Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

8 खुल्या मैदानांत फटाक्यांचे स्टॉल लावण्यास अग्निशमन दलाची परवानगी

ठाण्यात अग्निसुरक्षेचे सर्व नियम पाळूनच फटाके विक्री!
10 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना आग लागल्यास काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील 33 प्रकारच्या सूचना दिल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. त्यानंतरही सुरक्षेचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेन परवानगी दिलेल्या विविध मैदानांतील फटाका विक्री केंद्राजवळ सक्षम अग्निशमन यंत्रणा त्वरित कार्यान्वित केली आहे.

 ठाणे । प्रतिनिधी
अग्निसुरक्षेचे सर्व नियम पाळूनच ठाण्यात फटाके विक्रीचे स्टॉल्स लावण्याची परवानगी ठाणे महापालिका अग्निशमन दलाने दिली आहे. यंदा आठ खुल्या मैदानात फटाके विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून स्टॉलवाल्यांना मोकळे भूखंड व मैदाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला या स्टॉल वाल्यांकडून भाडे आकारले जात नव्हते.परंतु गेल्या दोन वर्षांपासून स्टॉल वाल्यांकडून 2 हजार रुपये भाडे आकारणीस सुरुवात झाली आहे. ही परवानगी देताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
कोपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड
ठाण्यात फटक्यांचे मोठे मार्केट म्हणून कोपरीच्या मार्केटकडे पाहिले जाते. येथे दिवाळीचे 10 दिवस आधीपासून फटाके खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. 14 पैकी 9 गाळे धारकांना ना-हरकत प्रमाणपत्र अटी शर्तीनुसार देण्यात आले आहेत. काही वर्षापूर्वी येथे फटाक्यांच्या दुकानांनी रस्ते व्यापले होते. 20 किलोचा तात्पुरता परवाना घेऊन 100 किलोहून अधिकचे फटाके ठेवले जात होते. आता फक्त ज्यांच्याकडे कायमस्वरूपी फटाक्यांचा परवाना आहे. त्यांचे स्टॉल्स येथे लावण्यास परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत खुल्या 8 मैदानांत फटाके विक्री स्टॉल धारकांना विक्रीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 8 स्थायी अग्निशमन 04 बीट फायर स्टेशन 5 दिवाळी बंदोबस्तासाठी वाहन तैनात आहेत. 6 अग्निशमन केंद्रांशिवाय अतिरिक्त 9 अग्निशमन केंद्र अशी एकूण 15 अग्निशमन केंद्र 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येतील.- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support