.  भरपूर पाणी प्या:  शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याने सांधेदुखीमध्ये वेदना जास्त वाढवू शकतात. म्हणून भरपूर पाणीप्या.
6.  वजन कमी करा:  कमी शारीरिक हालचालीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजनअसल्यास वेदनांमध्ये ही वाढ होते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.
7.  पूरकजीवनसत्वे: व्हिटॅमिनडीच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा आजार बळावू शकतो मात्र पूरक जीवनसत्त्वे आपल्याआरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या.
Share:

Wednesday, November 28, 2018

शेवटची सुट्टी

शेवटची सुट्टी

असाच एक English  picture बघितलेला. Last Holiday आयुष्याची शेवटची सुट्टी. जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजूनपर्यंत जी सुट्टी घेणं परवडत नव्हतं, त्या मोठ्ठ्या सुट्टीवर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हॉटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डॉलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो... पण ती देवाला विचारते, why now? आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास? 
पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता आणखी काही गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते/ वागतेे/ बोलते.
आणि तिला जाणवतं, आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना आपण आयुष्य खर्‍या अर्थाने जगलोच नाही. केवळ भविष्य आणि लोकं काय म्हणतील याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं. I have wasted too much time on assumptions.now i have time only for reality  राहिलेलं दोन आठवड्याचं आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या departmental store owner  लाही खरी खोटी सुनावते. त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.
आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत. तिला कसलाही आजार नाही. ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday  न शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही.
तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात. फिल्मी भाग सोडला तर खरंच विचार करायला लावणारा होता, नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास. आपणही, आजचा/आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही. मनात कायम उद्याची चिंता! काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो. इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो. सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या  सुट्टीत उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो आणि हे सगळं व्यर्थ आहे जे खरच हवं होतं, आनंद/ समाधान हे या कशात नव्हतच. हेे कळायच्या आतच शेवटची सुट्टी लागते. शिलकीतली पुंजी तशीच राहून जाते. न वापरलेली, कोरीच्या कोरी. पण आता निरूपयोगी!
या शेवटच्या सुट्टीपर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर? तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकाच आनंद देईल! हो न? So live life gracefully with your own terms.
Share:

बोलणं


बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
‘आहे हे असं आहे’, 
‘माझा आवाजच मोठा आहे’ 
‘मला अशीच सवय आहे’
असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.(बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. ’कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ - उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन!
काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळत जातं.
शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.
एक प्रयोग केला होता. सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती... अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची.वाढवत जायचे हे शब्द. 
हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे.
शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते. 
कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता - ऐकता आली पाहिजेत.या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती (Time is Money) असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.
बोलणं म्हणजे ,निव्वळ शब्द थोडीच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.वेळात वेळ काढून संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात, पण त्याआधी कसं बोलायचं,ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.
बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.बाकी प्रत्येकाला कधीतरी उतरायचं आहेच!
Share:

बायको आल्यावर बदलला मुलगा!

बायको आल्यावर बदलला मुलगा!

