Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

हाशिमपुरा हत्याकांडप्रकरणी 16 पीएसी जवानांना जन्मठेप


 नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
नवी दिल्ली - मेरठच्या हाशिमपुरा येथील 42 मुस्लीम युवकांच्या हत्येप्रकरणी प्रांतीय सशस्त्र पोलीस दलाच्या (पीएसी) 16 जवानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीच्या तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयाने या 19 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यापैकी 3 आरोपींचा मृत्यू झाला आहे.
पीएसीच्या या जवानांनी 1987 मध्ये उत्तर प्रदेशच्या 42 युवकांचे घरातूनच अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची हत्या केली होती. 28 वर्षानंतर 2015मध्ये दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली. मात्र, पुराव्याच्या अभावामुळे त्या 19 जवानांची निर्दोष मुक्ततता करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. हाच निर्णय आता न्यायालयाने बदलला असून हत्या, अपहरण आणि पुरावे नष्ट करणे, असे आरोप लावत न्यायालयाने जूना निर्णय बदलत 16 जवानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा खटला गाजियाबादच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता. पण, सुनावणीमध्ये उशीर होत असल्यामुळे, पीडित युवकांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागतीली होती. त्यानंतर 2015 मध्ये हा खटला दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला होता.  
मार्च 2016 मध्ये सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याचं सांगत 16 आरोपींची सुटका केली होती. ठोस पुराव्यांअभावी या सर्वांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळाले पाहिजे, असे स्पष्ट करत या सर्वांना मुक्त केले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाने सांगितले होते की, हाशीमपूरा येथून 40 ते 45 जणांचा पीएसीच्या ट्रकमधून अपहरण करण्यात आले आणि हत्या करुन मृतदेह नदीत फेकण्यात आले हे स्पष्ट होत आहे. पण यामध्ये पीएसी जवानांचा सहभाग होता याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने सांगितले होते. तसेच जुलै 2006 मध्ये न्यायालयाने हत्या, हत्येचा प्रयत्न, पुराव्यांशी छेडछाड आणि आरोपींविरूद्ध कट रचण्याचे आरोप निश्चित केले होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support