Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

महाराष्ट्रातील 151 तालुक्यांना सर्वाधिक दुष्काळी झळा

राज्यात अखेर दुष्काळ जाहीर!
पालघर, तलासरी, विक्रमगड गंभीर दुष्काळी तालुके
पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड हे तालुके गंभीर दुष्काळी तालुके म्हणून सरकारने जाहीर केले. त्याशिवाय जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव (जिल्हा सांगली), माण-दहीवडी (सातारा), करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, द. सोलापूर (सोलापूर),  धुळे, सिंदखेडे (धुळे), अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल (जळगाव), बागलान, मालेगाव, नांदगाव, सिन्नर (नाशिक), नंदुरबार, नवापूर, शहादा (नंदुरबार), कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड (अहमदनगर), औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड (औरंगाबाद), आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबोजोगाई, केज, परळी, पाटोदा (बीड), अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद, जालना, परतूर (जालना), मुखेड, देगलूर (नांदेड), लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशीम, भूम (उस्मानाबाद), मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू (परभणी), हिंगोली, सेनगाव (हिंगोली), मोर्शी (अमरावती), खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेडराजा (बुलडाणा), बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव (यवतमाळ), चिमूर (चंद्रपूर), काटोल, कळमेश्वर (नागपूर).
 मुंबई । प्रतिनिधी
कोरड्याठाक पडलेल्या विहिरी, तलाव, तळी आणि पावसाअभावी करपून गेलेली उभी पिके ही गंभीर स्थिती लक्षात राज्य सरकारने बुधवारी राज्यातील 151 तालुके दुष्काळी तालुके म्हणून घोषित केले. महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना 112 तालुक्यात गंभीर आणि 39 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे.
महसूल विभागाने बुधवारी हा शासननिर्णय जारी केला. याआधी सरकारने  181 तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
जून ते सप्टेंबरदरम्यान झालेला कमी पाऊस, भूजलाची कमतरता, वनस्पती र्निदेशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील पिकांची स्थिती आदीचा विचार करून सरकारने 151 तालुक्यांमध्ये गंभीर तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. येत्या सहा महिन्यांत या तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हणून देण्यात येणारी मदत व सवलती लागू होणार आहेत.
मध्यम स्वरूपाचे दुष्काळी तालुके
आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, बारामती, दौंड, शिरूर-घोडनंदी (पुणे), कोरेगाव, फलटण (सातारा), शिरपूर (धुळे), तळोदे (नंदुरबार), देवळा, इगतपुरी, चांदवड (नाशिक), उमरी (नांदेड), कळमनुरी (हिंगोली), शिरूर अनंतपाळ (लातूर), बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा (अकोला), अचलपूर, चिखलदरा, अंजनगाव सूर्जी (अमरावती), मोताळा (बुलडाणा), रिसोड (वाशिम), कोलापूर, मारेगाव, यवतमाळ (यवतमाळ), ब्रह्मपुरी, नागभिर, सिंदेवाही (चंद्रपूर), नरखेड (नागपूर), आष्टी, कारंजा (वर्धा).
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support