This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

सुट्टीत फिरायला जाताय ?

रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी तसेच आपल्या माणसांसाठी वेळ काढून लांब कुठेतरी फिरायला जावं असं वाटणारे आपण हल्ली कामाच्या व्यापात या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परंतु दिवाळी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या सुट्टीत अनेक पर्यटन स्थळांवर वर्दळ पाहायला मिळते. सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करणं हा आपल्यातील अनेकांचा आवडता छंद असतो. नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी भटकंतीसाठी उत्तम मनाला जातो.  ताण आणि कामाचा व्याप बाजूला सारून छान भटकंती करावी असं जर आपल्याला वाटत असेल तर मनात आलं की तडख बॅग भरून प्रवासाला निघायचं. आपण स्वतःभोवती कामाच्या व्यापाची चौकट तयार करून घेतली आहे. ती चौकट मोडून आपण बाहेर यायला हवं आणि आपल्या आसपासच्या निसर्गाचा यथेच्छ अनुभव घ्यायला हवा आहे.- सुधाकर बाबर, संचालक सोहम ट्रॅव्हल्स 

वेळणेश्वर बीच

महाराष्ट्रातील रत्नागिरी जवळचे हे एक गाव आहे. येथील  समुद्रीतटांमुळे या जागेचे नाव वेळणेश्वर असे पडले.येथील निसर्गाला  तटांवरील नारळाच्या झाडांमुळे अधिक शोभा येते. समुद्र तट  आणि मंदिरे ही इथले प्रमुख आकर्षणे आहेत. पाण्याच्या तटाजवळ महादेवाचे एक जुने मंदिर आहे. येथील समुद्राजवळ पोहण्याचा व मोटार बोटीचा आनंद तुम्ही लुटू शकता. येथील समुद्राचा परिसर मोठा  व शांत असल्याने  तुम्ही इथल्या निसर्गाचा मनमुराद आस्वाद  घेऊ शकता.

चिखलदरा

महाराष्ट्रामधील चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवनच म्हणता येईल. हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गर्द वनराई, मोरपिसार्‍यासारखी झाडे, आंब्याची झाडं विशेष आकर्षण आहेत. उंच असे पंचबोल पॉईंट जेथील दर्‍याखोर्‍यात वाघाची डरकाळी ऐकू येते. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भीमकुंडात  आवाजाचे पाच ध्वनी ऐकू येतात. या  व्यतिरिक्त येथे देवी पॉईंट, मोझरी पॉईंट, गाविलगड किल्ला ही ठिकाणे व वाघ, अस्वलांसारख्या प्राण्यांचे  दर्शन  होते.

महाबळेश्वर
महाबळेश्वर हे ठिकाण हिरवा निसर्ग, डोंगरदर्‍या, सुंदर बगीचे, खोल डोंगराळ दरी यासाठी खूप प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर - डिसेम्बर या  कालावधीत तर अंगाला झोंबणारा वारा  येथे अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर इको पॉईंट, प्राचीन मंदिरे ही इथली प्रमुख आकर्षणं आहेत. महाबळेश्वरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर प्रतापगड हा किल्ला आहे.

माथेरान 
अलीकडेच माथेरानची टॉय  ट्रेन सुरु करण्यात आली आहे. नेरळ वरून ही  टॉय ट्रेन सुटते. टॉय ट्रेन हे इथले प्रमुख आकर्षण आहे.  ही  ट्रेन 2 तासात माथेरान ला पोहोचते. या  दोन तासाच्या प्रवासात अनेक घनदाट जंगलं, विविध वनस्पती, उंचच उंच डोंगर आणि माकडं बघायला मिळतात. या प्रवासात जर ग्रुप ने जात असाल तर अन्ताक्षरीचा छान डाव रंगवत हा प्रवास पूर्ण केलात तर प्रवास छान होऊ शकतो. येथे पोहोचल्यावर निसर्ग वैभव लाभलेलं हेच  उत्तम ठिकाण असं वाटल्याशिवाय राहत नाही. येथील उद्याने, व वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही पायी, हात गाडी किंवा घोडे स्वारी करत पाहू शकता. इथे राह्यण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.

लोणावळा - खंडाळा
लोणावळ्याची चिक्की प्रसिदध असते हे तर आपल्याला ठाऊकच आहे.  दिवाळीमधे लोणावळा - खंडाळा  हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. ही ठिकाणं निसर्ग, किल्ले,  तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहेत. लोणावळा - खंडाळा  हे  फिरण्यासाठी  उत्तम पर्याय आहेत. सहसा  शुक्रवार- शनिवार रात्री तिथे मुंबईकरांची गर्दी  असते.  आता तर  दिवाळीच्या सुट्टीच्या  निमिताने तिथे पर्यटक नक्की हजेरी लावणार यात शंका नाही. नोव्हेंबर - डिसेम्बर या  कालावधीत तर अंगाला झोंबणारा वारा  येथे अनुभवायला मिळतो. लोणावळ्यामधे भुशी डॅम, तळी, कार्ला - भाजा येथील लेणी, राजमाची पॉईंट टायगर्स लिप्स ही पाहण्यासारखी  ठिकाणं आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support