Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

सीएम चषक स्पर्धेत 30 हजारहून अधिक स्पर्धक होणार सहभागी


कल्याण । प्रतिनिधी 
देशातील सर्वात मोठ्या सीएम चषक क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झाली असून, कल्याण डोंबिवली जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. कल्याण जिल्ह्यातील सर्व स्पर्धेचे नियोजन भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर आणि भाजपा नगरसेवकांनी केले आहे. 
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी आमदार रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
युवा वर्गाची सांस्कृतिक, शारिरीक आणि बौद्धिक वाढ होऊन त्यांना सर्वार्थांने सुदृढ करणे हे देश कार्यच आहे. युवा वर्ग चार भिंतीच्या आत कोंडला न जाता मैदानी खेळ आणि बौद्धिक गरज ओळखून शक्तिमान युवक घडविण्याचा उद्देश ‘सीएम चषक’ स्पर्धेत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून संपूर्ण राज्यातून पन्नास लाख खेळाडू सहभागी होणार असून निव्वळ कल्याण जिल्ह्यातून सुमारे तीस हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2018 ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत स्पर्धा होणार आहे. कल्याण जिल्हा अंतर्गत चार विधानसभा क्षेत्रातील युवक-युवती स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. क्रिकेट, कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, रांगोळी, नृत्य आदी प्रकारात स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक विभागातील शिक्षकवृंद सदर स्पर्धांसाठी सहकार्य करणार आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support