Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

रवींद्र चव्हाण यांचा कल्याण लोकसभेवर डोळा!

शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

 उल्हासनगर । नंदकुमार चव्हाण
येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा पाडाव करण्यासाठी कंबर कसली आहे. बुधवारी उल्हासनगर येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेनेनेचे विनोद ठाकूर, रवी पाटील आणि साई पक्षाचे अमर लुंड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना भाजपात समाविष्ट करून थेट आवाहन द्यायला सुरुवात केली आहे.  
शिवसेना-भाजप युतीने 2014 लोकसभेनंतर कोणतीच निवडणूक एकत्र लढवली नाही. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये एकमेकांची उणी धुनी काढून टोकाची टिका केली आहे. यामुळे लोकसभा निवडणूक 2019 ही दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीला अवघे चार महिने उरले असताना भाजपाने शिवसेनेला पुन्हा डिवचायला सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास भाजप जिल्हा कार्यकारणीने मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला प्रवक्ता श्वेता शालिनी आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. तसेच माजी आमदार जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर पंचमी कलानी, नगरसेवक विजय पाटील, मीना सोंडे, प्रदीप रामचंदानी, धिरज ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 
आतिषबाजीत झुलेलाल प्रवेशद्वाराला लागली आग 
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी कैलास कॉलनी येथील झुलेलाल प्रवेशद्वार येथे फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांची ठिणगी प्रवेशद्वारावरील गवताला लागल्याने झुलेलाल यांच्या प्रतिमेसमोर भिषण आग लागली. या घटनेची माहिती हिललाईन पोलिसांनी अग्निशामक दलाला देताच काही वेळात ही आग विझविण्यात आली. मात्र समाजसेवक प्रकाश तलरेजा यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांना सोशल मीडियावर चांगलेच धारेवर घेतले.   
कोणत्या पक्षातून झाले मोठे प्रवेश 
यावेळी साई पक्षात असलेले अमर लुंड यानी भाजप प्रवेश केला. त्यांच्या पत्नी कांचन आणि भाई शंकर हे व्हिनस चौक परिसरातील बंगलो विभागामधून नगरसेवक आहेत. कॅम्प 5 मधून भाजपचा एकमेव पॅनल 19 अख्खा निवडून आला आहे. या पॅनेलमधील नगरसेविका मिनाक्षी पाटील यांचे पती रवी पाटील यांना भाजपने प्रवेश दिला आहे. ते पूर्वी शिवसेनेनेत होते, पत्नीबरोबर भाजप मध्ये आलेले नव्हते. तसेच कुर्ला कॅम्प चौकात ताकद असणारे माजी महापौर विनोद ठाकूर याना भाजपने प्रवेश दिला आहे. वर्षभरापूर्वी विनोद ठाकूर यांचे पुत्र धीरज ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र विनोद ठाकूर हे शिवसेनेमध्येच होते. अखेर त्यांनीही शिवसेनेनला जय महाराष्ट्र केला.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support