Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

दारात, अंगणात मातीच्याच पणत्या

भिवंडीत महिलांचा अनोखा संकल्प 

भिवंडी । प्रतिनिधी 
फॅन्सी पणत्यांमुळे पारंपरिक पणत्यांना उतरती कळा लागल्याने ही परंपरा जपण्यासाठी भिवंडीतील महिलांनी मातीच्याच पणती घेण्याचा निर्णय घेतला आहे. घराच्या अंगणात आणि दारात मातीची पणती लावण्याचा संकल्प या महिलांनी केला असून त्यामुळे मातीच्या पणतींची मागणी वाढली आहे. 
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मातीच्या पणत्यांची विक्री होत आहे.त्यामुळे दुकानदारही खूष आहेत. शहर परिसरात उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात व कलकत्ता येथून विविध प्रकाराच्या व आकाराच्या पणत्या शहरातील विक्रीसाठी कुंभारवाडा येथे आणल्या जातात. पूर्वी कल्याण काळातलाव येथे मातीच्या पणत्या बनविल्या जात होत्या. त्या जिल्ह्यात विक्रीसाठी नेल्या जात होत्या. परंतू ग्रामिण भागात मातीच्या वस्तू बनविण्यास लागणारी माती उपलब्ध होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मातीची छोटी भांडी बनविणे काही प्रमाणात बंद झाले आहे. त्यामुळे गुजरात अहमदाबादमधून विविध नक्षीकाम केलेले व विविध आकार दिलेल्या पणत्या विक्रीसाठी आणल्या. तेथील चिकण मातीमुळे मातीच्या भांड्यांना सहजपणे आकार मिळत असल्याने तेथील उत्पादन बाजारात आले आहे. त्याचप्रमाणे कलकत्ता येथील सिलिगुडी भागात बनविलेल्या मातीच्या पणत्यांसह विविध मातीची चित्रे व देवांच्या मूर्ती देखील शहरात विक्रीसाठी आणली जात आहेत. तर उत्तरप्रदेश व बिहारमधून मातीच्या पणत्यांसह इतर मातीची खेळणी आणि मातीच्या छोट्या पूजेच्या मूर्ती विक्रीसाठी येत आहेत. अशा तीन राज्यातून येणार्‍या मालास शहरात रहाणार्‍या परप्रांतीयांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहेत.
शहरातील लोकवस्तीत हिंदू कुटुंबे आपल्या घराबाहेर पणत्या लावतात. त्याच बरोबर हिंदू यंत्रमाग मालक दिवाळीत पणत्यांनी आपले कारखाने सजवितात. त्यामुळे येथे पणत्यांची विक्री मोठ्या संख्येने होत असते. शहरात सर्व ठिकाणच्या मिळून सुमारे 2 लाखापेक्षा जास्त पणत्यांची विक्री होत असून या व्यवसायात कुंभार समाजाव्यतिरिक्त इतर समाज देखील उतरला आहे.
गरीब कुटुंबातील महिलांना अर्थिक हातभार लागवा त्यांची दिवाळी आनंदाने  साजरी व्हावी यासाठी तसेच भारतीय संस्कृती जपण्यासाठी मातीचा पणत्या व व इतर वस्तू खरेदी आम्ही खरेदी भर देत आहोत. दिवाळीच्या निमित्ताने चायणा वस्तू सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत अनेक जण ते खरेदी करत आहेत. पण ते क्षणभंगुर आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी स्वदेशी  माल खरेदी करणार..
- रोमा आळशी, गृहिणी, भिवंडी.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support