This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

रसायनमिश्रित पाण्याच्या विहिरीने घेतले 5 बळी । अग्निशमन दलाचे दोन जवानही मृत्युमुखी

 कल्याणमध्ये मौत का कुवाँ

कल्याण । प्रतिनिधी
येथील चक्की नाका परिसरातील भीमा शंकर मंदिराशेजारील एक विहिर रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे मौत का कुवाँ ठरली असून, गुरुवारी सफाई कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जणांचे या विहिरीने बळी घेतले.
शेजारच्या नाल्यातून येणारे रसायनांचे सांडपाणी या विहिरीत मिसळून विषारी वायू तयार झाला होता. मृत्यू दडून बसलेल्या या विषारी कालविवराची सफाई करण्यासाठी कमलेश यादव हा कामगार उतरला होता. हा कामगार बराच वेळ जाऊनही वर न आल्याने स्थानिक रहिवासी गोस्वामी कुटुंबातील पितापुत्र विहिरीत उतरले. त्यांचाही विषारी वायूने बळी घेतला. त्यांची सुटका करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या दोघा जवानांचाही या विहीरीने घास घेतला. एकाच वेळी पाच जणांचे या विहिरीने बळी घेतल्यामुळे कल्याणमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
प्रारंभी या विहिरीत सफाईसाठी एक कामगार उतरला होता. तो बराच वेळ उलटूनही वर न आल्यामुळे राहुल गोस्वामी हा तरूण विहिरीत उतरला. राहुलही वर न आल्याने त्याचे वडील गुणवंत उर्फ गुनाभाई गोस्वामी विहिरीत उतरले. ते देखील वर न आल्याने इतर रहिवाशांनी विहिरीत शोध घ्यायचे प्रयत्न केले. प्रारंभी विजेचा शॉक लागून हे तिघे बुडाल्याचा संशय येऊन विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. याचवेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन विहिरीत शिडी उतरवली. या शिडीने जवान अनंत शेलार हे त्या तिघांना शोधण्यासाठी उतरले असता विषारी वायूने त्यांनाही चक्कर आली. ते पडल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी प्रमोद वाघचौरे  हे जवान विहिरीत उतरले.  मात्र तेही कोसळले. अग्निशमन दलाच्या इतर जवानांच्या हाती फक्त त्यांच्या सहकार्‍यांचे आणि आधीच्या तिघांचे मृतदेहच लागले. 
पालिकेची अक्षम्य बेपर्वाई या विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जात आहे. त्याची सफाई करण्यात यावी यासाठी गेली तीन वर्षे गोस्वामी कुटुंबाने प्रशासनाकडे पाठपुरावा चालवला होता. ढिम्म प्रशासनाने वारंवार याकडे कानाडोळा केल्यामुळे अखेर गोस्वामी यांनी स्वत:च सफाईचा निर्णय घेतला आणि ते या विषारी विहिरीचा बळी ठरले.
गटाराचे सांडपाणी मंदिर परिसरात व विहिरीत जात असल्याची तक्रार महापालिकेकडे तीन वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र त्याकडे सबंधित अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदिराचे विश्वस्तही महापालिकेकडे या सांडपाण्याची तक्रार करत होते.येथील नगरसेवक नवीन गवळी यांनीही महापालिकेकडे तक्रार केली होती.
दोषींवर कारवाई करा 
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. महापालिका अधिकार्‍यांचा यात दोष आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगितले जाईल. स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाला माहिती दिली होती, असे सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support