तिने सहजच मुलाला फोन केला... काय चाललंय रे.. ..?
 काही नाही आई...किचन ओटा पुसतोय..तिने भाजी केली.. मी बाकीचे आवरतोय...
ती स्वतःशीच मस्त हसली. ‘ओटा पुसतोय..’ म्हणून सांगतानाचा मुलाचा स्वर तिने स्वतःशी पुन्हा पुन्हा पडताळून पाहिला.. अगदी सहज, स्वच्छ स्वर होता. त्यात खंत नव्हती. नाईलाज नव्हता. तक्रार तर नव्हतीच...होता तो सहज स्वीकार. -Acceptance ..आपण आईबाप म्हणून योग्य track वर आहोत या विचाराने तिला बरं वाटलं.
मागचे काही दिवस ती अशा अनेक बारीकसारीक गोष्टींची नोंद घेत होती. आईवडिल पंधरा दिवस बाहेरगावी गेले तरी एकदाही स्वतःहून त्यांची खबर न घेणारा मुलगा, आता आठवड्यातून चार वेळा फोन करत होता.. तुमचं काय सुरू आहे, आईला नवीन ठिकाणी करमतं का...वगैरे चौकशी करत होता..धाकट्या बहिणीच्या संपर्कात होता..
तिला मैत्रिणींसोबत वेळोवेळी झालेली चर्चा आठवली. ग्रुपमध्ये सगळ्या साधारण समवयस्क असल्याने मुलांविषयी चर्चा नेहमीच होत असे.. आपण मरमर मरायचं, खस्ता खायच्या यांच्यासाठी.. पण त्याचं H$mssshr नाही... बायको आली की बदलतात एका रात्रीत...
किंवा,  दहा वेळा आठवण करून दिली तरी विसरत होता.. आता बायकोने सांगितलेलं कसं न विसरता आणतो... करतो तिच्या पुढे पुढे...
तिला हा नकारात्मक सूर आवडायचा नाही.. त्या स्वरातल्या कडवटपणाचं तिला वाईट वाटायचं.
तिची याबाबत भूमिका वेगळी होती. मुले आपलं बघून शिकतात यावर तिचा विश्वास होता. आपल्या मुलाने एक समंजस जोडीदार व्हावं, जबाबदार भाऊ असावं असं तिला मनापासून वाटत होतं आणि त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालाय असं दिसत होतं. त्याला जसं जमेल, सुचेल तसं तो बायकोला मदत करत होता, त्याला ते ‘आवश्यक’ वाटत होतं. आणि हा बदल रात्रीतून झाला नव्हता. त्याला समज आल्यापासून गेली काही वर्षे तो आपल्या आईवडिलांना ‘बघत’ होता आणि आता नकळत तसं वागत होता. म्हणजे 25 वर्षे तो घरात जे शिकला, ते हळूहळू त्याच्या वागण्यात दिसू लागलं होतं.. हा बायकोमुळे बदलण्याचा विषय नव्हता, तर घरातून मिळालेल्या संस्कारांचा विषय होता. कुटुंबातील जबाबदार समंजस सदस्य म्हणून मुलाची वाटचाल सुरू होणं हे सर्वात महत्वाचं होतं.. ते होत होतं ना? बदल कुणामुळे झाला यापेक्षा बदल झाला हे महत्वाचं होतं. स्वागतार्ह होतं. मग कडवटपणा कशासाठी ?
तिला वाटलं, आपला मुलगा योग्य तेच करतोय याचं समाधान बाळगायचं , की बायको आल्यावरच बदलला असं म्हणत स्वतःच्या सुखात स्वतःच मिठाचा खडा टाकायचा... हा ज्याचा त्याचा चॉईस आहे... नाही का?

Share:

