This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

शनिवारी दीपोत्सव कार्यक्रमात होणार उद्घाटन

 सिग्नल शाळेत आता मुक्त प्रयोग शाळा, बँक आणि नवी वर्गखोलीही

ठाणे । प्रतिनिधी
अक्षर साक्षरतेनंतर विज्ञान साक्षरता दृढ व्हावी यासाठी शंभरहून अधिक प्रयोगांनी सज्ज असलेली मुक्त प्रयोगशाळा, बँकीग व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली वास्तवातील बँक, तीन हात नाक्याव्यतिरिक्त इतर सिग्नलवरील मुलांना सामावून घेण्यासाठी उभी करण्यात आलेली अत्याधुनिक नवी वर्गखोली अशा पायाभूत सुविधांच्या उद्घाटनासोबत यंदाचा सिग्नल शाळा दीपोत्सव शनिवारी सायं. 4 वाजता साजरा होत आहे.
मो.ह.विद्यालयाच्या 1969 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांकडून सिग्नल शाळेत मुक्त प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे. या प्रगोयशाळेत 4 थी ते दहावी अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील शंभरहून अधिक प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. 
शाळेच्या वेळेनंतर सिग्नलवर वस्तू विकल्यानंतर गाठीशी आलेले पैसे बचत करण्याची सवय लागावी याचबरोबर प्रत्यक्ष बँकिंग व्यवहार कळावेत यासाठी सिग्नल शाळा बँक टीजेएसबी सहकारी बँकेच्या सहयोगाने सिग्नल शाळेत सुरु होत आहे. तसेच तीन हात नाक्याच्या सिग्नल व्यतिरिक्त इतर सिग्नलवर असलेल्या मुलांना सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक अशी डीजिटल वर्गखोली सिग्नल शाळेत उभारण्यात आली आहे. या तिन्ही सुविधांचा आरंभ मान्यवर व सिग्नल शाळेच्या हितचिंतकांच्या उपस्थितीत शनिवार, 3 नोव्हेंबर रोजी सायं. 4 वाजता होईल.
प्रयोगशाळा, बँक व वर्गखोलीच्या उद्घाटनासोबत सिग्नल शाळेचा दीपोत्सव देखील यावेळी साजरा होणार आहे. सरस्वती पूजन, मातृपूजन, मुलांना नवे कपडे देणे, फराळ व दिव्यांची आरास अशा स्वरुपात दीपोत्सव साजरा होत आहे. 
वर्गखोली साकारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिडबी, बर्नहार्ड शूटल शिपमेंट इंडिया लि., अशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि., अल्टरनेट स्टुडीयो यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या उपक्रमांच्या उद्घाटनाला व सिग्नल शाळा दीपोत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support