Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

आमदार सासूबाईंचा कार्यकर्ता मेळावा फ्लॉप तर महापौर सुनबाईंचा ‘टॉप’


  उल्हासनगर । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कालानी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपसातल्या गटबाजी मुळे फ्लॉप ठरला. या मेळाव्याला पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आपल्याला कार्यकर्त्यांसह हजर राहणे टाळले. या मेळाव्याला माजी पालकमंत्री गणेश नाईक व प्रमोद हिंदुराव उपस्थित होते. त्या नंतर टीम ओमी कालानी आणि त्यांची पत्नी महापौर पंचम कालानी यांनी टाऊन हॉलमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला मात्र कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद देत तुफान गर्दी केली होती. त्यामुळे हा मेळावा टॉपचा झाल्याचे निष्पन्न झाले.
या मेळाव्यात महापौर पंचम कालानी यांनी विकास कामाची सुरुवातीची यादी वाचली. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री असलेले रविंद्र चव्हाण यांचे गोडवे गाऊन स्तुती केली. कारण त्यांनी उल्हासनगर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. या दोन्ही कार्यकर्ता मेळाव्यावरून असे चित्र निर्माण झाले की, आमदार सासूबाई ज्योती कालानी यांचा कार्यकर्ता मेळावा फ्लॉप तर सुनबाई महापौर पंचम कालानी यांचा कार्यकर्ता मेळावा टॉप ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support