कधी दोस्त तर कधी दुश्मन

कधी दोस्त  तर कधी दुश्मन

पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही. खरं कि नाही! टॉम अँड जेरी सारखं वागून सुद्धा सतत बहरत जात. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळंच सुगंधित होऊन जात. एखाद्या दिवशी नवरा मित्र वाटतो तर दुसर्‍या दिवशी वैरी. दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती एकाच नात्यात गुंतलेले असतात. आणि तो गुंता पतीपत्नीच्या सुरेख नात्याचा असतो... ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे.....
दिमाख कुठे पेंड खायला गेलं होत कोण जाणे, ह्या असल्या माणसाशी लग्न केलं मी, मला काय स्थळांची कमी होती, जन्माचा वैरी नशिबाने भेटलाय. शेजारच्या काकू रडू रडू बोलत होत्या. ऐकून मलाही हसावं कि काय अस्संच झालं. मीही मज्जा म्हणून घरातून आवाज दिला, काकू काय झालं, काय सांगू तुला,  दुष्मनाशीच लग्न झालंय माझं. काकू रडतंच म्हणाल्या, जाऊ द्या ना काकू, खुप प्रेम आहे, हो, काकांचं, तुमच्यावर. मी अगदी मनातून बोलले. कसलं प्रेम, वीस वर्ष झाले लग्नाला, मी म्हटलं आता मुरेल हा माणूस, पण कसलं, अजूनही वैरी आहे माझा. मला नेहमीच धारेवर धरण्यासाठी तयार असतो. कधी एका शब्दाचं कौतुक नाही, पण चुका मोजायला नेहमी तयार. काकू हुंदके देतं आणि स्वयंपाक करता करता कुरकुरत होत्या.
पंधरा दिवसा आधीचीच गोष्ट होती, शेजारच्या काकू काकांचा 20 वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात झाला होता. तेव्हा काकू काकांची फार स्तुती करत होत्या. आणि ते खरंही होत. त्या म्हणाल्या होत्या कि, लग्नानंतर नवर्‍याच्या रूपात जिवाभावाचा दोस्त भेटला मला, यांनी साथ दिलं म्हणून मी नोकरी करू शकले. अजूनही त्या दोघांचं कार्यक्रमातलं संभाषण माझ्या मनातून जात नव्हतं आणि आज अचानक हे ऐकलं तेव्हा हे नेमकी काय व्याख्या असायला पाहिजे पतीपत्नीच्या नात्याला उमगतच नव्हतं.
मनातल्या मनात हसतं, मी आपली आत आले, आणि स्वयंपाकाला लागले, माझं मिक्सर काम करत नव्हतं, ह्यांना म्हटलं, जरा मिक्सर बघा ना. मी भाजी कापून घेते. तर पतीदेव पटकन बोलले, साधं मिक्सर तुला बघता येत नाही, एवढ्या डिग्र्या लावतेस ना नावासमोर. हे एकल्यावर माझाही पारा भडकला, आता इथे माझी डिग्री कशी काय आली, असं म्हणतच भांडायला मी समोर गेले. महाशय बेडवर लोळून मोबाईलवर गेम खेळत होते. चांगलेच चिडले मी, तर मला म्हणतात, बरोबर तर आहे, इंजिनीअर आहेस ना! तेवढंही जमत नाही. तुझे आई बाबा तर मोठे सांगतात.... आमची मुलगी इंजिनीअर आहे, तिला सगळं येत.
शब्दाला शब्द एवढे वाढले, दोन दिवस एकमेकांकडे बघणंही बंद. जसे जन्माचे वैरी याच जन्मात भेटला. मग काय, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है......  अशी परिस्थिती होती.
पण काय करता, जाणार कुठे, तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी गत. त्यातल्या त्यात पाण्यात राहून मगराशी वैर कोन घेणार. एकमेकांशी कितीही ठरवलं, तरी एका घरात बोलावच लागते,  झालं, हळु हळू बोलणं सुरु. दोन दिवसांनी मिक्सर बरोबर करून दिला, सांगताना मलाही समजून सांगितलं, मीही गुमान ऐकून घेतलं.
दुसर्‍या दिवशी, ऑफिसमधून येताना, सहज शेजारच्या काकूकडे डोकावलं तर काका काकू चहा पीत गप्पा मारत होते. जणू दोन जिवाभावाचे मित्र रमून गप्पा करत होते. मीही मस्करी केली, काय काका आज घरी, अग हिला नाटक बघायला घेऊन गेलो होतो, त्याच्याच गप्पा चालू आहेत, काका हसूनच बोलले. मीही म्हटलं, कुठलं?  दोघेही एकदम बोलले, तुझं माझं जमेना ... आणि कुणालाच हसू आवरलं नाही.
मी हसतच घरात पाय ठेवला, तर, आमचे पतीदेव चक्क लवकर घरी, आणि घरातून अद्रकच्या चहाचा सुगंध येत होता. घरात आल्याआल्या गरमागरम चहा मिळाला, ह्यांनी मला तयार व्हायला सांगितलं, आणि आम्ही बाहेर निघालो, मीही विचारलं नाही, कुठे जातोय म्हणून. दोघही काका काकूंच्या, ऑफिसमधल्या गप्पा करत होतो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अचानक, हे मला म्हणाले, उत्तर इथेच, मी गाडीतून बाहेर उतरले तर समोर नाट्यगृह होतं आणि बोर्ड लागला होता तुझं माझं जमेना...
एक अनोळखी नातं, पण, आपली स्वतःची जबरदस्त ओळख बनवतं.
रक्ता पलीकडल, पण, दोघांच्याही धमन्यांमधून रक्त बनून वाहतं,
भूतकाळ नसलेलं, पण भविष्यासाठी भक्कम असलेलं,
नाजूक, पण न तुटणारं.
जगातलं अतिशय पवित्र नातं, मनापासून ते शरीरापर्यंत निभवलं जातं.
कधी दोस्त तर कधी दुश्मन म्हणून आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत असतं...!
पती पत्नीचं नातं..  
माझे हे विचार सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित! 
Share:

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिकेची भारताला साथ!

