Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

उद्धव ठाकरेंच्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी

 एकनाथ शिंदे पोहोचले अयोध्येत

ठाणे । प्रतिनिधी
राम मंदिर उभारणीसाठी भाजपाला डिवचणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाऊन भाजपाला आव्हान देणार आहेत. त्यांच्या या दौर्‍याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत पाहणी केली.
उद्धव यांच्या अयोध्या दौर्‍यासाठीच्या तयारीचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, राजन विचारे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह आढावा घेतला. शरयूकाठी मोठ्या मैदानात उद्धव यांची प्रचंड सभा उत्तर प्रदेश शिवसेनेने आयोजित केली आहे.
शिवसेनेच्या या मान्यवरांनी शरयू नदीकाठावरील आरती स्थळालाही भेट दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने अयोध्येत उद्धव यांच्या दौ-याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या वेळी आमदार अनिल परब हेही उपस्थित होते. 
केंद्रातील मोदी सरकार राम मंदिराबाबत काहीही भूमिका घेत नाही, भाजपाही मौन धारण करून आहे. या मुळे हिंदुत्त्ववादी विचारांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला राम मंदिरावरून नुकतेच आव्हान दिल्यामुळे त्यांनीच राम मंदिराच्या मोहिमेचे नेतृत्त्व करावे अशी मागणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही विद्यमान मोदी सरकारने राममंदिराबाबत अध्यादेश काढावा असे म्हटले आहे.
शिवसेनेने  उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यासाठी जोरदार वातावरणनिर्मती चालवली असली तरी, भाजप वगळता सर्वच पक्षांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ही नौटंकी करत असल्याची टीका होत आहे. अजित पवार, अशोक चव्हाण, नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support