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिकेची भारताला साथ!

नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
दहशतवादविरोधी लढ्यात आपण भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशकपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसोबत 166 निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळही जाऊ देणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Share:

शारदा विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी बनला दहशतवादी

शारदा विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी बनला दहशतवादी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
नोएडाच्या शारदा विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी एहतेशाम बिलाल हा इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशवादी संगठनेत सहभागी झाल्याचा खळबळजनक खुलासा जम्मू-काश्मीरात अलिकडेच पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी केला आहे. या गौप्यस्फोटानंतर विद्यापीठातून त्याचे नावही वगळण्यात आले आहे.
एहतेशाम बिलाल हा विद्यार्थी शारदा विद्यापीठामध्ये बीएमआयटी अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. अलिकडेच पकडलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी बिलाल बद्दल सांगितले. यानंतर बिलालचे फोन कॉल डिटेल्स तपासले जात असून त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर पोलीस नजर ठेऊन आहेत.
शारदा विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यामध्ये अफगाणी विद्यार्थ्यांनी त्याला मारहाणही केली होती. त्यानंतर तो विद्यापीठातून गायब झाला होता. काश्मीर हे त्याचे शेवटचे लोकेशन असल्याचे पोलिसांनी नोंदवले होते. त्यावेळी त्याने 3 मित्र आणि कुटुंबीयातील एका सदस्याशी फोनवरुन संवाद केला होता, असेही पोलिसांनी नोंदवले होते. 
Share:

मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तेरणा रुग्णालयाकडून श्रद्धांजली

मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तेरणा रुग्णालयाकडून श्रद्धांजली
  
नवी मुंबई । प्रतिनिधी
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या दशकपुर्ती वर्षात शहीद झालेले जवान व पोलीस तसेच निरपराध नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी नवी मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान असलेल्या नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व मेवाड नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ रेल्वे स्थानकावर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 108 युनिट (बाटल्या) रक्त जमविण्यात आले असून ते तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत जमा करण्यात आले. या शिबीरात मेवाड नवयुवक मंडळाच्या महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता. मेवाड नवयुवक मंडळाचे उपसंघ अध्यक्ष नेमीचंद चीपड, कोषाध्यक्ष राजेन्द्र खेरोदिया वरीष्ठ मार्गदर्शक चाँदमल कच्छारा नवयुवक मंडळ अध्यक्ष कैलाश खरवड यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रक्तदान शिबिरात भाग घेतलेल्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदान ही अमूल्य सेवा आहे. गरजेच्यावेळी आवश्यक रक्तगट लगेच उपलब्ध होईल याची श्वासती नसते. कोणालाही रक्तदान करायचे असले तरी फक्त रक्तगट माहित नसल्यामुळे रक्तदान करु शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने यावर जनजागृती मोहीम सुरु केली आहे.
 रक्तदानाविषयी माहिती हवी असेल अथवा रक्तदान शिबीर आयोजित करावयाचे असेल तर नवी मुंबईतील निवासी संकुले, मॉल तसेच सरकारी व निमसरकारी संस्था आमच्याशी संपर्क साधू शकता असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्यातर्फे करण्यात आले. 
Share:

शिक्षणासाठी ठाणेकर धावणार

* रॅडक्लिफ सीबीएसई स्कुलचा उपक्रम * ललिता बाबर यांचीही प्रमुख उपस्थिती   
शिक्षणासाठी ठाणेकर धावणार , रॅडक्लिफ सीबीएसई स्कुलचा उपक्रम, ललिता बाबर यांचीही प्रमुख उपस्थिती

  ठाणे । प्रतिनिधी
शिक्षणाचा अधिकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, या उद्देशासाठी हिरानंदानी इस्टेट येथील रॅडक्लिफ सीबीएसई शाळेने पाच किमी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सायक्लोथॉन व स्केटिंग स्पर्धाही होणार असून मॅरेथॉनच्या माध्यमातून मिळणारा निधी समर्थ भारत व्यासपीठच्या सिग्नल शाळेला दिला जाणार आहे. यावेळी हिंदुस्थानची धावपटू ललिता बाबर या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.  ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या रॅडक्लिफ सीबीएसई शाळेने येत्या 2 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता या पाच किमी अंतराच्या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यासोबतच ज्येष्ठांसाठी तीन किमी अंतराची ‘फन रन’ तसेच पाच किमीची सायक्लोथॉन व दोन किमीची अनोखी स्केटिंग स्पर्धा यावेळी होणार आहे. शाळेपासून या प्रत्येक स्पर्धेची सुरुवात होणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषकं व सर्व स्पर्धकांना मेडल प्रदान करून सन्मानित केले जाईल. या मॅरेथॉनच्या मेडल्स व टीशर्ट्सचे अनावरण शाळेच्या रिजन हेड स्वाती मुखर्जी व मुख्याध्यापिका नयना चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगदर्शक विजू माने, समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत, मॅरेथॉन समन्व्यक संकेत खरारे, निकुंज नयना तसेच राजू वर्मा, किरण चव्हाण, पुष्कर देसाई, सुनील भट, ध्वनी पंजाबी आदी धावपटू उपस्थित होते.
Share:

हजारो कायस्थांनी केला कार्ला गडावर एकविरा देवीचा जागर

हजारो कायस्थांनी केला  कार्ला गडावर एकविरा देवीचा जागर

मुंबई । प्रतिनिधी
देशभरातील हजारो कायस्थांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचा जागर करीत सीकेपी समाजाच्या इतिहासात एक नवा इतिहास रचला आहे.सीकेपी संस्थेने एक दिवस कायस्थांचा अशी घोषणा देत संपूर्ण देशातील सीकेपी समाजाला एकत्रित करण्यासाठी एकविरा गडावर शनिवार 24 नोव्हेंबर रोजी ‘एक दिवस कायस्थांचा’ अनोख्या पध्दतीने साजरा केला. या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटकातून सुमारे पाच हजारांहून अधिक कायस्थ एकविरा गडावर दाखल झाले होते.
देवीचा जागर करतानाच अनेक धार्मिक विधी सीकेपी पद्धतीने करण्यात आल्या. त्याला समाज बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ‘एक दिवस कायस्थांचा’ साजरा करताना प्रथम एकविरा देवीचा भाऊ बहिरीदेव याची यथासांग पूजा करण्यात आली. शनिवारी पहाटे देवीचा महाअभिषेक राजेश देशपांडे व आरती देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आला. सकाळी 9 वाजता पायरी पूजन विनोद खोपकर, रघुवीर देशमुख, शिरिष गडकरी, बिपीन देशमुख इत्यांदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून बसेसने आलेले अनेक सीकेपी भक्त गडावर दाखल झाले. गडावर आल्यानंतर कल्याणहून आणलेल्या श्री राममारुती महाराजांच्या पादुकांचे स्वागत राममारुती महाराजांच्या घराण्यातील अर्जुन राजेश देशपांडे यांनी केले. तर जानकी आईच्या तसबिरीचे स्वागत अ‍ॅड. मीनल श्रृंगारपुरे यांनी केले. नाथपंथीय देवेंद्र महाराज यांच्यातर्फे नाथपंथीय होम करण्यात आला. होमासाठी अकरा जोडपी बसली होती. महाराजांबरोबर पंधरा नाथपंथीय सहकारी उपस्थित होते. होमानंतर झालेल्या देवीचा गोंधळ तथा जागराने संपूर्ण वातावरण बदलून गेले. हजारों सीकेपी देहभान विसरुन देवीचा जागर करीत होते. देवीच्या गोंधळाचा लाभ व आनंद गडावर आलेल्या सर्वांनीच मनोसोक्त घेतला.
Share:

खडवली सैनिकी शाळेतून रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात

खडवली सैनिकी शाळेतून रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात

  टिटवाळा । प्रतिनिधी
ज्याप्रमाणे देशातून पोलिओसारख्या आजाराला पूर्णपणे नष्ट करण्यात आरोग्य शासकीय यंत्रणेला यश आले. त्याच धर्तीवर देशातील गोवर व रूबेला सारखे आजार कायमस्वरूपी नष्ट व्हावेत यासाठी केंद्र सरकारने गोवर व रूबेला मोहीम मोठ्या प्रमाणात देशात राबविण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हास्तरीय गोवर व रूबेला लसीकरण या मोहिमेचे उद्घाटन कल्याण तालुक्यातील खडवली येथील सैनिकी शाळेतून मंगळवारी झाले. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळाच्या डॉ. गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांची लाभली होती. 
ठाणे जिल्हास्तरीय गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेची सुरूवात कल्याण तालुक्यातील खडवली येथील सैनिकी शाळेतून मोठ्या उत्साहात व आनंदीत वातावरणात झाली. यावेळी सैनिकी शाळेतील मुलांच्या हातातून हवेत फुगे सोडून करण्यात आली. यावेळी परिचारिका प्रक्षिक्षणार्थी यांनी पथनाट्याद्वारे गोवर व रूबेला लस का घेतली पाहिजे या बाबत जनजागृतीपर उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला एसएमओ डॉ. जळगावकर, डॉ. काटकर, गटविकास अधिकारी, कल्याण श्वेता पालवे, एकात्मिक बालविकास प्रकल्प  अधिकारी संतोष भोसले, शिक्षणाधिकारी, ठाणे, बि.टी. पाटील, गट शिक्षणाधिकारी,कल्याण, ललिता दहितुले, सी.डी.पी.ओ. कल्याण प्रतिभा साखरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, खडवली, सभापती पांडूरंग म्हात्रे, माजी सभापती दर्शना जाधव, मा. कृषी. उ.बा.स. सदस्य रमेश बागर, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, सरपंच सोनावणे मॅडम,पांडुरंग खामकर, कदम मॅडम,  शैनिकी शाळा प्राचार्य तोरणे सर, कंमांडो के. सेवन, सर्व शाळांचे शिक्षक वृंद, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामविकास अधिकारी,  तसेच ग्रामपंचायत उपसरपंच व  सदस्य, ग्रामस्थ आदीनी देखील या कार्यक्रमाला खास हजेरी लावली होती. सर्व तालुका आरोग्य कार्यकर्ते,  कर्मचारी व प्राथमिक केंद्र खडवली यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिश्य मेहनत घेतली. 
Share:

सांगोला तालुक्यातील नागरिकांची विवाहाला गर्दी

 अडीच फुट उंचीच्या नवरदेवाला मिळाली तीन फुटी जोडीदार 
सांगोला तालुक्यातील नागरिकांची विवाहाला गर्दी,अडीच फुट उंचीच्या नवरदेवाला मिळाली तीन फुटी जोडीदार
अवघी 2.5 फूट उंची असलेल्या विशालचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे. तर 3 फूट उंची असलेल्या शारदाचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. शारदाचे वडील मयत झाले आहेत. तर विशाल शिवरत्न वाघ्यामुरळी पार्टीमध्ये विनोदी भूमिका करीत सर्वांना हसवून मिळेल त्या पैशातून आपली उपजीविका भागवतो.
सोलापूर । प्रतिनिधी 
सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे अडीच फुट उंचीचा नवरदेव आणि तीन फुटी उंचीच नवरी असा आगळा वेगळा विवाह सोहळा रविवारी पार पडला. हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी अजनाळेसह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
अजनाळे येथील कुंडलिक दिगंबर भंडगे यांचे चिरंजीव विशाल व अकोला (ता. सांगोला) येथील विष्णू कृष्णा गेजगे यांची कन्या शारदा हे दोघे रविवारी दुपारी 1.15 वा. या शुभमुहूर्तावर बोहल्यावर चढले. अडीच फुटी विशालला व तीन फुटी जोडदार मिळाल्याने हा विवाह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.
अजनाळे गावात वाघ्या मुरळीच्या पथकातील व गावाच्या पंचक्रोशीतील सर्वांना खदखदून हसवणारा हसमुख म्हणजे विशाल याची उंची 2.5 फुटापेक्षाही कमी आहे. तरीही वडील कुंडलिक भंडगे यांनी विशालच्या लग्नासाठी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुंडलिक भंडगे यांना अकोला येथील कै. विष्णू गेजगे यांची 3 फूट उंची असलेली शारदा लग्नासाठी वधू असल्याचे समजले.
रितीरिवाजाप्रमाणे भंडगे, गेजगे यांच्याकडून मुला-मुलीची पसंती होऊन विवाहाचा मुहूर्त ठरला. कुंडलिक भंडगे यांनी मुलाचे लग्न धुमधडाक्यात करायचे या जिद्दीने लग्नासाठी गावातील खंडोबा मंदिराजवळ मांडव उभा केला. स्पिकरवर जुन्या-नव्या गाण्यांची मैफल रंगली. लग्नासाठी ग्रामस्थांबरोबर गाव परिसरातील राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. रविवार 25 रोजी हळदीच्या कार्यक्रमानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास विशालचे घोड्यावरुन डॉल्बीच्या आवाजात वाजत गाजत पारणे निघाले. विशालने मारुतीचे दर्शन घेतले. पारणे मंगल कार्यालयाकडे जात असताना एरव्ही सर्वांना खदखदून हसवणार्‍या विशालने आपल्याच लग्नात ठेकाही धरला होता.
Share:

अक्कलकोटमध्ये गुरव समाजाचा ‘महाव्रतबंध सोहळा’ उत्साहात

महाराष्ट्र, कर्नाटकमधील दीडशे बटू मुलांना दिले उपनयन संस्कार
अक्कलकोटमध्ये गुरव समाजाचा ‘महाव्रतबंध सोहळा’ उत्साहात,महाराष्ट्र, कर्नाटकमधील दीडशे बटू मुलांना दिले उपनयन संस्कार

 विजयकुमार हरिश्चंद्रे । सोलापूर 
देशाच्या मंदिर संस्कृतीची अध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजतागयात अबाधित ठेवणार्‍या अखिल गुरव समाजाचा राष्ट्रीय महाव्रतबंध सोहळा नुकताच श्री स्वामी समर्थ नागरी अक्कलकोट येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सुमारे दीडशेहून अधिक गरजू  बटू मुलांचा मोफत मुंजी व्रतबंध सोहळा अक्कलकोट शहर, ग्रामीण गुरव समाज मंडळाच्या वतीने साजर करण्यात आला.
यावेळी लाखोंच्या उपस्तिथ गौरव महिला आणि बांधवांनी जय गुरवचा नारा दिला. याप्रसंगी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे. अखिल गुरव समाज राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब शिंदे, अक्कलकोट नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, ख्यातनाम निवेदक पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे, महिला आघाडी अध्यक्षा वर्ष पाथरकर, अन्नदान छत्रमंडळ अक्कलकोटचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले, प्रदेश उपकार्यकारी अध्यक्ष प्रवीण राजगुरू, प्रसिद्ध उद्योजक गणेश फुलारी,  युवा अध्यक्ष गुरवसमाज रंगनाथ गुरव, सोलापूर माजी नगरसेवक सुभाष डांगे, महासंघ सचिव मल्लिकार्जुन गुरव, नगरसेवक गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते महेशजी इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
आजच्या घडीला गुरव समाजाची अवस्था दयनीय असून भांडवलशाही आणि काही राजकीय समाजकंटक शक्ती या समाजाला त्यांच्या हक्क आणि जमिनींपासून वंचित करण्याचे कुटील काम करीत आहे. त्यातच सरकार या समाजाकडे कानाडोळा करीत आहे. हा अन्याय कदापी सहन होणार नसून शासनाने सरकारने न्याय न दिल्यास हा समाज बायकापोरांनसह रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला. 
मंदिराच्या तुटपुंज्या मिळकतीवर हा समाज आपले जीवनर्थचरितार्थ चालवीत असतो. त्यातच मुलांचे शिक्षण संगोपन भागवत असतो. अशा गरीब गरजू मुलांना चांगले संस्कार मिळवून देणारा शिस्त संस्कृती देणारा मुंजीव्रतबंधन सोहळा मोठ्या मंगलमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हाकार्यकारी अध्यक्ष प्रशांत गुरव, उपाध्यक्ष बसवराज फुलारी, मल्लीनाथ पुजारी, ह.भ.प. काशिनाथ महाराज गुरव यांनी केले होते.
Share:

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support